साहित्य:- १मध्यम आकाराची मेथीची जुडी (गड्डी),१वाटी ओलखोबरं, मुठभर दाणे,१ वाटी सांडगे , १टीस्पुन लाल तिखट, १टीस्पुन कांदालसुण मसाला, १टीस्पुन हळद,१टीस्पुन हिंग, १टीस्पुन मोहरी, २टेबलस्पुन तेल,चविपुरते मीठ २ मध्यम आकाराचे कांदे.
कृती :- मेथीची गड्डी निवडुन धुवुन घेतली . पाणि निथळल्यावर बारीक चिरुन घेतली.कांदे बारिक चिरुन घेतले. दाणे भाजुन कुटुन घेतले.
एका कढईत २ टेबलस्पुन तेल घालुन सांडगे थोडेसे परतुन घेतले.
थोडेसे गार झाल्यावर थोडे ठेचुन घेउन थोडेसे पाणि घालुन कुकरमधे शिजवुन घेतले.
सांडगे परतलेल्या तेलात मोहरी, हिंग , हळद घालुन फोडणी करुन
त्यात चिरलेली मेथी घालुन परतुन घेतली.
नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा घालुन परतुन घेतले .
कांदा आणि मेथी शिजल्यावर त्यात शिजवलेले सांडगे , ओल खोबरं,तिखट, कांदालसुण मसाला,मीठ घालुन परतुन घेतले.
शेवटी दाण्याचे कुट घालुन भाजी एकत्र करुन घेउन एक वाफ आणली .
सांडगे -मेथी भाजी तयार.

वाचने
13800
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!! मस्तच...
हे सांडगे घालून वांग्यांची भाजी पण मस्त लागते
In reply to व्वा!! मस्तच... by मुक्त विहारि
जरूर...
In reply to हे सांडगे घालून वांग्यांची भाजी पण मस्त लागते by चिंतामणी
आजच्या तारखेला बरोबर तिन वर्षे झाली वायदा करुन.
In reply to जरूर... by मुक्त विहारि
मस्त. एकदम चविष्ट पाकृ.
+१
In reply to मस्त. एकदम चविष्ट पाकृ. by गणपा
भाजी मस्त झाली असणार याची
फोटो तेवढे अजुन थोडे स्पष्ट हवे होते.
In reply to भाजी मस्त झाली असणार याची by मृत्युन्जय
सांडगे घालून केलेल्या
छान!
वाह!
छान पाकृ आहे पण एक
ज ह ब ह र ह द ह स्त!
+१
In reply to ज ह ब ह र ह द ह स्त! by सोत्रि
छानच ह
सांडगे हे अगदी नेहमीच आवडतात.
सांडगा हा पदार्थच मुळात आवडत
झ का स !
सांडगे हा प्रकारच मुळात
सांडगे म्हणजे काय??
बरोबर.
In reply to सांडगे म्हणजे काय?? by अर्धवटराव
कच्ची पपई घालुन करतात ते
In reply to सांडगे म्हणजे काय?? by अर्धवटराव
वा छान आत्ताच सांडगे आणले