बुवांचा जन्म
एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे.
प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार
-------------------------
गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ
त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही. एकदम थंड डोक्याचा माणूस; आमच्यासारखा डोक्यावर पडलेला नाही. मी त्याला आधीपासूनच मानत होतो.
"उद्या रात्री चांदनीबारवर भेटायला ये." देशमुख्याने सांगितलं तशी मला वाटलं माझी मस्करी करतात की काय? देशमुख्या आणि बार? आम्ही त्यातले नाही...मला वाटलं की देशमुख्या माझी गंमत करतोय पण तो सिरिअस होता. मी येतो म्हणून फोन ठेवला.
बारवर जायचंय या विचारात मला रात्रभर झोप लागली नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी मी बारवर जायची पूर्ण तयारी केली. टाइट्ट् जीन्स, लेदर जर्किन, पॉलिश्ड शूज, परफ्यूम लावून मी निघालो आणि चांदनीबार बाहेर देशमुख्याची वाट बघत उभा राहिलो. १५-२० मिनिटांनी देशमुख्या समोर येऊन उभा राहिला तसा मी मनात चरकलो. देशमुख्याचा रंग रापला होता, मिशा वाढल्या होत्या. त्यांना तेल लावून त्याने त्या कुर्रेबाज वळवल्या होत्या. अंगही भरल्यासारखं वाटत होतं. मी त्याच्यासमोर अगदीच किरकोळ भासत होतो.
आम्ही दोघे आत गेलो. पायर्या चढताना माझा तोल गेला आणि मी पुन्हा एकदा डोक्यावर आपटलो. डोळ्यासमोर काजवे चमकत होते. देशमुख्याने मला सावरले आणि बुवांच्या अवतारातील देशमुख्याने मला खरे दर्शन दिले. विजेचा लोळ माझ्या
सर्वांगातून वाहत गेला. देशमुख्याच्या रुपात बुवा समोर उभे होते. बुवा कोण? बुवा माझ्या मोबाइलमध्ये बंद आहेत. हे आता माझ्याकडून लिहून घेत आहेत तेच बुवा! मला ज्यांनी बारवर बोलावलं तेच बुवा. आयुष्याची खरी ओळख करून दिली, स्वत्वाची ओळख दिली तेच बुवा! आता माझ्या लक्षात येत होतं... बारवर बोलावून बुवा माझी परीक्षा घेत होते. पण ते तेव्हा मला कळलं नाही. ते कळलं पुढे गुरु पोपटेंद्रनाथ यांच्यामुळे. त्याबद्दल पुढे येईलच...
सध्या माझे डोळे हे लिहिताना भरून आले आहेत. मी अश्रू ढाळतो आहे, नाक वाहतं आहे. थांबा हं!! जरा पुसून घेतो.
आम्ही बारमध्ये घुसलो. देशमुख्याची खूप वट दिसत होती. त्याने दरडावून विचारलं तशी बार बाउन्सर बाजूला सरले. मी लाजत लाजत त्यांना थँक्यू म्हटलं. "घ्यायची का थोडी?" देशमुख्याने विचारलं तशी मी मान डोलावली. देशमुख्याने जाऊन दोन ग्लास लिंबूपाणी आणले. सोबत वेज बर्गरही होता. बुवा माझी परीक्षा घेत होते पण ते मला अडाण्याला तेव्हा जाणवले नाही. मी गुपचूप ग्लास खाली केला. आता मला लागली होती. बुवांनीच मला टॉयलेटचा रस्ता दाखवला. "जपून जा, मी तुझ्या पाठीशी आहे." असा गुरुमंत्र दिला.
मी उरकून बाहेर आलो तशी बारमधली लाइट गेली होती. अंधारात दोन बाया मराठीत बोलत होत्या. मला घरातच असल्यासारखे वाटले. देशमुखबुवांनी मला गाठले. आपल्याला गप्पा मारायला ही जागा उत्तम आहे असे म्हणून बारमधल्या दोन स्टुलांवर आम्ही बसकण मारली. बुवांनी खिशातून बाटली काढली. तिला साफसूफ केली. दोन थेंब बोटावर घेऊन डोळ्यांवर लावले. नस्ती शंका नको. एरंडेल तेलाची बाटली होती. मगासचा बर्गरही तिथेच होता. मी गुपचूप राहून बघत
होतो. तेवढ्यात एक नखरेल ललना समोर उभी राहिली. "इथे बसू नका, तुमच्यासाठी पेश्शल सिटींग अरेंजमेन्ट आहे" असे म्हणत बळेच आम्हाला बारच्या आतल्या अंगाला घेऊन गेली.
तिथे आधीच दोनजण बसले होते. त्यापैकी एकाने काही ऑर्डर द्यायची का असे विचारले तेव्हा देशमुखबुवांनी सोबत आणलेला बर्गर दाखवला आणि एखादा तुकडा त्यांना हवा नको असे विचारले. मला बर्गरचा एक ढलपा तोडून खायला घातला आणि आम्ही गप्पा मारत बसलो. मध्यरात्र उलटून गेली होती. पोपटेंद्रनाथांचा विषय कसा निघाला कोण जाणे पण तेही बारमध्ये हजर होते हे देशमुख्याला माहित होते. देशमुख्या मला त्यांच्या स्टुलापाशी घेऊन गेला. पोपटेंद्रनाथ
परदेशातून भारतात आलेले. तेथे ते राजेंद्रनाथ या कलाकाराची मिमिक्री करत. देशमुख्या आणि गुरूमाऊलींनी खूप गप्पा मारल्या. मी फक्त ऐकत होतो. पहाट होत आली.
पोपटेंद्रनाथांना थोडा कोक हवा होता. कोक म्हणजे कोकाकोला नै कै! बुवा बाबांना गांजा, चरस, भांग लागते ती नशा करण्यासाठी नाही तर प्रेम, करुणा, शांती हे भाव जगात पसरवण्यासाठी. भांगेच्या नशेत असणारा मनुष्य तीच तीच
गोष्ट पुन्हा करतो. गाणं गात असेल तर गाणंच गात राहतो. नाचत असेल तर नाचत राहतो. म्हणून सतत प्रेम करत राहण्यासाठी; चावट माणसांनो थिंक स्ट्रेट, "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या हेतूने पोपटेंद्रनाथ कोक मागत
होते. आता तुम्ही म्हणाल; हा झंप्या इतकं पुराण का लावतोय? सोप्पं आहे, मलाही कोक हवा होता आणि कोकाकोला नको होता. आता तुम्ही म्हणाल झंपू चांगला आहे, झंपू वाईट आहे, झंपू हाताबाहेर गेला आहे, झंपू ऍडिक्ट आहे.
हू केअर्स? इतरांना फाट्यावर कसे मारायचे त्याचे फुल्ल ट्रेनिंग मी इथेच घेतलं आहे. इथे म्हणजे बारमध्ये नै कै पण मला नाव काय ठेवायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. झंपू म्हणा की झंप्या, माझ्यावर काय झाट परिणाम होत नाही.
हं! तर मी कोक ट्राय करत असताना देशमुख्या दूर उभा होता. सज्जन लेकाचा! त्याला वासानेही चढत असावी. अचानक पोपटेंद्रनाथांची आपली आयडी पुढे केली. त्यावर गुर्जी असे लिहिले होते. मला कळून चुकले. यालाच परकाया प्रवेश
म्हणतात. मी जाम टरकलो. आता पोपटेंद्रनाथांची कित्ती कित्ती रुपं पाहायची याचे गणित सोडवू लागलो.
"चल हे सगळं काय ते मला एक्स्प्लेन कर. नाहीतर गपगुमान माझा शिष्य हो." खरं सांगतो दुसर्यांच्या शरीरात का शिरायचे हेच मला कळले नव्हते. मी हात जोडले आणि पाया पडलो. शिष्य होतो म्हणालो. मला असं आढळलं की पूर्ण
शरीरभर, नव्हे माणसाच्या अस्तित्वभर संवेदना निर्माण करु शकणारा शरीरातला एकमेव शक्तीशाली पॉइंट म्हणजे मेंदू. तो जेवढा रिकामा असेल त्याच्या प्रमाणात छोट्या संवेदनाही अधिक जाणवणार. बाकी मग त्यामधून निर्माण होणारी पुढची लफडी आपण मनोविकार दूर करणार्या मानसोपचारी डॉक्टरांच्या रुपात समाजात पहातोच. जाऊ द्या, किती ताण त्या मेंदूला. मी टण्णकन उडी मारून गुरूमाऊलींचे पाय पकडले.
मग पोपटेंद्रनाथ मला खोपच्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला दीक्षा दिली. तिथून परतताना कमनीय बांध्याच्या तीन-चार बाला धुंद होऊन मस्त नाचत होत्या. पोपटेंद्रनाथ म्हणाले, "वाकून नमस्कार कर. त्या बघ रंभा, मेनका आणि उर्वशी. बाई म्हणजे आई."
मी चकीत झालो पण काही न बोलता त्यांना वाकून नमस्कार केला. त्या आपल्याच धुंदीत होत्या. तेवढ्यात देशमुख्या समोर आला. "हा बघ साक्षात् बापूंचा आठवा अवतार." खुद्द पोपटेंद्रनाथांनी देशमुख्याला वाकून नमस्कार केला तसा देशमुख्या सटपटला पण मी त्याचे पाय घट्ट धरून ठेवले. पोपटेंद्रनाथांनी जोरजोरात हवेत हात फिरवून एक अंगठी
काढली आणि माझ्या बोटात चढवली. एक विलक्षण तेज माझ्या चेहर्यावर पसरले.
"जा बच्चा! देशमुख बुवांची सेवा करण्यात जन्म व्यतीत कर पण सेवेचा मेवा मिळायला लागला की लग्न कर." पोपटेंद्रनाथ म्हणाले आणि झटक्यात अंग वाकवत नाचणार्या रंभा, मेनका, उर्वशींकडे वळले.
"मातांनो या बालकाला थोडी अक्कल द्या. देशाप्रती त्याला त्याची जबाबदारी समजवा. बच्चा! तुझी वेळ येईल तेव्हा वीर्याचा अखेरचा थेंबही दान करून संतती जन्माला घाल." मी वेड्यासारखा पोपटेंद्रनाथांकडे बघत राहिलो. "ए गधड्या तू विकी डोनर पाह्यला नाय काय?" देशमुखबुवांनी तोंड उघडले त्यासरशी मला साक्षात्कार झाला. पोपटेंद्रनाथांच्या जटील वाणीचा किती सुलभ अर्थ देशमुखबुवांनी लावला होता. मी भाग्यवान. साक्षात् बापूंचा आठवा अवतार माझ्यासोबत होता आणि मी त्याला ओळखलं नव्हतं पण आता ते अज्ञानाचे पडदे डोळ्यांवरून हटले होते. मी ढसढसा रडू लागलो.
"देशमुख बुवा. मला तुमच्या चरणी जागा द्या." जगातील किती मोठ्या सत्याचा आज मला उलगडा झाला होता. जगाला हव्या हव्याशा वाटणार्या बुवांचा जन्म आज झाला होता.
उपसंहारः आता माझे चांगले चालले आहे. दर बुधवारी देशमुख बुवांचे प्रवचन असते. ते म्हणतात की "आपल्याला काही कळत नाही." पण त्यांना सर्व कळते हे आम्ही भक्तगण जाणून आहोत. प्रवचनकेंद्राबाहेर मी टपरी टाकली आहे. उदबत्त्या, हार, फुले, श्रीफळ. बक्कळ धंदा होतो. त्या लाथमारू सायबाच्या बैलाला...शिवाय बाहेरचे उत्पन्न आहेच.. तेच हो "झंप्या डोनर" झालो ना आता.वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाण्ण!
बुवांचा जन्म गुरुकृपेनं
अशक्य आहेस तु !!!
पुन्हा एकदा डिस्क्लेमर
हा लेख खुप छोटा झाला आहे.
ही ही ही
लई भारी लिहिलंय, चला आता
=))
स्मायली खुप गोड आहे.
माझे व्यक्तिगत मत
मस्तच......
_/\_
नाही
आईच्या गावात बाराच्या भावात
>>>बुवांनी खिशातून बाटली
जमलं नै राव.
सहमत
मस्त लेख =))) हहपुवा झाली.
अजून चांगले जमले असते. पण
;)
हा हा हा
>>>अतिशय घृणास्पद विडंबन
द शो मस्ट गो ऑन !!!
भिकार
विडंबन? पाहुणा ? साप ? काठी
परा आणि आदि या दोघांशी
सध्यातरी वाचनमात्र सदस्य कोण
वाचले
अंहं! नाही जमलं यार! विशेष
आरेच्च्य्या माझा पर्तीसाद
विजुभौ उगाच कांड्या पिकवू
एक्झॅक्टली... विजुभाऊंचा
माझा प्रतिसाद हा होता? कोण
जरा मध्येच घुसतो त्याजबद्दल
+१
सदर कथा वाचून आता काही दिंवस
कथा कळली नाही, आवडली नाही.
अजिबात जमलेले नाही.
काही गरज होती का?