परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र - मैत्रिणी, नाती, त्यांचे संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र-मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतीलच असेही नाही." मी म्हटले, " असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch" तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात ..this is life dear :) "
मी सुरुवतीला त्याच्याशी अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG, no,’ खरच नाही !! strange but truth" मग? किती सहज स्विकारतो ना आपण आयुष्यातले बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक, मित्र -मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?) किती वरवरची नाती असतात सगळी???
ह्या गतीमान आयुश्यात आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने फोन नाही केल मग मी का करायचा? नाही तर नाही, गेली उडत. वेळ आहे कोणाकदे इथे गुंतुन पडायला. का विचर असे बदलत जातात?? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समजत नसते का आपल्याला? की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO मुळे, कारण काहीही असले तरी परीणाम एकाच होतो तो म्हणजे, एक नात संपत ... का? कसे? कधी, कोणाचे चुकले? हे न कळताच नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या-माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch ... यावर संभाषण संपते. आधी आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा, मग काही महिन्यातून एकदा, या वेगात बोलण्यातले अंतर वाढत जाते. त्या बोलण्यात संवाद मात्र हरवलेला असतो; शिल्लक असते ती औपचारीकता! फक्त चौकशी, मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड. हे समजत असते दोघींना, तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू .
असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय असुच शकत नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही शिकवण्यासाठी , घडवण्यासाठीच येत असतो. :) ते वाक्य होते ....
"माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......
वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ! मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचाच्या अस्वस्थ 'क्षणांत' अडकून रहायचे? ते सुंदर क्षण जपायचे आणि हा अस्वस्थ क्षण .. तोही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला. हा आकार नीट बघायचा आणि स्विकारायचा, तो सृष्ठीचा एक नियम म्हणुन! ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे,
मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची. मग द्रुश्तिकोनच बदलून गेला. मन आणि नजर दोन्हि मोकळे झाले, आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही.
नाही का??? :) :) :) :) so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच, नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील !
अश्या बर्याच रेषा अजून "रेघोटी"ला छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या :)
पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि "रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल :) :) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत.
थोडक्यात काय yet more to come !!!!!!! .......
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2690
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेघोट्या आवडल्या.
रेशा किती सुंदर लिहीले आहे
नाती आणि ओळखी..
सुंदर लेख आणि सुंदर प्रतिक्रिया..
In reply to नाती आणि ओळखी.. by प्रभाकर पेठकर
कारण नाते तुटलेले नसते. फक्त
In reply to नाती आणि ओळखी.. by प्रभाकर पेठकर
wtf?
लेखन आवडले!
धन्यवाद प्रतिक्रिया आणि
छान!!
छान आहे