✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)

ध
धनंजय यांनी
Tue, 03/10/2009 - 09:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5469 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

सुरेख

सहज
Tue, 03/10/2009 - 09:43 नवीन
विस्तृत लेख, दुवे, संगीत सगळेच छान. अजुन नीट समजुन घेत आहे.
  • Log in or register to post comments

असेच बोल्तो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/10/2009 - 10:43 नवीन
विस्तृत लेख, दुवे, संगीत सगळेच छान. अजुन नीट समजुन घेत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभिजात संगीत

सुनील
Tue, 03/10/2009 - 11:06 नवीन
अभिजात पाश्चात्य संगीत म्हटले की मला दिल चाहता है मधील आमीर खानची किंवा प्रिटी वूमन मधील जुलीया रॉबर्ट्सची आठवण येते! (साधरणपणे अशीच अवस्था अभिजात भारतीय संगीत ऐकतानाही होते!) जे काही चाललय ते उच्च आहे पण आपण तितके उच्च नाही. समजून घ्यायची इच्छा आहे पण समजावून सांगणारं कोणी नाही, अशी काहीशी अवस्था होते. संगीतढ (सुनील) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुरेख आस्वाद ..

अभिरत भिरभि-या
Tue, 03/10/2009 - 14:25 नवीन
एरवी न कळणारे संगित आणि त्याचा हा रंजक इतिहास, आस्वाद इतक्या सविस्तरपणे सादर केल्याबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

आस्वाद

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/10/2009 - 15:54 नवीन
मागच्या महिन्यात 'रुहानियत' हा सुफी संगीत व मिस्टिक म्युझिक अशा मिश्रणाचा कार्यक्रम पाहिला. मला त्यातील भाषा समजत नव्हती. पण कार्यक्रम माझ्या सारख्या माणसालाही आनंद देउन गेला. भाषा धर्म देश प्रांत यांच्या पलिकडे घेउन जाणारा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

समजायला

रामदास
Wed, 03/11/2009 - 00:44 नवीन
थोडा वेळ द्या. अर्थात तुम्ही जे लिहीले आहे ते उत्कृष्टच आहे.
  • Log in or register to post comments

असेच वाटते...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/11/2009 - 00:58 नवीन
सकाळपासून २-३ वेळा थोडं थोडं ऐकलं... सुंदर आहे... नविन आहे कानाला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

धन्याशेठ, स

विसोबा खेचर
Wed, 03/11/2009 - 08:15 नवीन
धन्याशेठ, सुरेखच लेख दिसतो आहे. आत्ता नुसती नजर फिरवली आहे. यू नळीचे दुवे ऐकून सवडीने प्रतिसाद लिहितो.. आपला, (धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखावरुन

अजय भागवत
Wed, 03/11/2009 - 08:18 नवीन
तुमच्या लेखावरुन जाणीव झाली की, मोझर्ट्ची सिंफनी युट्यूबवर आहे. मस्तपैकी उतरवून घेतली. :-)
  • Log in or register to post comments

छान लेख.

प्राजु
Wed, 03/11/2009 - 08:27 नवीन
अगदी विस्तृत. दुवेही छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद

धनंजय
Tue, 03/17/2009 - 03:05 नवीन
वास्तवीक चार-गायकांचा स्वरमेळ हा प्रकार मला समजत नाही, तरी हे शांतिस्तवन फार आधीपासून आवडते आहे. तुम्हालाही हा वेगळा अनुभव आवडला हे वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

शांतिस्तवन आवडले

चित्रा
गुरुवार, 03/19/2009 - 08:59 नवीन
रसग्रहणाबद्दल आणि विस्तारपूर्वक सांगितल्याबद्दल धन्यवाद. कधीकधी सूर हे भाषा कळत नसली तरी मनापर्यंत पोचतात. ओल्ड स्पाइसची जुनी जाहिरात - पहिल्यांदा पाहिली तेव्हा बरीच लहान होते, पण अजूनही आठवते ती त्यातल्या संगितामुळे. रसग्रहणासंबंधी सहमत, कलेच्या आस्वादासाठी गाण्याचे शब्द जसेच्या तसे पटायला हवेच असे नाही. किंबहुना ते न कळताही ओल्ड स्पाइसच्या जाहिरातीप्रमाणे मनाला स्पर्श करू शकतात. पण आपल्याकडे स्वतःच्या निष्ठांमुळे कलेच्या आस्वादावर बंधने येण्याची उदाहरणे कमी नाहीत.
  • Log in or register to post comments

ऑर्फच्या संगीतची ओल्ड स्पाइस जाहिरात- आणखी एक दुवा

धनंजय
गुरुवार, 03/19/2009 - 10:26 नवीन
वरील दुवा चालत नसेल तर यूट्यूबवरील हा दुवा बघावा - गंमत म्हणजे त्या संगीताचे शब्द "नशीबदेवी किती बेभरवशाची असते" असे काही आहेत : ऑर्फचे हे संगीत मोठे हेलकावणारे आहे खरे. पण त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य हे की ते वीररसपूर्ण-सुलभ आहे. त्याच्या मते गेल्या ३००-४०० वर्षातल्या संगीताची गुंतागुंत ही नैसर्गिक रांगड्या मानवी ऊर्मीपेक्षा लेचीपेची आहे. त्याच्या स्वरमेळात सरळ षड्ज-गांधार भावात किंवा षड्ज-पंचम भावात सगळेच आरोह-अवरोह/चाल गातात, असे आहेत. षड्ज-निषद स्वरमेळ क्वचितच दिसतो (वरील फितीत पहिल्या सुरानंतर आहे.) वरील फितीत ०:३० नंतर स्त्रिया आणि पुरुष एकच चाल गातात (षड्ज-षड्ज भाव) - स्त्रिया मध्य सप्तकात, तर पुरुष मंद्र सप्तकात. हे रोमहर्षक आहे यात काही शंका नाही. पण मोत्झार्टच्या वरच्या संगीतात गुंतागुंत आहे - एक गायक आरोह गातो, तेव्हाच दुसरा चक्क अवरोह गातो, किंवा वक्र तान गातो - यातही सौंदर्य आहे. पण ते शास्त्र काही लोकांना नि:सत्व वाटले. गंमत आहे - या "रांगड्या नैसर्गिक" संगीतामुळे ऑर्फ याला नात्झी लोकांनी उचलून धरला - वेगवेगळ्या जमातींच्या संकराने कमजोर झालेल्या अभिजात पाश्चिमात्य संगीताच्यापेक्षा मागे जाऊन सनातन "सोपे" एकमुखाने गायलेले शुद्ध आर्य संगीत... ऑर्फने हिटलरचा पाडाव झाल्यानंतर आपल्या संगीताचा असा काही अर्थ नाही हे स्पष्ट करून पुन्हापुन्हा सांगितले. ओल्ड स्पाइस जाहिरातीच्या संगीताची अशी ही ऐतिहासिक गंमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

माहिती नव्हते

चित्रा
Fri, 03/20/2009 - 04:15 नवीन
नात्झींच्या ऑर्फच्या संगीताचा उपयोग करून घेण्याबद्दल माहिती नव्हते. पण विकीवर कवितेचा समग्र अर्थ दिला आहे, तो वाचला होता. या लेखाचा विषय शांतिस्तवन असताना वीरश्रीयुक्त गाण्याचा दुवा देण्यामागचे कारण एवढेच की अर्थ माहिती नसताना किंवा कधीकधी अर्थ माहिती असला तरी एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यात फारशी कमतरता येऊ नये. चित्रकारांची चित्रेही एखाद्या धर्मग्रंथातील कल्पनांवर किंवा प्रसंगांवर आधारित असतात, तेव्हाही त्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यास बंधने येऊ नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

परत ऐकले...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/20/2009 - 17:05 नवीन
बरेच दिवसांपासून निवांतपणे ऐकेन म्हणत होतो. आज ऐकले. तुमचे विवेचन वाचत वाचत ऐकले. अन्यथा काहीच कळले नसते. आताही सगळे कळले किंवा आवडले असे नाही. पण काही तुकडे ऐकताना मात्र 'दिव्यत्व' वाटले. तुमच्या प्रश्नाबद्दल. मला वाटते की त्यातले धर्मशास्त्र जरी माहित नसेल आणि माहित असून मान्य नसेल तरी अस्वादात कुठेही कमीपणा येऊ नये. फारतर या गोष्टी मान्य असलेल्या व्यक्तीला सांगितीक अनुभवाव्यतिरिक्त काही अनुभव येऊ शकेल, पण सांगितिक अनुभवाची व्याप्ती / तीव्रता मात्र कोणत्याही प्रकारे बाधित होऊ नये असे वाटते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

या लेखाच्या निमित्ताने

बॅटमॅन
Tue, 05/15/2012 - 13:03 नवीन
या लेखाच्या निमित्ताने चायकोव्हस्कीचे १८१२ ओव्हर्चर, ओफ्फेनबाख चे इन्फर्नल गॅलप, स्वॅन लेक बॅलेट, रोसिनीचे बार्बर ऑफ सेव्हिल,, अशा अनेकानेक उत्तम कलाकृती डोळ्यासमोर आल्या. अमादेउस मधील तो रेक्विएम कंपोज करत असतानाचा सीन निव्वळ अप्रतिम आहे. मोझार्टला त्याची सासू रागावते तेव्हा त्यातूनच त्याला "क्वीन ऑफ द नाईट एरिआ" कसे सुचते ते अतिशय सुंदरपणे दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

मोझार्ट चे रेक्वियम

चित्रगुप्त
Tue, 05/15/2012 - 15:48 नवीन
' मोझार्ट चे रेक्वियम ' या विषयावर धागा बघून अतिशय आनंद झाला. मी 'अमादेउस' चित्रपट अनेकदा बघितला असून अनेकांना आग्रहाने दाखवत असतो. त्यातील प्रत्येक संवाद आता जवळ जवळ पाठ झाला आहे. याची एक 'डायरेक्टर्स कट' असलेली प्रत देखिल मिळाली. त्यात काही जास्तीचे प्रसंग आहेत, उदा. सालिएरि समोर कॉन्स्टान्झी चे विवस्त्र होणे, एका धनाढ्य उमरावाच्या मुलीला संगीत शिकवायला मोझार्ट काही दिवस जातो, वगैरे. हे प्रसंग उत्तम रीत्या चित्रित झाले असले, तरी आज ज्या स्वरूपात हा चित्रपट आहे, तोच जास्त भावतो. सालिएरीची भूमिका करणार्‍याला शतशः प्रणाम. राजा जोसेफ व त्याचे खुषमस्करे वगैरे प्रसंगातील बारकावे, तसेच वर बॅट्मॅन यांनी सांगितलेले रेक्विएम कंपोज करत असतानाचा सीन, मोझार्टला त्याची सासू रागावते तेव्हा त्यातूनच त्याला "क्वीन ऑफ द नाईट" सुचणे, असे अनेक प्रसंग पुनः पुनः बघावे, असे आहेत. अगदी शेवटी मोझार्टच्या सार्वजनिक दफनाच्या प्रसंगाला पार्श्वसंगीत म्हणून 'लॅक्रिमोसा' चा उपयोग अगदी औचित्यपूर्ण आहे. त्यामुळे हा प्रसंग अतिशय सुन्न करून जातो. मलाही पॅरिस मध्ये मेरी मॅदेलीन चर्च मध्ये ' रेक्वियम' चा कार्यक्रम बघायला मिळाला, याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. यातील 'लॅक्रिमोसा' अगदी रोज ऐकतो. वर्णनातीत अश्या गूढ, अद्भुत सौंदर्याने नटलेली ही रचना मोझार्टच्या प्रतिभेचा कळस आहे, असे मला वाटते. याबरोबरच 'पियानो कॉन्चेर्टो क्र. २१' ही रचना पण अद्भुत आहे. मोझार्ट च्या मृत्यु नंतर त्याच्या शिष्याने 'रेक्वियम' पूर्ण केले, असे ऐकले आहे, त्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध आहे का? हा धागा बघितल्याबरोबर रहावले न गेल्याने हा प्रतिसाद देत आहे. सर्व चित्रफिती अजून बघितल्या नाहीत... या धाग्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे डायरेक्टर्स कट

बॅटमॅन
Tue, 05/15/2012 - 16:07 नवीन
माझ्याकडे डायरेक्टर्स कट वालीच व्हर्जन आहे. सालिएरिची भूमिका करणार्‍याला ऑस्कर मिळाले असे विकी सांगतो. आणि तशीच सशक्त आहे ती भूमिका. बाकी मोझार्टला पहिल्यांदा राजदरबारात बोलावले जाते तेव्हाचे संवाद आणि सालिएरीने त्याच्या स्वागतार्थ बनविलेल्या रचनेची बसल्या बसल्या अशी सुंदर मेलडी बनवितो चायला कळायचं बंद होतं :) http://en.wikipedia.org/wiki/Amadeus_%28film%29#Awards_and_nominations मोझार्टचे बाकी अनेक पीसेस भारी आहेत. मी ऐकलेले आणि विशेष आवडणारे म्हणजे मॅरिज ऑफ फिआग्रो, स्ट्रिंग क्वार्टेट, सिंफनी क्र. २५ व ४० पण भारी आहे. सिंफनी क्र. २५ म्हणजे टायटन घड्याळाच्या जाहिरातीतील म्युझिक :) पण रेक्विएम मधील पहिला पीसच मला तरी जास्त आवडतो. "Kyrie elison" हा धनंजय यांनी दिलेला. इतका विलक्षण गतिमान आणि ताकदवान आहे की काय सांगू. मलापण राहावले नाही, सबब हा प्रतिसाद लिहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

एकही दुवा उघडला जात नाही.

चित्रगुप्त
Tue, 05/15/2012 - 16:07 नवीन
वरील चित्रफिति बघण्याचा प्रयत्न केला, तर एकही दुवा उघडला जात नाही, असे दिसले. ?????
  • Log in or register to post comments

यूट्यूबवर सर्च मारा "Mozart

बॅटमॅन
Tue, 05/15/2012 - 16:14 नवीन
यूट्यूबवर सर्च मारा "Mozart requim" म्हणून. येणार्‍या पहिल्याच ९ मिनिटांच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि मग येंजाय! बाकी "Confutatis maledictis" मात्र त्यात नाहिये, सेपरेट सर्च मारा त्याकरिता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद

धनंजय
Wed, 05/16/2012 - 02:19 नवीन
जुन्या चित्रफिती यूट्यूबवरून निघून गेल्या आहेत :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आज अचानक गाठ पडे

चित्रगुप्त
Fri, 05/17/2013 - 05:08 नवीन
वर्षभरानंतर आज अचानक (योगायोगाने?) हा धागा दिसला. त्यावेळी यातील दुवे उघडत नसल्याने ऐकता आले नव्हते, आता पुन्हा नीट सावकाशीने ऐकणार आहे. शतकांमध्ये एकादीच अशी महान कलाकृती घडून येत असते. मोझार्टच्या प्रयिभेला पुन्हा एकदा सलाम आणि धनंजय यांना ह्या सुंदर परिचयाबद्दल कुर्निसात.
  • Log in or register to post comments

जुने धागे

मुक्तसुनीत
Fri, 05/17/2013 - 20:21 नवीन
असेच चांगले चांगले जुने धागे वर काढा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा