Skip to main content

सांडगे-मेथी भाजी

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 05/05/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १मध्यम आकाराची मेथीची जुडी (गड्डी),१वाटी ओलखोबरं, मुठभर दाणे,१ वाटी सांडगे , १टीस्पुन लाल तिखट, १टीस्पुन कांदालसुण मसाला, १टीस्पुन हळद,१टीस्पुन हिंग, १टीस्पुन मोहरी, २टेबलस्पुन तेल,चविपुरते मीठ २ मध्यम आकाराचे कांदे. कृती :- मेथीची गड्डी निवडुन धुवुन घेतली . पाणि निथळल्यावर बारीक चिरुन घेतली.कांदे बारिक चिरुन घेतले. दाणे भाजुन कुटुन घेतले. एका कढईत २ टेबलस्पुन तेल घालुन सांडगे थोडेसे परतुन घेतले. थोडेसे गार झाल्यावर थोडे ठेचुन घेउन थोडेसे पाणि घालुन कुकरमधे शिजवुन घेतले. सांडगे परतलेल्या तेलात मोहरी, हिंग , हळद घालुन फोडणी करुन त्यात चिरलेली मेथी घालुन परतुन घेतली. नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा घालुन परतुन घेतले . कांदा आणि मेथी शिजल्यावर त्यात शिजवलेले सांडगे , ओल खोबरं,तिखट, कांदालसुण मसाला,मीठ घालुन परतुन घेतले. शेवटी दाण्याचे कुट घालुन भाजी एकत्र करुन घेउन एक वाफ आणली . सांडगे -मेथी भाजी तयार.

वाचने 13800
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

हे सांडगे घालून वांग्यांची भाजी पण मस्त लागते...

In reply to by चिंतामणी

पण सध्या कॅमेरा नाही आहे ही पहिली सबब आणि सौदीत सांडगे, सोडे ई. मराठी वाळवणे मिळत नाहीत ही दूसरी सबब.. त्यामूळे थोडा धीर धरा....(निदान १ वर्ष)

In reply to by मृत्युन्जय

हो बरोबर .पण काय करणार चांगला केमेरा हरवल्या मुळे मोबाईलवर फोतो काढावे लगतात.

सांडगे घालून केलेल्या कुठल्याही पाकृ चविष्टच असतात. ही पण त्याला मुळीच अपवाद नाही. - पिंगू

छान कॉम्बिनेशन आहे!

सांडगे-मेथी छानचं लागेल :) दिसत पण सुरेख आहे सांडगे घालून केलेली आमटी खूप आवडते :)

छान पाकृ आहे पण एक प्रश्न. फोडणीत आधी कांदा नाही का परतायचा? मेथी त्यामानाने पटकन शिजते. अर्थात भाजी आयती मिळत असेल तर तुम्ही आधी काय परतलेत याकडे मी लक्ष देणार नाही.;)

मला सांडगे अतिशय प्राणप्रिय आहेत! त्यात त्याला दिलेली मेथीची जोड, इथे चेन्नैत जीव कासावीस करून गेली :( 'चिंकाकू', पुण्यात आल्यावर सांडगे खायला घरी नक्की येणार बघा :) - ('सांड'गा) सोकाजी अवांतर: ५० फक्त, चमच्यांची मांडणी बघून आता 'सानिकास्वप्नील'यांच्या चमच्यांपेक्षा, जवळच्या जवळ पुण्यात पर्याय उपलब्ध झाला आहे ह्याची नोंद घावी ;)

सांडगे हे अगदी नेहमीच आवडतात. मी ते कांद्यावर परतुन करते पण असे मेथी टाकुन पहिल्यांदाच ऐकले. करुन बघायला पाहिजे.

भाजी खामंग दिसते आहे. करंटेपणाने आम्ही ही भाजी खाण्याची संधी सोडली हा गुन्हाच झाला. असो...

In reply to by अर्धवटराव

पण सांडगे बनवायचे अजून प्रकार आहेत. कोहळा किंवा कलींगडाचा पांढरा गर वापरूनसुद्धा सांडगे बनवतात. पण त्यातील घटक पदार्थ वेगळे असतात.