कॉकटेल लाउंज : अ डे अॅट बीच
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अॅट बीच”
पार्श्वभूमी:
उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.
मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा 'उतारा' म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. :)
कृती:
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.
आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, 'सनराइज'चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.
चला तर मग, अ डे अॅट बीच तयार आहे. :)

| प्रकार | मलिबू कोकोनट रम आणि आल्मन्ड (बदाम) लिक्युअर बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| मलिबू कोकोनट रम | 1.5 औस (45 मिली) |
| अमारेतो लिक्युअर (Amaretto Liqueur) | 0.5 औस (15 मिली) |
| ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) | 10 मिली |
| संत्र्याचा रस | |
| बर्फ | |
| स्ट्रॉ | |
| ग्लास | कॉलिन्स किंवा हाय बॉल |
कृती:
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.
आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, 'सनराइज'चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.
चला तर मग, अ डे अॅट बीच तयार आहे. :)

वाचने
6726
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कॉकटेल
नेहमी प्रमाणेच सुंदर
In reply to नेहमी प्रमाणेच सुंदर by मुक्त विहारि
??
In reply to ?? by सोत्रि
मुक्तविहारी असेल सौदीत... तू
In reply to मुक्तविहारी असेल सौदीत... तू by प्यारे१
आयचा घो खरंच की! घ्या, हे असे
In reply to आयचा घो खरंच की! घ्या, हे असे by सोत्रि
परोपकारी बंडू!
ज ब र ड स्ट
फोटो मस्त!
एकदम झकास. आता एकदा मॉकटेल पण
मस्त
मॉकटेल... मॉकटेल पायजे अता...
मस्तच
काक-टेल
In reply to काक-टेल by हृदय भेदी
ह्म्म्म...