Skip to main content

लेडी ड्रायवर

लेखक पुश्कर यांनी शुक्रवार, 11/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधून निघताना एक लेडी ड्रायवर कार चालवताना दिसली. तेव्हा मनात विचार आला की लोकं एका स्त्रीला ड्रायवर म्हणून कामाला ठेवू शकतील का ? तेवढी त्यांच्या मनाची तयारी आहे का असा प्रश्न पडला . पण आजचे बदलते जग बघता अजून काही वर्षात हे हि शक्य वाटते. तुम्हाला काय वाटते ? विचार केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिले ?

वाचने 8056
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

स्त्रीने ड्रायव्हर असण्यात काय प्रॉब्लेम आहे ? ज्या देशाचे वाटोळे व्हावे म्हणून अमेरिका देव पाण्यात घालून बसली आहे त्या ईराणमध्ये अनेक स्त्रिया टॅक्सीज चालवतात. महिला बस कंडक्टर बेंगळूरुमध्ये गेले १० वर्षे आहेत. मुंबईत लोकल ट्रेन महिला चालवतानाचा एक फोटो/बातमी २ वर्षापूर्वी वाचली होती. महिला ड्रायव्हर असण्यात तुम्हाला काय धोके दिसत आहेत?

In reply to by चिरोटा

हेच म्हणतेय

परवाच एक महिला रिक्षाचालक पाहिली मुंबईत. पण तिने पुरुषासारखा वेष / केशरचना केली होती. येणारा जाणारा प्रत्येकजण निरखून पाहतोय अशातून येणारा ऑकवर्डनेस टाळण्यासाठी असेल कदाचित.

लेखकाचा अनुभव भारीच एकदम. मी पण परवा एक सायकल चालवणारी महिला पाहिली. *हातगाडी ओढणार्‍या, फळांच्या गाड्या ढकलणार्‍या महिला पाहून कोणाला कसलेच प्रश्न पडत नाहीत हे खरे दु:ख आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>लोकं एका स्त्रीला ड्रायवर म्हणून कामाला ठेवू शकतील का ? = म्हणजे स्त्रिया काय चालवू शकतात हा प्रश्न नाही, तुम्ही लेडी ड्रायवर ठेवाल का? अशी विचारणा आहे >तेवढी त्यांच्या मनाची तयारी आहे का असा प्रश्न पडला = म्हणजे ती चालवत असताना (तुम्ही शांतपणे किंवा संयमानं मागे बसू शकाल का?) असा अर्थ असावा कारण पुढे खुलासा आहे > विचार केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिले ? = म्हणजे नुसत्या कल्पनेनं ही अवस्था तर प्रत्यक्षात काय? पोस्ट चार ओळींची असली तरी भविष्यकालीन शक्यतांचा वेध घेणारी आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी तर एक संगणक चालवणारी पण महिला पाहिली आहे. पण मी माझ्या गाडीवर ( कधी काळी गाडी परवडली आणि वर चालकसुद्धा ठेवायची ऐपत आली तर) महिला चालकाला ठेवणार नाही. महिलांच्या गाडी चालविण्याच्या कौशल्यावर आणि एकंदर दिशाज्ञानावर माझा गाढ विश्वास आहे.

आमच्या ईकडे एक महिला टंमटम (सिक्स सीटर) चालक होती ;) ३५-४० ची असेल ,तड्तडी आम्ही कधी कधी तीच्याच टंमटम मधुन जायचो कॉलेजला शर्ट - प्यांट घालायची , पण तिला बाकिचे रिक्शावाले फार काही काही चिड्वायचे ,तीची खिल्ली उड्वायचे मग ही त्यांना कच्चाकच्च शिव्या द्यायची तोंड्भरुन ! आम्हाला तेव्हा मौज वाटायची छान टाईंमपास होतो म्हणुन पण एक्दा धाड्स करुन विचारल " आंटि ,तुम्हाला सगळे इतके त्रास देतात मग तुम्ही का चालवता रिक्षा ? भिती नै वाट्त का तुम्हाला ? तिचे उत्तर " तु विचारलस म्हणुन सांगते " मला काय हौस आली नाही रिक्षा चालवायची माझा नवरा दारु पितो ,३ मुली अन एक मुलगा आहे मला ,माहेरचे काही (आर्थिक) मदत करत नाहित , सासरी कोणी उरल नाही ,आधी नवरा व्यवस्थित सगळ पाहत होता ,पण आता त्याच व्यसन हाताबाहेर गेलेय , मुलांची फी भरायला पैसे दुर रेशन भरायला पण पैसे नाहीत , उधारी करुन करुन कीती करणार अन कशी फेडणार? म्हनुन ही रिक्षा शिकुन घेतली मी , लायसन मिळ्वले अन आता हाच रोजगारीचा पर्याय आहे माझा " तिचे फार कौतुक वाट्ले होते :) आजकाल मुलीना एरोप्लेन चालवयाला ठॅवतात मग कार किस झाड की पत्ती ;) विचार बदला , जग बदलेल :)

In reply to by पियुशा

आजकाल मुलीना एरोप्लेन चालवयाला ठॅवतात मग कार किस झाड की पत्ती
विरोध कशालाच नाही फक्त माहिती : फायटर प्लेनवर महिलांना लायसन्स दिले जात नाही. हेवी व्हेईकल (ट्रकादि) याचे लायसन बायकांना मिळत नाही. एफ.वाय. आय. ओन्ली. -(वरील दोन्ही गोष्टी स्त्रिया करु शकतील अशी खात्री असलेला) गवि

In reply to by गवि

फायटर प्लेनवर महिलांना लायसन्स दिले जात नाही. हेवी व्हेईकल (ट्रकादि) याचे लायसन बायकांना मिळत नाही. माहीतीबद्द्ल धन्यवाद :) पण असा फरक का ? असे विचारावेसे वाटते !

कृपया गैरसमज करून घेऊ नये. मला ड्रायवर या कामाबद्दल बोलायचे होते. तुम्ही बघत असलाच की ड्रायवर चे काम किती कंटाळवाणे असते. एकदा का मालकाला ऑफिस मध्ये सोडले कि तो निघे पर्यंत गाडीत बसू राहावे लागते. अथवा परत घरी जाऊन मुलांना शाळेत जाऊन सोडा , इतर काही कामे असतील तर उरका परत मालकाला ऑफिस मध्ये आणायला जा. त्याला जर जास्ती वेळ लागला तर थांबा. या सर्व जवाब्दाराया बायका समर्थ पणे पेलू शकतील का असा प्रश्न मला पडला होता. म्हणून मी प्रश्न विचारला.

In reply to by पुश्कर

या महिला ड्रायवरला साहेबीण बाईंना भाजी चिरुन देणे, तादूळ निवडणे इ. कामे दिली जात नसतील अशी आशा आहे ;) अमोल

In reply to by पुश्कर

या सर्व जवाब्दाराया (जबाबदार्‍या) बायका समर्थ पणे पेलू शकतील का असा प्रश्न मला पडला होता. मला कळत नाही असा प्रश्नच का पडावा? त्याचे काही विश्लेषण/विवेचन यावयास हवे. कारची ड्रायव्हर म्हणून काम करणे हे कंटाळवाणे आहे (असे लेखकाचे मत) पण ते सर्वोच्च कंटाळवाणे आहे असे लेखकास वाटते आहे का? त्याहून कितीतरी कंटाळवाणी घरकामे, जसे नवर्‍याला लहानसहान कामातही सहाय्य करावे लागणे, मुलांची देखभाल, त्यांचा अभ्यास (हे तर फार कंटाळवाणे आणि अपार सहनशक्तीची मागणी करणारे काम आहे), धुणी-भांडी, केर-कचरा (अशी फार मोठी यादी देता येईल) बायका दररोजच्या जीवनात करीत असतातच.

पहिल्यांदा लेख वाचून मीसुद्धा वर आलेय तसाच प्रतिसाद लिहायला घेतला पण लिहिता लिहिता जाणवले की लेखकाला कदाचित सार्वजनिक वाहनांच्या महिला चालकांबद्दल प्रश्न नसून खाजगी वाहनासाठी जो चालक ठेवून घेतला जातो ते काम स्त्रियांनी करण्याबाबत असावा. लेखकांनी जो खुलासा दिलाय त्यावरूनही तसेच वाटतेय. पण त्यात जो समर्थपणाचा मुद्दा आणलाय तो अजिबात पटला नाही. आजूबाजूला जरा नजर टाकली तर कितीतरे स्त्रिया चाकलापेक्षा अधिक कष्टाचे आणि त्रासदायक कामं करतांना दिसतात. जर स्त्रिया अति शारिरीक आणि मानसिक श्रमांची इतर कामे करू शकतात तर चालकाचे काम करण्यास का बरं असमर्थ ठराव्यात?

In reply to by स्मिता.

मन्या, नाकालया.... मूळ चर्चेचा मुद्दा सोडून माझ्या टंकन मिष्टेका काय शोधतोस?? - असा हवा होता हा प्रतिसाद.

उत्तम विषय... वाचतोय.. मिपा समृद्ध होतेय हेच खरे.. किती महत्वाच्या पण दुर्लक्षित सामाजिक प्रश्नांना आज वाचा फोडली जातेय

आजकाल ( म्हणजे गेली काही वर्षे ) ' दख्खनच्या राणीचे ' मुख्य चालक म्हणून एक महिला काम करते असे वाचले. तोंड पुस्तकावर फोटोही पाहिला होता बाकी साक्षात भगावान श्रीकृष्णाचे केलेले काम म्हणून चालक ( ड्रायव्हर ) या पदाबद्दल आम्हाला अतीशय आदर आहे. कुठल्याही संकटात भगवान या महिलांच्या मागे सदैव उभा असणार यात शंका नाही. अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

बाकी साक्षात भगावान श्रीकृष्णाचे केलेले काम म्हणून चालक ( ड्रायव्हर ) या पदाबद्दल आम्हाला अतीशय आदर आहे. कुठल्याही संकटात भगवान या महिलांच्या मागे सदैव उभा असणार यात शंका नाही.
या भक्तीरसाने ओथंबलेल्या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जौ दे !

अहो, साक्षात कृष्णाची सारथी सत्यभामा आणि दशरथाची सारथी कैकयी होती, तर महिला गाडी चालक का होणार नाहीत? प्रश्न पुरुष मालकाचा असेल. म्हणजे एक बाई गाडी चालवतेय आणि पुरुष मालक मागच्या सीटवर बसणं पसंत करील का हा पुश्करचा प्रश्न आहे. त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलावी लागेल.

In reply to by पैसा

सवय होईपर्यंत महिला ड्रायव्हरला गाडी शक्य असेल तेव्हा रिव्हर्समधेच चालवायला सांगायची. म्हणजे पुरुषाला आपण पुढे आणि स्त्री ड्रायव्हर मागे असे वाटेल. काही दिवसांनी मग सवय झाली की मग नेहमीप्रमाणे चालवायला हरकत नाही.

In reply to by पैसा

या दोन्ही उदाहरणातील स्त्रीया या त्या त्या नायकांच्या पत्नी होत्या... तरी देखील रथ चालवण्याचा केवढा मोबदला दशरथाला द्यावा लागला याचा विचार करा! ;)

शाकार- मांसाहार ? झाला... देशी अभिमान - हिरवा माज ? झाला आस्तिक नास्तिक?.. झाला.. ब्राह्मण , पेशवाई आणि तत्सम विरोधी वाद>? झालाहो रामायण महाभारत खर कि खोट.........? हम्म त्यावरूनही वाद झाले ...:P हा स्त्री पुरुष समानता.... हे बरेच दिवसात झाले नव्हते... यावर वादावादीत २ दिवस बरे जातील आता सर्वांचे .. मग परत आहेच शाकार-- मांसाहार ;)

In reply to by स्पा

सदर विषयावरती अनिवाशी भारतीयांचे तसेच आयटी वाल्या म्हैलांचे मत काय आहे ते पण जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणजे आयटित रिसेशन येउ घातले आहे, त्याला तोंड देण्याची पुर्व तयारी करावी आयटितल्या महिलांनी असं सुचवायचं आहे का तुम्हाला ?

In reply to by स्पा

स्त्री पुरुष समानता.... हे बरेच दिवसात झाले नव्हते... यावर वादावादीत २ दिवस बरे जातील आता सर्वांचे ..
हम्म. यासंदर्भात कोणत्या संकेतस्थळावर विदा मिळू शकेल? संकेतस्थळ विश्वासार्ह नसले तरी हरकत नाही, पण विदा महत्वाचा ;)

In reply to by अन्या दातार

यापेक्षा आता पुरुषांची मानसिकता कुठल्या कुठल्या मुद्यावर बदलायला पाहिजेल याचीच एक यादी करायला घ्या घौक मध्ये.

लेखकाचा निरागस स्वभाव बघता, लेडी ड्रायवर ठेवल्यास काय होईल याचं हे चित्र डोळ्यासमोर आलं: ती येते. तो : गुड मॉर्निंग! आवरली तुमची घरची सगळी कामं? ती : हो तो : मुलं गेली शाळेत का आपण सोडूया? ती : नाही नाही, त्यांची स्कूल बस आहे तो : आणि मिस्टर काय म्हणतायंत? ती : आता त्यांचा काय संबंध इथे? तो : नाही आपलं सहज विचारलं, बाय द वे, तुम्हाला काही अर्जंट काम वगैरे नाही ना? ती : का? तो : नाही, तसं असेल तर आधी तुम्हाला सोडून मी पुढे गेलो असतो ती : नाही, सोडतेनं तुम्हाला तो : बरं, मला सोडल्यानंतर तुमचा काय प्रोग्रॅम आहे? ती : म्हंजे? तो : नाही, नाही, तसं नाही, तुम्ही एकट्या कशा बसून राहणार इतक्या वेळ कारमधे? ती : मग काय आपण दोघं बसायचं दिवसभर कारमधे? तो : नाही हो मी आपलं सहज विचारलं. ती : आता निघूया का? तो : वा! वा! निघूयानं. प्रवासात (अमोल केळकरांनी) सुचवल्याप्रमाणे तिच्यामागे साक्षात भगावान श्रीकृष्णच आहेत त्यामुळे कार मधे निव्वळ भक्तीसंगीत चालूये. कारमधनं खाली उतरल्यावर: तो: तुमचं ड्रायवींग उत्तम आहे आणि मला एक कल्पना सुचलीये, सांगू ? ती : बोला! तो : तुम्ही कॅब सर्विस सुरु करणार का? ती : आहो माझ्याकडे पैसे कुठले आलेत कार घ्यायला ? तो : काय करायचेत पैसे? आता ही कार तुमचीच समजा, फक्त परमीट काढा की झालं! ती : (नि:शब्द) तो : संध्याकाळी वेळेवर येऊ शकाल ना आपण? ती : हे काय विचारणं झाल? तो : नाही, म्हणजे तुमची कॅब सर्वीस मला वेळेवर मिळाली तर मी तुमचा ऋणी होईन

संजय्र साहेब ( निशा क्षमा कर रे तुझा साहेब हा शब्द वापरला ! ) तुमचा हा डायलॉग राजा गोसावी शरदतळवलकर ई च्या शिणेमातील १९५६ सालचा वाटतोय. ह्ये २०१२ हाय जरा फोडणीवाला सूर लावा ना राव ! की पराजेश मुजुमदार कडून चावटपणा चा क्लास लावता ?

In reply to by jaypal

हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. =)) फक्त त्यात एखादा अपवाद सोडल्यास स्त्री चालक आहे हे कळत नाही. :)

In reply to by jaypal

बायका या मुळातच पाशवी असतात जयपालसाहेब! आजकाल समानतेच्या नावाखाली पुरुषही चित्रफितीमध्ये दाखवल्यासारखी कामे करतात. जिथं तिथं मेलं बायकांसारखं वागायला जातात. ;)

स्त्रीयांचं सर्वसाधारणपणे ड्रायव्हींगवर असलेलं प्रभुत्व हा अस्तित्वात नसलेला विषय असल्याने अशी शंका आली असेल.