टवाळा आवडे विनोद ???
टवाळा आवडे विनोद ???
आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.
स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत.
आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले.
टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता.
वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल.
मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच.
खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत.
हे कुठे तरी थांबले पाहीजे.
महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.
प्रतिक्रिया
त्या काळातले व्यंग चित्र
मस्त
वेल नीट पाहता ते कार्टुन
सहमत आहे...माझ्या सुमार
हे पुस्तकात प्रथम स्पष्ट केले
मागे चाबूक हातात असलेले
मागे चाबूक हातात असलेले नेहरु
मला सुध्दा हे चित्र योग्य
>मागे चाबूक हातात असलेले नेहरु नसले असते तर फार बरे झाले असते
http://ncert.nic.in/NCERTS/te
@वेडाआहेसकारे..
हम्म..
नेहरुन् चा अपमान झाला तर चालेल पण
हायला..
सर्व प्रतिसादकर्त्याना धन्यवाद.
>आता काही लोकांच्या मते
एकंदरीत
एकाही लिंकेवरचे चित्र मलातरी
नशिबवान...
चला या निमित्ताने...
१९६० मधली व्यंगचित्रे आत्ता
ती कशी खटकल?
अजुन ६० वर्शानी
अजुन ६० वर्शानी
भारत
एकदम पटले
१०० प्रतिसाद
जामोप्या, शंभरी गाठली, की धागाकर्त्याची शंभरी भरली.?
लोकशाहि च्या आयचा घो
Pagination