लागणारे साहित्य :
पाव किलो भोकरे
१ मध्यम आकाराची कैरी
२ चमचे लाल तिखट
३ चमचे मिठ
दिड चमचे मेथी
७-८ चमचे मोहरी पूड
३ चमचे हळद
१/२ छोटा चमचा हिंग
२ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी
पाककृती:
ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. :हाहा:
* भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा.
हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे :स्मित: (कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही :हाहा:)
* एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. :हाहा:
आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो.
मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.)
आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा.
फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही.
ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या.
हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा.
एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.
हेहे झाले लोणचे तयार ७-८ दिवसांनी मुरेल मग खायला घ्या.
वाचन संख्या
10329
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ख ल्ला स !! ( भोकरे कुठे
आमच्या उरणमध्ये मिळतात भोकरे.
भोकरे जाऊ द्या
In reply to आमच्या उरणमध्ये मिळतात भोकरे. by जागु
भोकर हे प्राण्याचं नाव पण
भोकर नाही, भेकर असतं ते !!
In reply to भोकर हे प्राण्याचं नाव पण by प्यारे१
द्येवा , माझ काय खर नाही ब्वॉ
विसुनाना तुमच्या खरड मध्ये
धन्स सूड अॅन्ड
In reply to विसुनाना तुमच्या खरड मध्ये by जागु
शिर्षक वाचताच वाटलं हि पाकृ
ओह्ह्ह.. जबरी एकदम
झकास. आमच्या एका
सुड, उदय, सुहास
जूनच्या मध्यांतरात चांगलीच १५
मस्त
पिंगू तोपर्यंत भोकरे
मस्त
रंग छान आलाय
अहाहा!
पिकलेली भोकरे खायची मला माहित आहे
व्वा व्वा जागु तै,काय मस्त
मस्त...लहानपण
खूपचं चविष्ट
पूजा, रेवती, पैसा, वेताळ,
वॉव.मस्तच !
मस्तं लोणचं.
प्रभाकरजी नेपचा म्हणजे नेमक
मलाही ठाऊक नाही.
In reply to प्रभाकरजी नेपचा म्हणजे नेमक by जागु
मस्त मस्त मस्त लोणचे
अरे वा डोळ्यांना भोकराची उपमा