✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी दुकानदारीचा एक नमुना

ब
बाळ सप्रे यांनी
Tue, 05/29/2012 - 14:36  ·  लेख
लेख
पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा. माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता. एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्‍हाईक आलं पॅटीस घ्यायला. "पॅटीस आहेत का?" - गिर्‍हाईक "संपले" - काउंटरवरील इसम गिर्‍हाईक निघून गेलं. "आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र "छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम "मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र "अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24719 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

किस्सा एकुन हसावे की रडावे

सुहास..
Tue, 05/29/2012 - 14:45 नवीन
किस्सा एकुन हसावे की रडावे तेच कळेना ! हा किस्सा एकलात का ? १ ) एक मनुष्य " गोखले ", साधारण चार दिवस " चितळेंच्या " दुकानात भाकरवडी च्या लाईनीत उभे रहात होते. चार दिवस " भाकरवड्या संपल्या " हा बोर्ड पाहुन परतत होते.. पाचव्या दिवशी त्यांनी विचारले " तुम्ही जास्त का बनवित नाही ? " घ्यायच्या तर घ्या असे उत्तर मिळाले ..त्यावर त्यांनी उत्तर दिले, चांगले सगळ्या दुकाना एकु जाईल अश्या आवाजात ..." अहो माझा प्रश्न नाही, माझा कुत्रा तुमच्या भाकरवड्यांशिवाय दुसरे काहीच खात नाही " =)) =)) =))
  • Log in or register to post comments

तुम्हि सांगितलेला किस्सा एक

उदय के'सागर
Tue, 05/29/2012 - 15:06 नवीन
तुम्हि सांगितलेला किस्सा एक नंबर.. अर्थात हा झाला गमतीचा भाग पण खरंच अश्या माज लोकांची (जसे हे चितळे) अशीच मारायला हवी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

नायगावकर काकांचा प्रतिसाद...

भारी समर्थ
Tue, 05/29/2012 - 18:01 नवीन
अशोक नायगावकरांच्या मुखपुस्तिकेच्या भिंतीवरील याच विषयावरील तर्कट- ते चितळे बंधू मिठाईवाले एक्सप्रेस हायवेवरच का नाही लिहून ठेवत की बाबा 'बाकरवडी संपली'. म्हणजे पुढे यायलाच नको मुंबईकरांना..... -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

तर्कट

रमताराम
Tue, 05/29/2012 - 19:39 नवीन
म्हटलात ते बरंच झालं. मला नेहमी वाटतं एवढी नावे ठेवण्यात आपली शक्ती दवडण्यापेक्षा नॉन्-पुणेकर सरळ पर्याय का शोधत नाहीत. तुमच्याही डोस्क्याला त्रास नाही नि आमच्या. इथे सालं कोणी हळदीकुंकू देऊन बोलावल होतं का, या आमची.... जाऊ दे. आम्हाला आमचे चितळे बंधू राहू द्या तुम्ही तुमचे कोण राजपुरोहित का कोण आहेत त्यांना मांडीवर घेऊन बसा. फुकाचे टीआरपी साठी जिलब्या कशाला पाडताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

खी खी खी

चिंतामणी
Tue, 05/29/2012 - 20:40 नवीन
ररा- लै भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

'बाकरवडी संपली' असे पदार्थ

रेवती
Tue, 05/29/2012 - 19:45 नवीन
'बाकरवडी संपली' असे पदार्थ हमखास संपणारे व्यवसाय आपण करू शकाल काय? नावं ठेवण्यापेक्षा असा व्यवसाय करून दाखवा. मुंबईतच सुरु करा, पुण्यापर्यंत यायची गरज पडू नये. जे शहर आवडत नाही तिथे जायचा विचार कशाला करावा? आवडत नाही तिथे जायचं आणि नंतर आवडलं नाही म्हणून ओरडत फिरायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

मला कळत नाही चितळ्यांकडच्या

सूड
Tue, 05/29/2012 - 22:11 नवीन
मला कळत नाही चितळ्यांकडच्या बाकरवड्या घ्यायला पुण्यात कशाला यायला हवं ? चितळे बाकरवडीचा पुडा सुद्धा मिळतो की !! पाव किलो बाकरवडीसाठी पुण्यात यायचा मूर्खपणा करावाच का ? पूर्वी चितळ्यांबद्दलचं माझं मत म्हणजे नावडतीचं मीठ अळणी आणि आवडतीचा.... असो असं होतं. आता चितळे दूधाशिवाय आमची सकाळ सुरु होत नसल्याने मत बदललंय. ;) आणि नायगावकरांचं फार मनावर घेऊ नका, शेवटी ते हास्यकवी आहेत. अशी वाक्य नाही केली तर टाळ्या कशा मिळणार ? एका कार्यक्रमात वेस्टर्न लाईनच्या ट्रेनमधल्या गर्दीला नावं ठेवत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

अगदी अगदी. चितळ्यांच्या

रेवती
Wed, 05/30/2012 - 00:18 नवीन
अगदी अगदी. चितळ्यांच्या बाखरवड्यांसाठी मलाही पुण्यात जायला लागत नाही. इथच हिरव्या देशातल्या भारतीय ग्रोसरीत नको इतक्या मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन

जेनी...
Wed, 05/30/2012 - 00:24 नवीन
हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन ग्रोसरि शॉप मद्ध्ये मिळतात चितळ्यांच्या भाकरवड्या पण. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

समजलं तुम्हाला काय म्हणायचय

रेवती
Wed, 05/30/2012 - 00:26 नवीन
समजलं तुम्हाला काय म्हणायचय ते. माझ्या काही ओळखीच्यांना त्या तितक्या आवडल्या नाहीत पण सुदैवाने मला चांगल्या मिळाल्यात दोन तीन वेळा तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पण.

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 00:57 नवीन
तुसुद्धा हिरव्या देशात आहेस हे एव्हाना माहीत झाले आहे सगळ्यांना. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मी कश्यासाठी म्हणतीये आणि

रेवती
Wed, 05/30/2012 - 04:34 नवीन
मी कश्यासाठी म्हणतीये आणि चिंतुकाकांचं वेगळंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

रेवा आज्जी चिं तु काका अस्सेच

जेनी...
Wed, 05/30/2012 - 04:47 नवीन
रेवा आज्जी चिं तु काका अस्सेच आहेत गं तु लक्श नको देऊस :D बाकी चितळयान्च्या नावाने घेतलेल्या भाकरवडीने पूरती नीराशा केली होती :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

चितळयान्च्या नावाने घेतलेल्या

सुहास..
Wed, 05/30/2012 - 07:23 नवीन
चितळयान्च्या नावाने घेतलेल्या भाकरवडीने पूरती नीराशा केली होती >>> चितळ्यांच्या णावाने घेतलेल्या बाकरवडीने पुरती निराशा केली होती. बाकी चालु द्यात शुध्दलेखण-अट्टाहासी पुलापलीकडचा पुणेकर वाशोजीराव पंत आमची कुठेही शाखा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

सुआस राव मोबायिलवरुन लिलओ

जेनी...
Wed, 05/30/2012 - 09:33 नवीन
सुआस राव मोबायिलवरुन लिलओ :( त्यामुले असा जाला माजा :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

रेवती मॅडम

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 08:50 नवीन
लिहीताना थोडेसे चुकलेच. हा पोस्ट पूजासाठी होता हे कुठे इंडीकेट झाले नाही. त्यामुळे घोटाळा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा हा. असो. आम्ही मॅडम

रेवती
Wed, 05/30/2012 - 20:20 नवीन
हा हा हा. असो. आम्ही मॅडम केंव्हापासून झालो कोणास ठाऊक? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मला पण चांगलाच अनुभव आहे.

सूड
Wed, 05/30/2012 - 12:43 नवीन
मला पण चांगलाच अनुभव आहे. त्यांच्याकडचं गाईचं तूप म्हणजे आहाहा. पॅक उघडला की नुसता घमघमाट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म्....बर्‍याच वेळा लोकं

Dhananjay Borgaonkar
Tue, 05/29/2012 - 14:47 नवीन
हम्म्....बर्‍याच वेळा लोकं स्वरचित किस्से पुण्यात घडलय या नावाखाली खपवुन टाकतात. अहो त्यांना जरा प्रसिद्धी नको? ;) बाकी नावाला जागुन किस्सा सांगितलात :D
  • Log in or register to post comments

जाम हसलो.. एकंदर प्रकरण, पुणे

शैलेन्द्र
Tue, 05/29/2012 - 14:49 नवीन
जाम हसलो.. एकंदर प्रकरण, पुणे पाहता, अशक्य नाही..
  • Log in or register to post comments

मला तर अशक्य वाटते ,बहुतेक तो

पियुशा
Tue, 05/29/2012 - 14:55 नवीन
मला तर अशक्य वाटते ,बहुतेक तो इसम त्या दुकानात काम करणारा असावा अन त्याची मालकाशी काहीतरी खुन्नस असाव्वी ;) पुणेकर असा स्वतः च्या पायावर स्वतःच धोंडा नाय पाडुन घेणार ;) ( आता पळ्ळा )
  • Log in or register to post comments

आंतरजालावरील एका मिसळीसाठी

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/29/2012 - 14:56 नवीन
आंतरजालावरील एका मिसळीसाठी प्रसिद्ध कट्टा वजा संस्थळातील हा किस्सा. माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या चावडीवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता. एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक सदस्य आलं धागा टाकायला. "धागा टाकू का?" - सदस्य "बिनधास्त" - चावडीवरील इसम सदस्य टाकून गेलं. "आज पुन्हा आली वाटतं जिलबी?" - मित्र "हो!! वैताग आलाय ह्या जिलब्यांचा आणि ट्यार्पी खेचायच्या प्रयत्नांचा " - चावडीवरील इसम "मग त्या सदस्याला का सांगितलत की बिनधास्त टाक म्हणून?" - मित्र "अहो सारखे डायरीयावाले येत असतात काही ना काही लेखनकंडू शमवायला. आम्हाला जरा समतोल असण्याचे कौतुक नको ?" - चावडीवरील इसम
  • Log in or register to post comments

याला म्हणतात अस्सल पुणेकर !!

सुहास..
Tue, 05/29/2012 - 15:04 नवीन
याला म्हणतात अस्सल पुणेकर !! आता काय म्हणता अजातशत्रुघ्न सिन्हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा

चिंतामणी
Tue, 05/29/2012 - 16:13 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प-या प-या लेका कुठ कुठ अन

jaypal
Tue, 05/29/2012 - 17:56 नवीन
काय काय म्हणुन फेडशील Image removed.Image removed." सुहास जबरी किस्सारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फेडशील की फोडशील?

प्रास
Wed, 05/30/2012 - 11:45 नवीन
फेडशील की फोडशील? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

नेटीव्ह

स्मिता.
Tue, 05/29/2012 - 23:49 नवीन
हे आहे खरे नेटिव्ह (native) पुणेकर... टू बी प्रिसाईझ USSP कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा ___/\___

जेनी...
Wed, 05/30/2012 - 01:34 नवीन
परा ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे असले कुजकत हल्कत मिपाकर

मृत्युन्जय
Wed, 05/30/2012 - 10:15 नवीन
हे असले कुजकत हल्कत मिपाकर असतात म्हणुनच मिपाचे नाव बदनाम होते. जरा जिल्ब्यांचा अस्वाद घ्यायला शिका म्हणाव. आणी हो नविन सदस्यांना जरा प्रोत्साहन द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

"धंदांत" प्रायश्चित्त दिले

बॅटमॅन
Tue, 05/29/2012 - 15:41 नवीन
"धंदांत" प्रायश्चित्त दिले पाहिजे अशा लोकांना!!! (अर्थात त्यालापण ते "बरी ब्याद मिटली" असे म्हणतील हेवेसांनल ;))
  • Log in or register to post comments

१ लिटर दुध द्या.. आज दुध

अविनाशकुलकर्णी
Tue, 05/29/2012 - 19:09 नवीन
१ लिटर दुध द्या.. आज दुध नाहि.. का?? म्हशी ना सुटी नको का एखादा दिवस?..
  • Log in or register to post comments

ओ काका

इरसाल
Tue, 05/29/2012 - 19:22 नवीन
हे चालेल का गि: मटण द्या एक किलो दु: आज मटण नाही गि: का ? दु: आज बोकड PML (Pre-Murder Leave) वर आहे.उद्या या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

चितळेंचे कौतुक

आशु जोग
Tue, 05/29/2012 - 20:57 नवीन
चितळेंचे कौतुक करणारे आणि चितळेंच्या प्रगतीने पोटदुखी होणारे अशा २ पोटजाती आहेत असे निरीक्षण नोंदवतो -- विचार करा पटेल आपल्याला
  • Log in or register to post comments

चितळे हे फक्त प्रतिक आहे.

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 01:01 नवीन
पुण्याचे कौतुक करणारे आणि पुण्याच्या प्रगतीने पोटदुखी होणारे अशा २ पोटजाती आहेत असे निरीक्षण नोंदवतो (विचार कर. पटेल तुला.;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

आत्ममग्नतेचे निकृष्ट

बॅटमॅन
Wed, 05/30/2012 - 01:33 नवीन
आत्ममग्नतेचे निकृष्ट उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अगदी बरोब्बर!

श्रीरंग
Wed, 05/30/2012 - 07:55 नवीन
अगदी बरोब्बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पुण्याच्या प्रगतीने पोटदुखी

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/30/2012 - 11:33 नवीन
पुण्याच्या प्रगतीने पोटदुखी होणारे
आमचे प्यारे काका कुठे गेले ??? मागे मुंबईची प्रगती म्हटल्याने त्यांचा पोटशूळ उठला होता, आता त्याचे मत जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहे मी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पुण्याची प्रगती (?)

प्रणवजोशी
गुरुवार, 02/04/2016 - 15:21 नवीन
कशात प्रगती करतय पुणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

हे विचारायला हा धागा वर

असंका
Fri, 02/05/2016 - 16:11 नवीन
हे विचारायला हा धागा वर काढलात!!!! पण मजा आली...काय एकेक प्रतिसाद!! निरागसता जपा...एक नं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रणवजोशी

मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय

शिल्पा ब
Tue, 05/29/2012 - 22:06 नवीन
मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय अन इतक्या वेळी खरेदी केलीये पण असे लोकं कध्धीच पाहण्यात आलेले नाहीत...अगदी चितळ्यांच्या दुकानातसुद्धा. खरं खोटं देव जाणे.
  • Log in or register to post comments

शिल्पा ब

jaypal
Tue, 05/29/2012 - 22:48 नवीन
केवळ नशिबवानच नसुन तुमची पुर्व "पुण्याई" चांगली आहे म्हणुन असेल कदचीत Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आपली किर्ती/धाक आधीच तिकडे पोचला असेल.

एक
Tue, 05/29/2012 - 23:28 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हम्म.. तुमच्या उगाच सलगी

श्रीरंग
Wed, 05/30/2012 - 00:35 नवीन
हम्म.. तुमच्या उगाच सलगी दाखवायला गेलेल्या मित्राला पुणेरी दुकानदारानी कसा ** बनवला / खोटा किस्सा सांगून मित्रानी तुम्हाला कसा ** बनवला, असा एकंदरीत किस्सा आहे तर!!
  • Log in or register to post comments

पोटजात

आशु जोग
Wed, 05/30/2012 - 01:15 नवीन
काय करणार ? काही जणांना असते अ‍ॅलर्जी चितळे, गोखले, गाडगीळ(सराफ) मेहेंदळे(हिंदुस्थान बेकरी) अशा नावांची ... यांना परांजपे स्कीम्सवालेही 'फ्लॅट संपले' ची पाटी दाखवतात चालायचच
  • Log in or register to post comments

आवरा!! आपल्या

बॅटमॅन
Wed, 05/30/2012 - 01:22 नवीन
आवरा!! आपल्या एक्स्ट्रापोलेशनचे वारू माध्वीभुक्त होऊन सुसाट सुटले आहेत त्यांना आवरा,नाहीतर... नाहीतर काय? काही नाय, तुम्हाला ट्रोलराज म्हटल्या जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

+१

आबा
Wed, 05/30/2012 - 15:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पुण्याच्या दुकानदारांचे

मृत्युन्जय
Wed, 05/30/2012 - 10:19 नवीन
पुण्याच्या दुकानदारांचे असंख्य किस्से आहेत. त्यांना आणि त्यांच्यामुळे पुण्याला आणि पुणेकरांना नाके मुरडणार्‍यांना इतकेच सांगु शकतो: Image removed.
  • Log in or register to post comments

संतोष बेकरी का? तिथे असे

किचेन
Wed, 05/30/2012 - 14:43 नवीन
संतोष बेकरी का? तिथे असे किस्से वरचेवर घडत असतात.
  • Log in or register to post comments

संतोष बेकरी का? पुण्यात अशा

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/30/2012 - 14:53 नवीन
संतोष बेकरी का?
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे ? आणि ती पॅटिससाठी प्रसिद्ध आहे ? ऐकावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आपटे रस्त्यावर आहे ही बेकरी.

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 15:01 नवीन
सवड कधी आहे सांग. एकदा घेउन जातो. म्हणजे तुझा अभ्यास वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा