✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

अ — अमितसांगली, Mon, 05/21/2012 - 08:39
भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही, थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... उसालाही दर नाही, कापसालाही भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही, हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास, मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास, नाही राहिली आता मला, कशाचीच आस, दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

प्रतिक्रिया द्या
90472 वाचन

💬 प्रतिसाद (9)

छान लिहिलंस अमित.

प्रचेतस
Mon, 05/21/2012 - 08:42 नवीन
छान लिहिलंस अमित.
  • Log in or register to post comments

मनापासून आभार ....

अमितसांगली
Mon, 05/21/2012 - 08:54 नवीन
तुम्ही या कवितेचे पण विडंबन कराल असे गृहीत धरूनच हि कविता पोस्ट केली होती...किंबहुना मी स्वताच कशा प्रकारे याचे विडंबन होईल याचाही विचार केला होता...माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद प्रतिसाद....... खूप खूप धन्यवाद सर ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे मी सरसकट विडंबनं करत नाही

प्रचेतस
Mon, 05/21/2012 - 09:02 नवीन
अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

प्रतीक्षेत .......

अमितसांगली
Mon, 05/21/2012 - 09:05 नवीन
त्यांच्याच प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@अरे मी सरसकट विडंबनं करत

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/21/2012 - 17:21 नवीन
@अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. >>> तरी लोक मग अठवण का काढतात बरं? :-D @विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. >>> घ्या...! धंदा डुबला,तर भागिदार कसे अंग झटकतात. दु...दु... अ. ;-) आप कितना भी मू फेर लो,मगर लोग तो याद रखेंगे ही... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छानच.. काय प्रतिक्रिया देणार???

अमृत
Mon, 05/21/2012 - 09:31 नवीन
विदर्भात लहानाचा मोठा झाल्याने हे सगळं आजू बाजूला घडताना पाहिलं आहे :-( केवळ ५-१०हजाराच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तर कित्येक उदाहरणं आहेत... अशा संवेदनशील विषयाचे मिपावर नक्कीच विडंबन होणार नाही याची खात्री बाळगू शकतोस... अमृत
  • Log in or register to post comments

बिकट परिस्थिती....

अमितसांगली
Mon, 05/21/2012 - 09:39 नवीन
वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी दुष्काळी भाग ८ वर्षे जवळून अनुभवला आहे...पाण्याची, विजेची टंचाई, महागाई आणि पैशाची कमतरता....अतिशय बिकट परिस्थिती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

अमितसांगली साहेब, सुंदर पण सत्य असलेली कविता.

निश
Mon, 05/21/2012 - 17:40 नवीन
अमितसांगली साहेब, सुंदर पण सत्य असलेली कविता.
  • Log in or register to post comments

छान कविता.

पैसा
Mon, 05/21/2012 - 20:10 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा