Skip to main content

सिंड्रेला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 19/05/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसात मॅक्रो काढला नव्हता. तसे फुलाचे मॅक्रो काढायचा कंटाळा आला होता. तेवढ्यात एका मित्राच्या किचेनमधे हा काचेचा छोटा बूट दिसला. त्याला म्हटले देतोस का हा एक दिवस ? घेतला आणि काही फोटो काढले...त्यातील हा एक... फोटोला नाव दिले आहे "सिंड्रेलाच्या बेड्या". श्री. जयपाल यांनी picsizer हे सॉफ्टवेअर सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यात फोटो अजिबात खराब होत नाही. उदा. वरील चित्र १४ mb चे आणि आता आहे ९० kb चे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9126
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

फोटोची बॅकग्राउंड वेगळी हवी होती, तसा पुन्हा प्रयत्न केला तर आणखी सुरेख होईल. कॅमेरा कोणता आणि अ‍ॅपर्चर, शटरस्पिड, झूमिंग काय ठेवलंय?

In reply to by संजय क्षीरसागर

फोटोची बॅकग्राउंड वेगळी का हवी होती ? हा फोटो बघणार्‍यांपैकी लोकांमधे आपण पहिलेच असे सांगत आहात म्हणून विचारतोय. मी ही बॅकग्राउंड मुद्दाम अशी ठेवली आहे.

In reply to by प्यारे१

नाय हो, सौंदर्याचा नजरीया वेगळा आहे त्यामुळे `अंदाजे बयां और ' http://www.misalpav.com/comment/reply/21681/397376 आहे

बॅकग्राउंडची मराठी अक्षरं, त्यांचे केशरी, काळे आणि ग्रे रंग सिंड्रेलाच्या (निळ्या पारदर्शक काचेच्या बुटाच्या) नजाकतीला स्युट होत नाहीत असं वाटतं. तुम्ही ती बॅकग्राउंड मुद्दाम तशी ठेवली त्याचं कारण काय आहे? आणि कॅमेरा कोणता आणि अ‍ॅपर्चर, शटरस्पिड, झूमिंग काय ठेवलंय? याची पण उत्सुकता आहेच. पिक सायजरनं काय काम केलय ते सांगीतलत तर आणखी आनंद होईल

अच्छा ! तो फोटो काढताना आलेले विचार असे.... सुंदर बूट, स्त्री सौंदर्य.....जुनाट कल्पना, एंटिक...रंग.... आणि तिच्या पायातील बेड्या.... म्हणून ही बॅकग्राउंड... मॅक्रो आहे. रींग वापरून काढला आहे. लेन्स प्राईम आहे. कॅमेरा ५० डी. बाकिचे आत्ता देऊ शकत नाही पण नंतर देऊ शकेन.

In reply to by जयंत कुलकर्णी

झालं ना क्लिअर? सौंदर्यासक्ती कमालीचीये ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून असे वेगळे प्रतिसाद असतात त्यात कुणाची खेचायचा प्रयत्न कधीच नसतो (कारण ते पुन्हा असौंदर्यात्मक होतं ) . इतर गोष्टी तुम्हाला वेळ झाल्यावर जरूर कळवा.

मस्तचं फोटो :)

////झालं ना क्लिअर? सौंदर्यासक्ती कमालीचीये ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून असे वेगळे प्रतिसाद असतात त्यात कुणाची खेचायचा प्रयत्न कधीच नसतो (कारण ते पुन्हा असौंदर्यात्मक होतं )//// हे खेचाखेचीचे काही कळले नाही......मला असे काही वाटले नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

(>हा फोटो बघणार्‍यांपैकी लोकांमधे आपण पहिलेच असे सांगत आहात) पण तुम्ही > `मला असे काही वाटले नाही' म्हटल्यामुळे बरं वाटलं!

काय 'बूटी'फूल फटू आलाय.

In reply to by परिकथेतील राजकुमार

////आ हा हा हा ///// परा असा प्रतिसाद देतो की साला याला काय म्हणायचे आहे ते समजतच नाही. आता हेच बघा... (आ) हा हा हा....विकट हास्य.... आता काय करायचं....

In reply to by जयंत कुलकर्णी

ते 'आ हा हा हा' म्हणजे 'आ हा हा' मध्ये एक 'हा' वाढवला आहे. 'आ हा हा' पेक्षा देखील अधिक चांगली अनुभूती आली म्हणून एक 'हा' जास्ती. ;) बाकी आमच्या मनातला प्रश्न विचारल्याबद्दल श्री. प्यारे १ ह्यांचे २दा आभार.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आभाराबद्दल आभारी आहोत... अर्थात मुद्दा तो नाही. ;) पण त्यांनी चक्क नकार दिलाय रे! एकक्षेत्राधिकार असा विखुरताना पाहून हृदय पिळवट्ल्या गेले की! आता रे ????????

In reply to by प्यारे१

आता संपादित प्रतिसाद वाचलात की पुन्हा `दिलके तार' जुळून येतील

बूट मस्त आहे. आणि फोटो पण आवडला.

फोटो खूप आवडला. 'सिंड्रेलाच्या बेड्या' हे नांवही चपखल वाटले.