Skip to main content

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 26/05/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या तीन्ही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. शेवटचे दोन डाव उरलेत! आज ११ वा आणि परवा १२ वा. दोघांची गुणसंख्या समसमान आहे. कोंडी कोण फोडू शकेल? फोडू शकेल का? की गेम टायब्रेकरमधे जाईल? अशा प्रश्नांचं मोहोळ उठलंय. आज बोरिस पांढरा आहे. बघूयात सामना ११ वा. -चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12113
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

उशीर झाला. क्षमस्व! आज बोरिसने पुन्हा डी४ पासून सुरुवात केली. आनंद बहुदा स्लाव डिफेन्सला वैतागला असावा. त्याने डाव निम्झो इंडियनकडे नेलाय. आनंद वेगाने खेळतोय. केवळ १ मिनिटात आनंदने ८ खेळी केल्या आहेत! सातव्या खेळीला उंट डी ७ अशी वेगळीच खेळी त्याने केली आहे. बोरिस विचारात पडलाय. त्याच्या घड्याळात १० मिनिटे होऊन गेली आहेत.

बोरिस आपली खेळी करून फेर्‍या मारायला निघून जातो. या उलट आनंद आपली खेळी झाल्यावरही प्रतिस्पर्ध्याच्या समोर शांतपणे बसून राहतो बहुतेक वेळा. एक प्रकारे आपल्या अस्तित्त्वाचा दबाव टाकतो समोरच्यावर. :) नवव्या खेळीला बोरिसने पंधरा मिनिटाहुन अधिक काळ घेतला आहे. आनंदची उंटाची खेळी त्याला चांगलीच बुचकळ्यात टाकणारी होती अशी दिसते.

चेस्डम वर ग्रँ.मा. Arkadij Naiditsch म्हणतोय : I guess Anand and particularly his team took a deep breath after losing the opening duel in so many games in a row. Finally they managed to surprise the very well prepared Boris Gelfand.

In reply to by रमताराम

बरोबर आहे. पण ह्या सरप्राईजचा काहीतरी वापर करुन घे म्हणावं. आज "ब्लॅक्मॅजिक" बघायला मिळेल का?

In reply to by चतुरंग

वापरलेल्या वेळेत तब्बल ४० मिनिटांचा फरक आहे! याचा फायदा उठवायला हवा विशीने. या आधी मला आनंदचा वजीर सी-७ मधे येऊन एफ पट्टीतील घोड्याच्या सहाय्याने बोरिसच्या राजाच्या कोपर्‍यात घुसण्याची धमकी देऊन (आधी सी पट्टीतील उंटाने कदाचित बोरिसचा एफ पट्टीतील घोडा घेऊन) बोरिसला स्वतःची लाईन खेळण्याची संधी न देता प्रतिक्रियात्मक खेळायला लावेल असे वाटले होते. पण वजीर ए पट्टीत नेऊन बोरिसची मोहरी त्याबाजूला - राजापासून दूर - खेचण्याचा प्रयत्न चालू आहे असे दिसते.

वजीर ऐ५ खेळावं किंवा एफ वरील घोडा जी४ खेळावा म्हणजे आनंद मध्यपटावर आला आहे, असे समाधान मला मिळेल. पण आपल्या समाधानासाठी खेळतं कोण ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही सूक्ष्मरूपात जाऊन त्याच्या कानात सांगताय काय? ;)

In reply to by रमताराम

रंगाशेठ आणि तुम्ही मला सांगा अजून दोन ते तीन खेळ्यात आनंद काही जब्रा चाली चालला तर डावावर त्याची पकड बसेल नै तर चला मागे आणि करा बचाव अशी स्थिती येईल. काय म्हणता ?

In reply to by धनुअमिता

छे! नाव सोडा हो! रंगोपंतांना सांगून थकलोय! आणि ते दुसरे हुशार सद्गृहस्थ... जौद्या! चांगली मॅच चालली आहे... तीच बघू आपण! ;)

In reply to by धनुअमिता

बुद्धीबळ समजून घेण्यासाठी टेंपरवारी हा दुवा देतो. दुव्यावर प्यांदी, घोडे,उंट, वजीर, आणि राजा कुठे चालतात त्याची माहिती आहे. म्याच संपल्यावर रंगाशेठ आणि रमतारम आपणास बुद्धीबळ समजून सांगतीलच ? -दिलीप बिरुटे

In reply to by धनुअमिता

chessgames.com ह्या संकेतस्थळावर जाऊन बघा. बरीच माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या आसपास कोणी खेळणारे असेल तर त्याच्याबरोबर खेळायला लागणे. अगदी कोणी लहान मुले खेळत असली तर त्यांना भलताच उत्साह असतो ते लगेच खेळायला तयार होतात. चटकन शिकवतातही! ;)

थोडी मारामारीची शक्यता दिसते. मी वर म्हटलेली शक्यता तुम्हा आली आहे. फक्त वजीर सी पट्टी ऐवजी एच पट्टीतून एच पट्टीतल्ल्या प्याद्यावर हल्ला करायला टपून बसलाय. बोरिसला घोड्याला वाचवून आनंदचा डाव उधळायला काहीतरी करावे लागणार.

In reply to by रमताराम

वजीर पांढर्‍या राजाच्या बाजूला आणलाय, आता घोडा जी४, आणि वजीर एच२ चे प्यादे घेऊन राजाला शह अशी धमकी आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण बोरिस कसा जाऊ देईल? ;)

खोलवरचा प्लॅन असा की जर घोडा ई५ आला तर सरळ व्जिराव्जिरी करुन मोकळे व्हायचे म्हणजे पांढर्‍याचा कणाच मोडतो. डाव बरोबरीकडे गेला तरी चालेल.

In reply to by चतुरंग

>>>>घोडा ई५ आला तर सरळ व्जिराव्जिरी करुन मोकळे व्हायचे अगदी गुरुच आहात. झाली वज्रावज्री. आता बघा कंटाळवाणी बरोबरी ? -दिलीप बिरुटे

एक हत्तीची पोजिशनल मूव केली, सध्याच्या स्थितीवर थेट परिणाम न करणारी. बहुधा आनंदच्या दृष्टीने सध्यची स्थिती इक्वलिब्रियमची असावी. त्यामुळे ती फोडायची जबाबदारी बोरिसवरच टाकली त्याने.

चेसबाँबवर चॅट करणारी काही पब्लिक भलतं मजेदार आहे. परवाच्या म्याचच्या वेळी एकजण म्हणाला (स्वैर अनूवाद माझा) अल्लाह आज आनंदला हरु दे. तर दुसरा लगेच म्हणाला की, येशू आणि हिंदू देवतांच्या मधे अल्लाह आज न्यूट्रल आहे. हाहाहा. [प्रतिसाद आक्षेपार्ह तर नैना] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक सुटलेले असतात जाम! :) परवा आलेले हे कार्टून बघा

२० मिनिटात १७ खेळ्या! उलट बोरिसने तब्बल १ तास २० मिनिटे घेतली आहेत. जाम टाईम प्रेशरमधे येणार आज तो आणि चटकन चाली कराव्या लागून डाव बरोबरीत जाईल! :( किंवा चूक केली तर मग आनंद सोडणार नाही त्याला!!

बरोबरी करण्याच्या दृष्टिने हालचाली सुरू केल्या. वजीरावजीरी करण्याचा प्रयत्न आहे आता.

गेलफंडचे आव्हान - मारून दाखव घोड्याला. आता वजीरा-वजिरी? झालीच!

Re8? पण कापाकापी चालली आहे.

In reply to by विसुनाना

हत्ती डी-३ मधे येऊन पळवून लावेल त्याला. हाती काही पडणार नाही. वर बोरिसचा एक हत्ती आडवा बाहेर पडायला मदत होईल, तो अ‍ॅक्टिव होईल. शिवाय आपलाच मागचा उंट ब्लॉक करेल तो. :( मागे प्याद्याने उंटावर हल्ला करण्याची शक्यता खुली होईल हा एक दुय्यम फायदा आहे. पण त्याच्या पुढे कसा उपयोग करून घेता येईल ते आताच समजत नाही मला. :(

In reply to by विसुनाना

तुम्ही पण सूक्ष्मात? :) आनंदने ऐकले तुमचे. आता बोरिस आमचे ऐकतोय का ते पाहू.

In reply to by रमताराम

बोरिसने ऐकले की आमचे. :) छ्या: आता अजिबात सूक्ष्मात जाणार नाही, आपोजिशनला कशाला फायदा करून देऊ.

बोरिसचे दोन्ही हत्ती नि एक उंट मागे अडकल्याने आनंदचा उंट नि घोडा नाचणार मध्यावर. बघू हत्तीवर हल्ला करून फायदा उठवतो का ते.

बा***. त्या झैरातींच्या. आता दोन्ही खेळाडूंना लाईव पहायला मिळाले असते तर बरे झाले असते. सालं १५-१५ मिनिटे झैराती. मुडदा बशिवला त्या आर्ट ग्यालरीचा.

In reply to by रमताराम

>>>>> मुडदा बशिवला त्या आर्ट ग्यालरीचा. हाहाहाहाहा. सालं ऐन म्याच रंगात यायला लागल्यावर आपल्याला उगा आर्ट ग्ल्यालरीत बसवून ठेवतात. :) बाकी, डावाची बरोबरीच होईन असं वाटतंय. -दिलीप बिरुटे

खेळी २३: प्यादे सी-५, उंट जी-३ यातून बोरिसच्या डी पट्टीतील हत्तीला धोका निर्माण करून हटवण्याचा प्रयत्न होतो, नि तो हटला की बोरिसचे डी प्यादे मटकावता येते. बोरिसचा पांढरा उंट हत्तीच्या मागे अडकल्याने आनंदच्या उंटावर हल्ला करू शकत नाही.

१७ खेळ्यांना फक्त २५ मिनिटे आहेत! :( टाईमप्रेशर काय करते ते बघूयात. आता हत्तीने डी३ प्यादे मारले तर बी७ वरचे प्यादे पडते आणि बोरिसचा हत्ती सातव्या पट्टीत येतो.

ड्रॉ. आनंदने का मान्य केले देव जाणे. हॅ.

ड्रॉ!!!??/ हॅट साला...कसला बाद गेम झाला राव..

In reply to by चतुरंग

पुढचा डाव आनंद पांढर्‍याने खेळतोय तेंव्हा पाहू...