महाभारत ... माझा दृष्टीकोन
भारतातील लाखों लोक गेली शेकडो वर्षे महाभारत वाचत/ऐकत आले आहेत. या वाचक/श्रोत्यांचा या कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो. चला तर , या वाचकांची ( मी वाचक म्हणत असलो तरी वाचक/श्रोते यांचे गुणोत्तर १: १००० याच्यापेक्षा निराळे नसावे, ते बाजूला ठेवूं.) थोडी वर्गवारी करावयाचा प्रयत्न करू..
(१) भाविक .... लिहलेले खरेच घडले यावर निनांत श्रद्धा असलेले.(म्हणजे एकोणविसाव्या शतकांपूर्वेचे सगळेच व आता ९० टक्के)
(२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य ! काही वेळा सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती गोळा करणे हा ही उद्योग असू शकतो.
(३) विद्वान व कवी मनाचे.... हे विद्वान असतातच. ते अभ्यासही भरपूर करतात. पण (२) मधील व्यक्तींपेक्षा त्यांच्याकडे एक अवयव जास्त असतो. सहृदय, रसिक कवीमन. हे लोक महाभारत हे एक काव्य आहे असे समजून व्यासांना दोन ओळींमध्ये काय सांगावयाचे आहे याचा शोध घ्यावयाचा प्रयत्न करीत असतात. सहज समोर येणारी दोन उदाहरणे म्हणजे दुर्गा भागवत व इरावती कर्वे. यातील एक पोटविभाग म्हणजे नगण्य विद्वत्ता व थातूरमातूर अभ्यास याच्या जोरावर कथा-कादंबरी पाडणारे लेखक. दोन ओळींमध्ये आपल्याला वाटेल ते घुसडणारे.
(४) आजची आंग्लशिक्षित पिढी....यांचा कशावरच विश्वास नसतो.(चुकलो, विकीसोडून) महाभारतातील सगळ्या कथा फालतूक, असंभव व आजच्या घडीला अजिबात उपयोगी नाहीत असा यांचा दावा. अभ्यास जवळजवळ नाही.
(५) मी (व माझ्यासारखी थोडी काही)
म्हणजे काय ? मी (१) मध्ये नाही कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही. कृष्णाने मेलेले मुल जिवंत केले मला पटत नाही, ,,, मी भाविक नाही.(२) मधील विद्वानांकडे बघतांना आपली टोपी पडणार नाही इतके अंतर मी नेहमीच ठेवतो. आदर आहे, लॉ कॉलेज रोडने जातांना मी मान झुकवतोही. पण ती दुसर्या गृहावरची माणसे ! (३) मधील लोकांबद्दल आपुलकी आहे, त्यांची पुस्तके (विकत घेऊन ) वाचत होतो. काव्यरति हा आम्हाला जोडणारा दुवा.पण भरपूर अभ्यास ही माझ्यासारख्या आळश्याला झेपणारी गोष्ट नव्हे. शिवाय या विदुषी दोन ओळींमध्ये काय शोधतील याचा पत्ता मलाच काय पण व्यासांनाही लागणार नाही ( हा माझा एक अंदाज). आता राजवाडे यांच्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास " हे पुस्तक वाचणारे ( माफ करा, मला त्यावर लिहणारे असे म्हणावयाचे आहे) बरेच महाभाग जालावर आहेत; त्यांनी कर्वे बाईंचे 'युगांत " वाचावे, great entertenment guaranteed. जास्त मजा हवी असेल तर दुर्गाबाईंचे "व्यासपर्व "हे बरोबर वाचावे. दोघीजणी द्रौपदीच्या पैलूंवर इतका प्रकाशझोत टाकतात की आपलेच डोळे दिपून जावेत. मी द्रौपदी सभेत
न सा सभायत्र न सन्ति वृद्धा !
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् !!
धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यम् !
सत्यं न तद्य्च्छलनानुविद्धम् !!
असे म्हणाली यावरच खुश.म्हणजे (३) मध्येही मी नाहीच. (४) बद्दल म्हणाल त्यांच्यात व माझ्यात generations gap आहे. म्हणजे मी out. ही नेति नेति पद्धत सोडून मी महाभारताकडे कसे बघतो त्या कडे वळू.
गेली साठहून जास्त वषे मी महाभारत वाचत आहे. निखळ आनंदाकरिता. शालेय कालात भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व भुरळ घालत. नंतर सुरवातीपासून असलेल्या निरनिराळ्या कथा वाचण्यात आनंद मिळू लागला. नल-दमयंती, सावित्री यांच्या कथा महाभारतातील वाचा, तुम्हालाही त्या निराळी अनुभुती देतील. उदाहरण म्हणून शकुंतला कथा घ्या. का ? तर कालिदासाने त्यावर नाटक लिहले व आपल्याला त्याचीच माहिती असत्ते. आता कालिदास नाटक लिहतांना एक स्वप्नसृष्टी निर्माण करतो. शाप, अंगठी वगैरे वगैरे. व्यासांची शकुंतला जमीनीवर उभी आहे. तिच्या दरबारातल्या भाषणात राग, उपरोध आहे पण अगतिकताही आहेच. राजाला मुलगा हवा आहे म्हणून तो शकुंतलेला स्विकारतो. व्यासपर्व वा युगांत वाचल्यावर एक निराळीच दृष्टी लाभली. पण लवकर वाटू लागले की "गड्या, यातील काहीच भाग आपल्यासाठी आहे. त्यांची संशोधनाची वाट आपण चोखाळू शकणार नाही. या गोष्टींकडे दुसर्याही दृष्टीने बघता येते एवढेच शिकावयाचे."
मग संध्याछाया दिसू लागल्यावर शांतीपर्वाची गोडी लागली. आपल्या तुटपुंज्या वाचनावरून उपनिषदे व शांतीपर्वातील साम्यांकडे लक्ष गेले. पण हे थोडे दिवसच. आपला पिंड कथेकडेच.
मग जाणवावयाला लागले की जर मला महाभारतापासून आनंद मिळवावयाचा असेल तर मला परत शालेय जीवनांत प्रवेश करावयास पाहिजे. म्हणजे काय ? म्हणजे मला आज कळते की सूर्यापासून कुंतीला मुलगा होणे शक्य नाही. तो दुर्वासापासून झाला असणे शक्य आहे. पण असे कळल्यावर मी महाभारत वाचण्यात गंमत काय उरली ? अशा शे-दोनशे घटना जर मी दरवेळी " हे अशक्य ", " हे अशक्य " म्हणत वाचणार असेन तर न वाचणेच उत्तम. जर "अरेबिअन नाईट्स" वाचावयाचे असेल तर मी आठव्या शतकातल्या अरबस्थानात गेलेच पाहिजे तसेच महाभारत वाचावयाचे असेल, त्यातून आनंद मिळवावयाचा असेल तर, मला पाच हजार वर्षांपूर्वीच्या भारतातच जायला पाहिजे. त्या वेळच्या वातावरणात, सामाजिक-कौटुंबिक-राजकीय समस्यांत समरस व्हावयास पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की मी भाविक झाले पाहिजे, मी १२ वर्षांचा मुलगा झालो पाहिजे. पण युद्धपर्व वाचतांना अर्जुनातल्या भात्यातले बाण संपत नव्हते यावर माझा विश्वास पाहिजे. नसेल तर व्यास माझ्यासाठी नाही, कालिदास माझ्यासाठी नाही, गांधीही नाहीत व गाडगेबुवाही नाहीत ! त्यांचे विश्व व माझे विश्व निराळे. माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !!
शरद
वाचने
7055
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरद साहेब
रोचक
काही मुलभूत प्रश्न
सहमत
In reply to काही मुलभूत प्रश्न by कपिलमुनी
>खरे काय आणि खोटे काय ...काय कळत नाय !!
In reply to काही मुलभूत प्रश्न by कपिलमुनी
हे खासच !
मी तरी बालबुद्धीनेच महाभारत आस्वादतो. ...
In reply to हे खासच ! by सातबारा
पटत नाही की कळत नाहीये, हेच कळत नाहीये!
स्साला ९० च्या दशकात झालेल्या
या आल्या विदुषी !!
In reply to स्साला ९० च्या दशकात झालेल्या by कवितानागेश
सुंदर विवेचन केलंत
छान!
मस्त...
आज पर्यत संपुर्ण महाभारत असं
थोडस अवातंर
+१
In reply to थोडस अवातंर by ऐक शुन्य शुन्य
शर्करावेष्ठीत
महाभारतातील चमत्कार !!
+१
In reply to महाभारतातील चमत्कार !! by अर्धवटराव
(२) विद्वान .... असे लोक
. कारण १८ औक्षहिणी भरतील
+१
In reply to . कारण १८ औक्षहिणी भरतील by मृत्युन्जय
महाभारत या जय नावाच्या
तर काय?????
In reply to महाभारत या जय नावाच्या by शिल्पा ब
रामायण व महाभारत
In reply to तर काय????? by प्यारे१