Skip to main content

भोकराचे लोणचे

लेखक जागु
Published on बुधवार, 23/05/2012
लागणारे साहित्य : पाव किलो भोकरे १ मध्यम आकाराची कैरी २ चमचे लाल तिखट ३ चमचे मिठ दिड चमचे मेथी ७-८ चमचे मोहरी पूड ३ चमचे हळद १/२ छोटा चमचा हिंग २ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी पाककृती: ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. :हाहा: * भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा. हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे :स्मित: (कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही :हाहा:) * एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. :हाहा: आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो. मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.) आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा. फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही. ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या. हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा. एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही. हेहे झाले लोणचे तयार ७-८ दिवसांनी मुरेल मग खायला घ्या.

वाचन संख्या 10329
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

भोकर नाही, भेकर असतं ते !! त्याच रेशिप्यांच्या ढिगात ही हटके रेसिपी बघून बरं वाटलं. भोकरं फक्त ऐकूनच माहीती होती आता पाह्यली पण.

विसुनाना तुमच्या खरड मध्ये पाठवू का ? प्यारे भेकर प्राण्याचे नाव असते. पण पियुषा आता तुला ज्ञान झाल आहे भोकराच.

शिर्षक वाचताच वाटलं हि पाकृ नक्कीच जागुतैची असणार :) लोणचं हा प्रकार विशेष अवडत नसुनहि हि पाकृ/फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे.....!!!

झकास. आमच्या एका नातेवाईकाच्या घरासमोर भोकराचं झाड होतं. तेव्हा ही भोकराची भाजी, भोकराचं लोणचं हे प्रकार खाल्ले होते.

सुड, उदय, सुहास धन्यवाद. वल्ली भोकराची भाजी पिठ पेरून केली जाते.

लोणचं बघून तोंपासु!! भोकराचं लोणचं आधी ऐकलंय पण कधी पाहिलं नव्हतं, जागुताईमुळे खूप न पाहिलेल्या गोष्टी बघायला मिळतात :)

व्वा व्वा जागु तै,काय मस्त दिसतय लोणचं...! मसाला चोळलेल्या फोडि पाहुन,दिल पानी पानी हो गया... एकदम नविन आणी मस्त प्रकार :-) भोकरांवरुन एक अठवलं, पिकलेली भोकरं खाताना त्या बी च्या चिकटपणा मुळे तोंडातुन बी जमिनीवर टाकताना,ती अशी काही हळू खाली यायची कि त्यामुळे आंम्ही त्याला लिफ्ट म्हणायचो :-)

मस्त...लहानपण आठवले....कैर्या, भोकरे खाणे .....

खूपचं चविष्ट दिसत आहे लोणचं ...भोकराचे लोणचे खूप खूप आवडतं :)

मस्तं. भोकराचं लोणचं मस्तच लागतं. तसंच, नेपच्याचे लोणचेही करतात. ते माहीत आहे का? तेही छान असते.

In reply to by जागु

मलाही नक्की माहित नाही. लहानपणी खाल्लं आहे. कदाचित भोकरं, (गुजराथीतील) गुंदं, आणि नेपच्या हे एकच फळ आणि वेगवेगळी नांवे असावीत.

आम्च्याकडे डोळे विस्फारुन/वटारुन एखादी गोष्ट पहाणार्‍याला म्हणतात " काय भोकर नं मायक डोया करी देखी र्‍हायना ? " आणी ज्याचे डोळे वाजवीपेक्शा मोठे त्याला " भोकर्‍या"