मराठी आंतरजालीय साहित्यिक!
राम राम मंडळी,
मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!)
मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं? किंवा त्या व्यक्तिच्या साहित्याबद्दलचा एखादा उल्लेख असलेला लेख, केवळ तो एक सभासद आहे या एकाच कारणास्तव 'आपापसात' सारखा गावाच्या वेशीबाहेर का असावा, किंवा वैयक्तिक, व्यक्तिगत मध्ये का मोडावा बरं? जणू काही संबंधित लेखकाने त्या संकेतस्थळाचे सभासदत्व घेऊन काही गुन्हाच केला आहे!
पुलं, कुसुमाग्रज, दळवी, पाडगावकर यांच्याबद्दल आपण लिहितोच ना? ही मंडळी खरंच खूप मोठी आहेत हे मान्य. आम्हीही या सगळ्यांचे भक्त आहोत, चाहते आहोत. परंतु आपल्यातीलच काही मंडळी जर चांगलं लेखन करत असतील तर त्यांच्या साहित्याचा उलेख त्याच संकेतस्थळावर करायला 'व्यक्तिगत', वैयक्तिक, 'सभासद' हे शब्द आड येऊ नयेत असे वाटते! सगळ्यांनाच काही पुस्तके काढणे, किंवा मौजसारख्या दिवाळी अंकात आपले साहित्य पाठवायला जमते असे नव्हे. काहींना आपले विचार व्यक्त करायला आंतरजाल हे माध्यमच सोयीचे वाटते! आणि कालांतराने, भविष्यात हेच माध्यम अधिक प्रभावी ठरेल असाही अंदाज आहे!
=============================================
राम राम मडळी,
आज मी येथे मला आवडलेल्या काही मराठी आंतरजालीय लेखकांबद्दल दोन शब्द लिहिणार आहे. मी गेले काही काळ मराठी आंतरजालावर वावरत असून बर्यापैकी बदनाम आहे आणि बर्यापैकी लोकप्रियही आहे! :)
मी कामधंद्याच्या निमित्ताने आंतरजालावर वावरू लागलो आणि अशातच एके दिवशी माझा मित्र सुभाषचंद्र आपटे, ऊर्फ अगस्ती याने मला मनोगत या संकेतस्थळाबद्दल सांगितले. मी मनोगतवर वावरू लागलो, हळूहळू मराठी आंतरजालाशी फॅमिलियर व्हायला लागलो. मनोगतावर मला अनेक मित्र भेटले, अनेकांचं गद्य/पद्य साहित्य वाचावयास मिळालं. मीही तिथे लिहू लागलो, इतरांचंही साहित्य वाचू लागलो. ते वाचताना मला काही सकस लेखन वाचावयास मिळालं, ज्याची चांगल्या साहित्यात गणना होऊ शकेल. आज मी त्यापैकीच काही लेखकांच्या साहित्याबद्दल इथे दोन शब्द लिहिणार आहे. हे लेखन करताना माझी भूमिका केवळ एका आस्वादकाची आणि रसिकाची असेल. या लेखात मी काही मंडळींची नांवे जरूर घेणार आहे. परंतु यात व्यक्तिगत किंवा वैयक्तिक असं काहीही नसेल व ते केवळ एक लेखक आणि वाचक याच संदर्भात मांडलं गेलं असेल/तसा माझा प्रयत्न असेल.
संजोप राव
यांचे लेखन मला अतिशय आवडते. भाषेवर यांचे अतिशय चांगले प्रभुत्व असल्यामुळे याचे लेखन अत्यंत सकस व दर्जेदार वाटते. याचं स्वतःचं वाचनही खूप असल्यामुळे यांच्या लेखनात बहुश्रुतता जाणवते. चित्रपट व त्याचे आस्वादक समिक्षण, त्यातील गीतकार, अभिनेते यांच्यावरही ते खूप चांगले लेखन करतात. भविष्यातदेखील यांच्याकडून उत्तमोत्तम लेखन वाचावयास मिळेल अशी आशा आहे.
अनु
यांच्या लेखनातील विनोदाची पातळी अत्यंत सकस आहे असे मला वाटते. साधारणपणे स्वतःमधली विसंगती शोधून त्यावर नर्मविनोदी टिपणी करण्यात यांचा हातखंडा आहे. मला त्यांना एवढंच सुचवावासं वाटतं की केवळ स्वतःवरच नव्हे, तर आपल्या आजुबाजूला वावरणार्या व्यक्तिंमध्ये, आपल्या आजुबाजुला घडणार्या घटनांमध्येही पुष्कळदा विनोदी विसंगती आढळते/असते. सुदैवाने ती विसंगती शोधण्याची हातोटी यांच्यात आहे, आणि ती हातोटी अधिकाधिक डेव्हलप करून व तिचा वापर करून यांनी अधिकाधिक लेखन केले पाहिजे असे वाटते.
नंदन
हा माणूस स्वतः फार कमी लिहितो. पण माझ्या मते याला उतम साहित्याची अतिशय चांगली जाण आहे. एखाद्या लेखकाची किंवा एखाद्या उत्तम पुस्तकाची अगदी सर्वांगसुंदर ओळख करून देण्याची हातोटी याच्यात आहे. परंतु माझ्या मते त्याने स्वतःही अधिकाधिक लिहावंन. ते लेखनही अतिशय दर्जेदार असेल अशी माझी खात्री आहे.
प्रमोद देव
यांच्याकडे कदाचित आपलं लेखन इतरांना कसं आवडेल हे पाहायची टॅक्ट नसेल. आणि खरं तर तेच चांगलं आहे. त्यामुळेच यांचं लेखन अधिक प्रांजळ वाटतं, मनापासून वाटतं. यांनी खूप पाहिलं आहे, अनुभवलं आहे त्यामुळे यांचं जे काही लेखन आहे ते स्वानुभवातून आलेलं आहे. मला व्यक्तिशः स्वानुभवावर आधारित लेखन वाचायला अधिक आवडतं. आंतरजालावर अगदी सहजी आणि सराईतपणे वावरणार्या मंडळींचं सरासरी वय पाहिलं तर वास्तविक यांचं वय थोडं अधिक आहे. हे वयाने थोडे सिनियर आहेत. (माफ करा देवकाका, मी तुम्हाला म्हातारं वगैरे म्हटलेलं नाहीये! दिलसे आप आजभी जवान है! :) माझा मुद्दा इतकाच की हल्लीच्या सरासरी २५ ते ३० वयोगटातील मंडळी ज्या सफाईने आंतरजालावर वावरतील त्या तुलनेत ही सिनियर मंडळी वावरणार नाहीत. असे असूनदेखील ह्या आंतजालीय विश्वाशी देवकाकांनी जी हातमिळवणी केले आहे ती मला तरी निश्चित कौतुकास्पद वाटते. In fact, त्यांच्याच पिढीतल्या इतरही काही मंडळींनी आंतरजाल विश्वावर अधिकाधिक वावरून लेखन केले पाहिजे असेही वाटते!
डॉ दिलिप बिरुटे, प्रकाश घाटपांडे, प्रियाली, -
मंडळी, खरं तर इथे नांव घेऊन लिहिण्याइतपत यांचं लेखन मी वाचलेलं नाही. परंतु ही मंडळी छुपे रुस्तम आहेत असं मला वाटतं. यांच्या एखाददोन लेखांतून, प्रतिसादातून यांच्या नर्मविनोदी शैलीची आणि दुसर्याला हळूच चिमटे काढण्याची लेखनपद्धती माझ्या पाहण्यात आहे. खरं पाहता यांनी अधिकाधिक लेखन करायला हवे, लिहीत राहायला हवे. ही मंडळी निश्चितपणे काही एक दर्जा असलेले लेखन करू शकतील अशी माझी खात्री आहे! :)
सर्वसाक्षी आणि प्रभाकर पेठकरांकडूनही मला खूप आशा आहेत. अर्थात, साक्षी ऐतिहासिक जास्त लिहितो परंतु ललितही तो छान लिहू शकेल आणि लिहितोही. प्रभाकर पेठकरांची शैलीही मला सहजसुंदर वाटते. हल्ली आंतरजालावर कोहम, दाभोळकर, चौकस ही मंडळीदेखील अतिशय चांगलं लेखन करताना आढळतात.
आता पद्य साहित्याबद्दल -
प्रसिद्ध गझलकार चित्तोबा म्हणतात त्याप्रमाणे मला काव्याची समज खूपच कमी आहे आणि ते खरंही आहे! :) परंतु मला चित्तोबांच्या गझला, प्रसाद शिरगावकरच्या गझला मनापासून आवडतात. जयश्री अंबासकर, अभिजित पापळकरांच्या कवितांचाही मी चाहता आहे. अदितीच्या कविताही मला आवडतात. अदितीला अतिशय उत्तम भाषावैभव लाभले आहे आणि तिने गद्य लेखनही अधिकाधिक करावे असे वाटते. आंतरजालावरील माझा सर्वात आवडणारा जर कुणी गझलाकार असेल तर तो माफीचा साक्षिदार! या माणसाचा मी डायहार्ड चाहता आहे! :)
असो! हा लेख म्हणजे मराठी आंतजालावर लिहिणार्या मंडळींचा मी माझ्या परिने घेतलेला एक धावता लेखाजोखा आहे. यात काही त्रुटीही असू शकतील, कदाचित यातले विचार इतरांना पटणारही नाहीत. असो, 'मराठी आंतरजालीय साहित्यविश्व' दिवसेंदिवस अत्यंत समृद्ध होवो, उच्च दर्जाचं होवो, एवढीच इच्छा जाता जाता व्यक्त कराविशी वाटते!
-- तात्या अभ्यंकर.
आगामी -
अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.)
ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.)
अवांतर - वरील सगळ्या मंडळींचं बोट धरून चालणारा मराठी आंतरजालावरचा मीदेखील एक लिंबुटिंबू साहित्यिक आहे! :))
याद्या
55620
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
हीट लिस्ट
जबरी टाकलात!
In reply to हीट लिस्ट by सहज
वैचारीक: अशुद्ध
In reply to हीट लिस्ट by सहज
ओहो!
गुंडोपंत,
In reply to ओहो! by गुंडोपंत
:)
In reply to गुंडोपंत, by विसोबा खेचर
माझे आवडते लेखक
धन्यवाद कर्णा,
In reply to माझे आवडते लेखक by आजानुकर्ण
अनुदिनीविश्वातील काही
गंमतच आहे.
प्रमोदकाका
In reply to गंमतच आहे. by प्रमोद देव
नावात काय आहे?
In reply to प्रमोदकाका by आजानुकर्ण
बरोबर
In reply to नावात काय आहे? by प्रमोद देव
जो तो
रौशनी भाग १ व २.
In reply to जो तो by प्रियाली
अभ्यासाचा विषय
तो ,प्रदीप आणि इतर
कव्हर! :)
In reply to तो ,प्रदीप आणि इतर by सन्जोप राव
वरदाचे नांव,
In reply to तो ,प्रदीप आणि इतर by सन्जोप राव
कुथे वाचता येइल
In reply to तो ,प्रदीप आणि इतर by सन्जोप राव
सर्किट
वरूणदेवा,
In reply to सर्किट by कोलबेर
आवतनं देलं का ?
In reply to सर्किट by कोलबेर
तेला आवतनं देलं का ?
In reply to आवतनं देलं का ? by बाबुराव
सर्किट
डिस्क्लेमर
खरं आहे! :)
In reply to डिस्क्लेमर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
व्यक्तिगत
In reply to खरं आहे! :) by विसोबा खेचर
सर्किटच
म्हणजे आमचे मित्र ?
In reply to सर्किटच by आजानुकर्ण
खरं आहे.
In reply to म्हणजे आमचे मित्र ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अजून ओळख होते आहे
क्या बात है..
In reply to अजून ओळख होते आहे by धनंजय
माणसाला
अगदी बरोबर!
In reply to माणसाला by टिकाकार
प्रसिद्धी
In reply to माणसाला by टिकाकार
हा हा हा!
In reply to प्रसिद्धी by प्रकाश घाटपांडे
तात्यानू
राजौ
In reply to तात्यानू by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)
हा हा ! अरे
In reply to राजौ by प्रकाश घाटपांडे
यादगार व जी एस
यादगार
In reply to यादगार व जी एस by दिगम्भा
विनंती
सर्किट