Skip to main content

इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे !

लेखक धुमकेतू यांनी बुधवार, 23/05/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ? शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ? पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ?

वाचने 39696
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by भरत कुलकर्णी

संपादकीय इशारा हा प्रतिसादात धरायचा का? नसेल तर मग पहिला माझा नम्बर पेढे खाऊ शंभर :)

भगवान विष्णुचा द्वापारयुगातील भाऊ "बलराम"/ "बळीराम" याला देखील शेतकर्‍याचे प्रतीक मानले गेले आहे. त्रेतायुगातील "राम" द्वापारयुगात "कृष्ण" झाला. तर "लक्ष्मण" "बळीराम" म्हणून (रोहिणीच्या पोटी) जन्मला.. तो कृष्णाचा मोठा भाऊ होता. बळीरामाकडे मुसळ, नान्गर इ गोष्टी असायच्या. त्यामुळेच बळीरामास "हलधर" असेही म्हटले जाते. युद्ध करताना देखील बळीराम मुसळ्,नान्गर इ. शेतीउपयोगी गोष्टींचाच जास्त वापर करायचा. त्यामुळे कदाचित "बळीचे राज्य येऊ दे" मधला "बळी" हा कृष्णाचा भाउ "बलीराम"ही असू शकतो... कारण वामनामुळे चिरन्जीवी झालेल्या बळीचा शेतीशी काही विशेष सम्बंध असल्याचे सन्दर्भ कुठे सापसत नाही. फक्त "या वामनाने पावन झालेल्या बळीच्या राज्यात सर्व आबादीआबाद होते" येवढीच माहिती कळते... तर कृष्णाचा भाऊ- बलीराम याचा शेतीशी सम्बन्ध असल्याचे जास्त सन्दर्भ सापडतात... त्यामुळे तो बळी हाच्च!.. असे वाटते!! :) * सम्बंधितांचे उचित प्रतिसाद अपेक्षित! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

आम्ही काही जुन्या स्टोर्‍यांमध्ये, पाळण्यांमध्ये वगैरे बलरामा'चा उल्लेख 'बळीराम' असा वाचला आहे आणि ऐकला आहे. त्यामुळेच आमच्या मनी शन्केची पाल चुकचुकली... तसेच बलराम/ बळीराम याच्या हाती नेहमी नांगर धरलेले असायचे.. म्हणून याचा आणि शेतकर्‍यांचा जास्त सम्बंध वाटतो.. :) यु पी. कडे वगैरे.. बलराम असा उच्चार असला तरी पूर्वीचे मराठी लोक "बळीराम" किन्वा "बळराम" असा उच्चार करायचे / करतात.. .. .. .. :|

In reply to by मृगनयनी

शेतकर्‍याला बळीराजा हा शब्द सर्व प्रथम म. फुले यांनी वापरला . बहुतेक शेतकर्याचा आसूड या ग्रंथात. चुभूदेघे.

In reply to by प्रचेतस

मला वाटते.. म. फुल्यांच्या आधीपासून "इडा पीडा टळू दे, बळीराज्य येऊ दे" हे वाक्य प्रचलित होते.. कारण सर्व मराठी घरांमध्ये पूर्वापार बलिप्रातिपदेला बलीपूजनाच्या वेळी हे वाक्य म्हटले जाते. :) म. फुल्यांनी म्हटले असते.. तर कदाचित सर्व घरांमध्ये ते इतके प्रचलित झाले नसते.. :|

In reply to by मृगनयनी

बळीराम म्हणजे बलराम , तर मग बलिप्रतिपदेचा अन बलरामाचा काय संबंध?

In reply to by मृगनयनी

बळीराम म्हणजे बलराम , तर मग बलिप्रतिपदेचा अन बलरामाचा काय संबंध?