गाय कोडे २ :
एका माणसाकडे १७ गायी असतात. त्याला ३ मुले असतात
तो मरण्यापूर्वी मृयुत्युपत्रात खालीलप्रमाणे वाटप करतो..
पहिल्या मुलाला १/२ गायी
दुसर्या मुलाला १/९ गायी
आणि तिसर्याला १/३ गायी द्याव्यात.. गायी पूर्ण द्यावात. कापू नयेत.
तर गायींचे वाटप कसे करावे?
वाचने
5808
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
१ माझी गाय घ्या एकुण झाल्या
१ माझी गाय घ्या
एकुण झाल्या १८
पहिल्या मुलाला १/२ गायी - ९ गायी
दुसर्या मुलाला १/९ गायी - २ गायी
आणि तिसर्याला १/३ गायी द्याव्यात..- ६ गायी
एकुण झाल्या १७
गाई पूर्ण दिल्या
कापल्या नाहीत
माझी गाय घेऊन चाललो
सांजच्याला या दुद प्यायला केशर घालून
ज ब री उत्तर नाना
In reply to १ माझी गाय घ्या एकुण झाल्या by नाना चेंगट
आणि काय म्हणणार..... :-)
अमृत
गायी पूर्ण द्यावात. कापू
In reply to १ माझी गाय घ्या एकुण झाल्या by नाना चेंगट
गायी पूर्ण द्यावात. कापू नयेत.
आम्ही धन्य झालो!.. डोळे पाणावले!.. गो *** प्रतिपालकांचा विजय असो!!!!... :) :) ;)
नमस्कार गोमाते...........
In reply to गायी पूर्ण द्यावात. कापू by मृगनयनी
नमस्कार गोमाते..
......... ^__^
...........( oo )____
............(_)_____)~~~
...................||----w |
.................. ||........||
माझी गाय घेऊन चाललो. तरीच
In reply to १ माझी गाय घ्या एकुण झाल्या by नाना चेंगट
तरीच म्हटले "चेंगट" इतक्या सहजासह्जी काय द्यायला कसा काय तयार झाला बुवा?
नानानी लगेच उत्तर दिले.
नानानी लगेच उत्तर दिले.
म्होरल्या येळेला जरा झंगाट
In reply to नानानी लगेच उत्तर दिले. by JAGOMOHANPYARE
म्होरल्या येळेला जरा झंगाट कोडं आणा... असलं पुचाट नको ;)
गमतीदार उत्तर
मी याच कोड्याचं एक गमतीदार उत्तर वाचलेलं आहे. त्यात एका हुशार माणसाने नानांनी दिलेलं उत्तर सांगितल्यावर मुलं तक्रार करतात की ही अशी नवीन गाय वगैरे आणायची नाही. मग तो माणूस म्हणतो ठीक आहे. त्या सगळ्या गायींना घेऊन एका कोरड्या नदीच्या पुलावर जातो.
पहिल्या मुलाला १/२ गायी - १ गाय पुलावर आणि २ गायी पुलाखाली = ३ गायी
दुसर्या मुलाला १/९ गायी - १ गाय पुलावर आणि ९ गायी पुलाखाली = १० गायी
आणि तिसर्याला १/३ गायी - १ गाय पुलावर आणि ३ गायी पुलाखाली = ४ गायी
एकूण १७ गायी.
क्या बात है।
In reply to गमतीदार उत्तर by राजेश घासकडवी
अरे व्वा! हे उत्तर मस्तं आहे.
+१
In reply to क्या बात है। by प्रभाकर पेठकर
हे वाचले नव्हते. गंमतीशीर आहे.
+२
In reply to +१ by रमताराम
+२
छान
In reply to गमतीदार उत्तर by राजेश घासकडवी
छान
हे जास्त 'कन्व्हिन्सिंग'
In reply to गमतीदार उत्तर by राजेश घासकडवी
हे जास्त 'कन्व्हिन्सिंग' वाटतं. :)
नानाकडं गाय होती म्हणून बरं. इतरांनी काय करावं हा प्रश्न उरतोच ना? ;)
खरे आहे.
In reply to हे जास्त 'कन्व्हिन्सिंग' by प्यारे१
नानाकडे दोन शेळ्या पण आहेत आणि एक चरखा पण आहे.
खी खी खी:
In reply to खरे आहे. by परिकथेतील राजकुमार
अरेच्या 'नाना'चे 'बापू' झालेले ठौक नव्हते.
अवांतरः म्हणजे ते केशर घालून दूध प्यायला देणार ते शेळीचं होय. चान चान. आणि त्या चरख्यावर कातलेल्या सुताचं काय करणार?
चालताना कुणाच्या खांद्यावर
In reply to खरे आहे. by परिकथेतील राजकुमार
चालताना कुणाच्या खांद्यावर हात टाकतो नाना?
स्वगतः अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम... प्यारे को सन्मति दे भगवान :)
गमतीशीर निश्चित आहे!
In reply to गमतीदार उत्तर by राजेश घासकडवी
राजेश घासकडवी,
तुमचे उत्तर निश्चितच मस्त व गमतीदार आहे.
मात्र मला अशी एक दाट शंका आहे की १/९ गायी ज्याच्या वाट्याला आल्या आहेत त्या मुलाने हे उत्तर शोधून काढले आहे - जेणेकरुन १७ गायींच्या फक्त १/९ इतपत हिस्सा वाट्याला आला असताना हे असे 'उत्तर' देऊन तो तब्बल १० गायी घेऊन जाऊ शकतो.
- दिपोटी
पहिल्या मुलाला १/२ गायी - १
In reply to गमतीदार उत्तर by राजेश घासकडवी
पहिल्या मुलाला १/२ गायी - १ गाय पुलावर आणि २ गायी पुलाखाली = ३ गायी
दुसर्या मुलाला १/९ गायी - १ गाय पुलावर आणि ९ गायी पुलाखाली = १० गायी
आणि तिसर्याला १/३ गायी - १ गाय पुलावर आणि ३ गायी पुलाखाली = ४ गायी
विषम वाटप झालय. दुसर्या मुलाला पहिल्या पद्धतीप्रमाणे दोनच गायी मिळत होत्या आता त्याला एकदम दहा मिळताहेत. नावडत्याचा एकदम आवडता झाला
छान छान
छान छान
वा!
बैलोबांची कोडी अन उत्तरं वाचून मजा आली!
-रेडा
कोडी
आता 'गॅल' कोडी येउ द्यात.
आँ?
In reply to कोडी by विनायक प्रभू
या वयात? काकूंना बोलवा रे कोणीतरी! ;-)
बिरबल?
बिरबल आणि हत्ती अशा रचनेत हे कोडं वाचलं होतं ...
नाना बिर्बल अनि
प्यारे अकबर