लाच लाच लाच...
जिथे तिथे चहुकडे द्यावी लागते लाच.
जन्म घेण्यासाठी मुलगा की मुलगी ह्याची द्यावी लागते देवाला नवसाची लाच.
जन्म नोंदणी करण्यासाठी लागते द्यावी लाच.
शाळेत दाखल करण्यालापण द्यावी लागते लाच.
पोरग परीक्षेत पहिल याव म्हणुन आई बापाची पोराला बक्षिसरुपी लाच.
नोकरी लावायला मग घेतो साहेब लाच.
काम करुनही ओफीसात चांगली मिळत नाही बढती ,
बढती साठी मग द्यावी लागते लाच.
देवाच्या देवळात वियापी स्पेशल पासाची लाच.
डॉ़क्टररुपी देवालाही हवी असते लाच.
सैनिकांच्या शवपेटीत असतेकी हो लाच.
गांधी टोपी खाली दडलेली असते की हो लाच.
टीव्ही असो कि पेपर असो मिडियावाल्याना बातमी लपवायला
किंवा दुसर्याची बातमी ढापायला द्यावी लागते लाच.
गुंडापासुन रक्षण करायला पोलिस खा़की मागते लाच,
पोलिसातील गुंडापासुन वाचवायला राजकारणी खादी मागते लाच.
सरकारी नोकराना हवी असते टेबलाखालुन लाच
मुलीच्या लग्नात नवरदेवा घेतो राजरोस हुंड्याची लाच.
आ़जकाल तर मेल्यावरही नीट जळण्यासाठी द्यावी च लागते लाच.
मरण्याच्या नोंदीसाठी घेतात की हो लाच.
जगण्यातुन सुटलो तरी छळते ही लाच.
अशी लाच लाच लाच, देता देता इतराना ,
आपणही अडलेल्या गरजु लोकांकडुन घेतो की लाच.
लाच लाच लाच.
सगळी कडे नुसती लाच
लाच लाच लाच.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1898
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
!
लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच.
प्रभाकर पेठकर साहेब, वाह वाह. काय मस्त लिहिल आहेत.
In reply to लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच, लाच. by प्रभाकर पेठकर
निशा, आशावादी रहा !
झाले का सुरू "जैलब्य"
In reply to निशा, आशावादी रहा ! by चौकटराजा
चौकटराजांची प्रतिक्रीया