Skip to main content

गाय कोडे २

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 01/06/2012 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
गाय कोडे २ : एका माणसाकडे १७ गायी असतात. त्याला ३ मुले असतात तो मरण्यापूर्वी मृयुत्युपत्रात खालीलप्रमाणे वाटप करतो.. पहिल्या मुलाला १/२ गायी दुसर्‍या मुलाला १/९ गायी आणि तिसर्‍याला १/३ गायी द्याव्यात.. गायी पूर्ण द्यावात. कापू नयेत. तर गायींचे वाटप कसे करावे?

वाचने 5767
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

१ माझी गाय घ्या एकुण झाल्या १८ पहिल्या मुलाला १/२ गायी - ९ गायी दुसर्‍या मुलाला १/९ गायी - २ गायी आणि तिसर्‍याला १/३ गायी द्याव्यात..- ६ गायी एकुण झाल्या १७ गाई पूर्ण दिल्या कापल्या नाहीत माझी गाय घेऊन चाललो सांजच्याला या दुद प्यायला केशर घालून

In reply to by नाना चेंगट

गायी पूर्ण द्यावात. कापू नयेत. आम्ही धन्य झालो!.. डोळे पाणावले!.. गो *** प्रतिपालकांचा विजय असो!!!!... :) :) ;)

In reply to by मृगनयनी

नमस्कार गोमाते.. ......... ^__^ ...........( oo )____ ............(_)_____)~~~ ...................||----w | .................. ||........||

In reply to by नाना चेंगट

माझी गाय घेऊन चाललो.
तरीच म्हटले "चेंगट" इतक्या सहजासह्जी काय द्यायला कसा काय तयार झाला बुवा?

In reply to by JAGOMOHANPYARE

म्होरल्या येळेला जरा झंगाट कोडं आणा... असलं पुचाट नको ;)

मी याच कोड्याचं एक गमतीदार उत्तर वाचलेलं आहे. त्यात एका हुशार माणसाने नानांनी दिलेलं उत्तर सांगितल्यावर मुलं तक्रार करतात की ही अशी नवीन गाय वगैरे आणायची नाही. मग तो माणूस म्हणतो ठीक आहे. त्या सगळ्या गायींना घेऊन एका कोरड्या नदीच्या पुलावर जातो. पहिल्या मुलाला १/२ गायी - १ गाय पुलावर आणि २ गायी पुलाखाली = ३ गायी दुसर्‍या मुलाला १/९ गायी - १ गाय पुलावर आणि ९ गायी पुलाखाली = १० गायी आणि तिसर्‍याला १/३ गायी - १ गाय पुलावर आणि ३ गायी पुलाखाली = ४ गायी एकूण १७ गायी.

In reply to by राजेश घासकडवी

हे जास्त 'कन्व्हिन्सिंग' वाटतं. :) नानाकडं गाय होती म्हणून बरं. इतरांनी काय करावं हा प्रश्न उरतोच ना? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरेच्या 'नाना'चे 'बापू' झालेले ठौक नव्हते. अवांतरः म्हणजे ते केशर घालून दूध प्यायला देणार ते शेळीचं होय. चान चान. आणि त्या चरख्यावर कातलेल्या सुताचं काय करणार?

In reply to by परिकथेतील राजकुमार

चालताना कुणाच्या खांद्यावर हात टाकतो नाना? स्वगतः अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम... प्यारे को सन्मति दे भगवान :)

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी, तुमचे उत्तर निश्चितच मस्त व गमतीदार आहे. मात्र मला अशी एक दाट शंका आहे की १/९ गायी ज्याच्या वाट्याला आल्या आहेत त्या मुलाने हे उत्तर शोधून काढले आहे - जेणेकरुन १७ गायींच्या फक्त १/९ इतपत हिस्सा वाट्याला आला असताना हे असे 'उत्तर' देऊन तो तब्बल १० गायी घेऊन जाऊ शकतो. - दिपोटी

In reply to by राजेश घासकडवी

पहिल्या मुलाला १/२ गायी - १ गाय पुलावर आणि २ गायी पुलाखाली = ३ गायी दुसर्‍या मुलाला १/९ गायी - १ गाय पुलावर आणि ९ गायी पुलाखाली = १० गायी आणि तिसर्‍याला १/३ गायी - १ गाय पुलावर आणि ३ गायी पुलाखाली = ४ गायी विषम वाटप झालय. दुसर्‍या मुलाला पहिल्या पद्धतीप्रमाणे दोनच गायी मिळत होत्या आता त्याला एकदम दहा मिळताहेत. नावडत्याचा एकदम आवडता झाला