साहित्यः
२ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल)
१/४ वाटी लिंबाचा रस
२ हिरव्या मिरच्या चिरून
१-२ लाल सुक्या मिरच्या तोडून
कढीपत्ता
१ टेस्पून शेंगदाणे
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून मेथीदाणे
१ टीस्पून चणा-डाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून हींग
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची फोडणी करावी.
डाळी लालसर रंगावर परतल्या गेल्या की त्यात कढीपत्ता, हींग, हिरव्या व लाल सुक्या मिरच्या घालाव्या.
थोडे परतल्यावर त्यात हळद व शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खमंग परतून घ्या.
आता त्यात शिजवलेला भात व मीठ घालावे. मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे.
त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा व सगळे नीट मिक्स करून घ्यावे. लेमन राईस तयार.
तुम्ही कुठल्याही रायत्यासोबत किंवा पापडासोबत सर्व्ह करू शकता.
वाचने
10138
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
मस्त
फोटो कसले टेंम्प्टींग
हा धागा
अतिशय सुंदर नेहमीप्रमाणेच..
झकाSSSस....
जेवल्यावर बघितल्याने ०.१ %
खल्लास.
+१ नेहमीप्रमाणे
In reply to खल्लास. by प्रचेतस
क्या बात है
१०० पैकी १००. शाळेत असताना
साधी , सोपी आणि रुचकर
येस्स
In reply to साधी , सोपी आणि रुचकर by मनीषा
खुपच छान!!नक्की करुन बघते व
ओह्ह वॉव सानिका थॅंक्स .. मला
फक्त आणि फक्त.. लय भारी. -
छान सादरीकरण.
शेवटचा फोटू... आणी फोटुंचा
क्लास!!
वा झकास
मस्त!
आणखी काही सोपे प्रकार असतील तर....
वाह...!!
वा वा वा!
वा छान. पण सध्या फोटो
मस्तच
काल केलेला...
मस्तच!!
In reply to काल केलेला... by किलमाऊस्की
पाकॄ वाचली नाहीये... फक्त
हा माझा लेमन राइस
व्वा....!
In reply to हा माझा लेमन राइस by नीधप
छान.
In reply to हा माझा लेमन राइस by नीधप
आहेत की फटु..
In reply to छान. by चिंतामणी
नेहमीप्रमाणे
कालच बनवून पाहिला.मस्त
परवा करुन पाहिला सानिकातै, पण