पैसे सोडून बोल...
पंधरा दिवसांपुर्वीची गोष्ट.
लोकेश, माझा क्युबिकलमेट मला अचानक म्हणाला, "सरजी थोडा हेल्प चाहीये."
लोकेश आणि मी गेले वर्षभर एकाच क्युबिकलमध्ये बसतोय. दोघांचंच क्युबिकल. त्यामुळे आम्ही फक्त कलीग न राहता बर्यापैकी मित्र झालो आहोत. माझ्याच वयाचा आहे तो. लग्नाला तीन वर्ष झालेली. एक छोटी मुलगीही आहे त्याला. त्यामुळे अधूनमधून पाच दहा हजार मागायचा माझ्याकडे. आठवडयाभरात परतही करायचा.
आताही त्याने असेच पैसे मागितले. पण थोडे जास्त. तीस हजार.
"क्यूं रे इतना? कुछ प्रॉब्लेम हैं क्या?"
"अरे नही सरजी. एक दोस्त को बहुत जरुरत हैं. आप दे दो. मैं पक्कासे ये मंथ एंड को दे देता हुं आपका पैसा."
"बस क्या दोस्त, मैंने वैसा कुछ कहा क्या. दे देता हुं मैं. लेकीन थोडा संभालके यार. आजकल लोग पैसे के मामले बे बहूत अजीब हो गये हैं."
मी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये तीस हजार टाकले. लोकेशच्या मित्राला ते पैसे तिसर्याच मित्राच्या अकाऊंटमध्ये हवे होते. असेल काही अडचण. त्यानूसार लोकेशने ते तीस हजार त्या तिसर्या मित्राच्या अकाऊंटमध्ये विशेष ओळख नसताना पैसे टाकले. ते पैसे त्याच्या मित्राला मिळालेही.
महिना संपला. लोकेशने न विसरता मला पैसे ट्रान्स्फर केले. पण एक मोठा लोचा झाला. पैसे ट्रान्सफर करण्याच्या अकाऊंट लिस्टमध्ये माझ्या नावाच्या खाली लोकेशच्या मित्राच्या मित्राचे नाव होते. लोकेशने माझे नाव सिलेक्ट केले. पण माऊसला स्क्रोल बटन असल्यामुळे चुकूण स्क्रोल झाले आणि त्या तिसर्या मित्राचे नाव सिलेक्ट झाले. नेक्स्ट बटन दाबले. पुढचं पान पैसे ट्रान्सफरसाठी दिलेल्या माहितीच्या कन्फरमेशनसाठी असतं. काही चुकीची माहिती असेल तर ते डीटेल्स बदलता येतात. इथे मात्र सवयीने लोकेशने डोळेझाक केली आणि तीस हजार लोकेशच्या मित्राच्या त्या अकाऊंटवाल्या मित्राला ट्रान्सफर झाले...
पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लोकेशला चूक कळली. त्या अकाउंटवाल्या मित्राला फोन केला. त्यानेही आता मिटींगमध्ये आहे, मीटींग संपली की पाहतो असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र ते साहेब लोकेशचा फोनही उचलेनात आणि मेसेजला रीप्लायही देईनात. लोकेशने आपल्या मित्राला हे सारं सांगितलं. पण हे अकाऊंटवाले महाशय मित्रालाही दाद देईनात. बँकेला फोन केला. बँकवाले म्हणाले, बँक याच्यात काहीच करु शकत नाही. ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या वापरासाठीच्या नियमावलीत असं क्लियर लिहिलं आहे की अशा चुकांना बॅंक जबाबदार नाही. फार तर आम्ही तुम्हाला त्या ट्रान्सॅक्शनचे डीटेल्स लेखी देऊ.
बँकेने त्या मित्राचे खाते चेक केले. साहेबांनी ते तीस हजार त्याच दिवशी खात्यातून काढले होते.
ते अकाउंटवाले साहेब चेन्नईला एका नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहेत...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
परेश माझा चुलत चुलत भाऊ. मूंबईला एका मेडीकल सर्जिकल इक्विपमेंट बनवणार्या कंपनीत टेक्निशीयन. एक दिवस अचानक त्याचा फोन आला.
"दादा, मी आणि माझे मित्र भागीदारीत एक सर्जीकल एक्विपमेंटची कंपनी विकत घेतोय. माझ्या हिश्श्याचे पैसे उभे करण्यासाठी मला तुझ्याकडून मदत हवी आहे."
"किती हवेत?"
"पन्नास हजार."
आधी पैशांच्या बाबतीत वाईट अनुभव असल्यामुळे मी एव्हढे पैसे त्याला देणे शक्यच नव्हतं. पण लहान भाऊ काहीतरी करतोय म्हणून त्याला नाही म्हणणं माझ्या जीवावर आलं होतं. शेवटी मी मनाचा हिय्या करुन पंचवीस हजार दिले त्याला. गणपतीत दिलेले पैसे दिवाळीत परत करायचे असं ठरलं. दिवाळी आली आणि गेली. शिमगा आला. शिमग्यानंतर त्याचं लग्न झालं. साहेब मला पैसे परत करण्याचे नाव काढीनात. मी फोन केला की उचलायचाच नाही. दोन तीन वेळा सलग कॉल केला की फोन स्विच ऑफ करायचा असे प्रकार साहेबांनी सुरू केले. एकदा कधीतरी फोन उचलला त्याने. दादा मी अमुक अमुक तारखेला पुण्याला येतोय तेव्हा पैसे देईन. त्या तारखेनंतर दोन महिने गेले तरी साहेबांचा पत्ता नाही. पुढच्या वर्षीचे गणपती आले. दिवाळी आली. त्याच्या छोटया भावाचंही लग्न झालं. माझी कुठे भेट झाली की साहेब बेशरमसारखे हवापाण्याच्या गप्पा मारायचे. पण पैसे देण्याचे नाव काढायचे नाहीत. आमचा हा पैशाचा व्यवहार त्याच्या बाबांना म्हणजे माझ्या काकांनाही माहिती होता. पण ते ही सोयिस्करपणे डोळेझाक करत होते. त्यांच्याकडे दोन दोन मुलांची लग्न करायला पैसे होते. पण मी त्यांना गरजेच्या वेळी दिलेले पैसे परत करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. शेवटी मी काकांच्या छोटया मुलाला हे सारं सांगितलं. तो बर्यापैकी सेन्सिबल आहे. त्याने साडे बारा साडे बारा असे दोन टप्प्यात पैसे दिले. अर्थात ते पैसे त्याने घरातूनच घेऊन दिले असणार.
मी त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे दिले ही माझी चुकच झाली होती....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी अमेरिकेत असतानाची गोष्ट. सप्टेंबर महिना असावा. एका सकाळी सकाळी अश्विनचा, माझ्या मित्राचा फोन आला.
"अरे मी अशा अशा अडचणीत आहे. मला पन्नास हजार रुपये दे. दिवाळीत माझे बोनस आणि अॅरीयर्सचे पैसे मिळणार आहेत. ते मिळाले की मी तुझे पैसे तुला परत करेन."
अश्विन खुपच जवळचा मित्र होता. मी भारतात असताना त्याच्या घरी येणं जाणं होतं. त्याची बायको मला भाऊ मानायची. पैसे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. पण पन्नास हजार जरा जास्तच वाटत होते. नाही दिले तर काय करणार असाही प्रश्न होताच.
"हे बघ माझे पैशाचे सारे व्यवहार सध्या बाबा पाहतात. मी माझ्या भारतातल्या अकाउंटमधून ऑनलाईन पन्नास हजार काढले तर ते बाबांना लगेच कळेल. आता मी तुला वीस हजार रुपये देतो. बाबांना काहीतरी सांगेन मी. बाकीचं नंतर बघू."
मी त्याला अशा पद्धतीने वीस हजार दिले.
यथावकाश मी भारतात आलो. दिवाळी झाली. माझे पैसे देणे बाजूलाच राहिलं, माझ्या मित्राच्या बायकोने घरची परिस्थिती कशी वाईट आहे, अश्विनला एक कोर्स करायचा आहे म्हणून तू पाच हजार दे असं म्हणून पुन्हा एकदा पैसे घेतले.
या गोष्टीला आता तीन वर्ष झाली. अश्विनचं बाकी सारं व्यवस्थित चालू आहे. मला कधीतरी अचानक पैशाची गरज पडते. मी आपले पैसे अश्विनकडे आहेत म्हणून फोन करतो. त्याचं रडगाणं सुरु होतं. "अरे तू पाहतोयस ना मी किती वाईट परिस्थितीतून जातोय. माझ्याकडे पैसे असते तर मी दिले नसते का?"
मी हताशपणे फोन ठेवून देतो. माझे ते पंचवीस हजार बुडाल्यात जमा आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही सुद्धा मी अमेरिकेत असतानाचीच गोष्ट. माधव माझा खुप जुना मित्र. मी बारावी झाल्यानंतर मेडीकलच्या सीईटीच्या कोचिंगसाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा त्याच्याशी ओळख झाली. तो तेव्हा मराठीतून एम ए करत होता. मी काही मेडीकलला गेलो नाही. इंजिनीयरींगला असताना मी त्याला निळं अंतर्देशीय पत्र पाठवत असे. तो ही उत्तरं देत असे. मी अमेरिकेला जाणार आहे हे कळल्यावर तो मला भेटायला मुंबईला आला. आम्ही माझ्या गावी गेलो. मला आमच्या या पत्रातून टिकलेल्या मित्रीचं खुप अप्रुप वाटायचं.
एक दिवस त्याचा फोन आला. म्हणे मला दहा हजार रुपये हवेत. एक डॉलर म्हणजे पन्नास रुपये. दहा हजार काही विशेष नव्हते. कधी परत करणार वगैरे काहीही न विचारता मी तेव्हढे पैसे त्याला दिले. पुढे भारतात आल्यावर एकदा सहज म्हणून पैसे कधी परत करणार आहेस म्हणून विचारलं. देतो लवकरच म्हणाला.
आणि त्यानंतर कधीही त्याने माझा फोन उचलला नाही. फक्त रिंग होऊ दयायचा. मी कंटाळून फोन करणं बंद केलं. मला ते पैसे परत हवेच होते असं काही नव्हतं. पण पैसे मागितल्यानंतर मात्र खुप विचित्र वागला तो. पुन्हा पंधरा दिवसांनी वगैरे फोन केला तेव्हा लक्षात आलं की त्याने फोन नंबर बदलला आहे. मी त्या दहा हजारांसाठी कुठे कोल्हापूरला जाणार होतो. आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्याने त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो मोकळेपणाने सांगायला हवा होता.हे असं फोन न उचलणं आणि नंतर नंबर बदलणं या गोष्टीचं खुप वाईट वाटलं.
सहा सात वर्ष अंतरदेशीय पत्रातून टिकलेली आमची मैत्री त्याने अशा पद्धतीने संपवली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता मात्र मी शहाणा झालोय. कुणी म्हटलं की अरे थोडी मदत हवीय की त्यानं पुढचं काही म्हणायच्या आधीच मी म्हणतो, "पैसे सोडून बोल". मग तो कुणीही, कितीही जवळचा असो. पैसे देण्यास नाही म्हटलं तर नातं दुरावेल, हरकत नाही. जे नंतर होणार आहे ते आता होईल...
वर्गीकरण
संपादक मंडळास विनंती...
ए धन्या , जरा १००० रू. दे ना
In reply to ए धन्या , जरा १००० रू. दे ना by सुहास..
अरे त्या वाश्याला १०००
मुक्तपीठ
In reply to मुक्तपीठ by कपिलमुनी
सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं
In reply to सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं by धन्या
शिवी नाही
हा हा हा
बर्याच वेळा फटका बसला की रे
In reply to बर्याच वेळा फटका बसला की रे by प्रचेतस
त्या लोकेशने दिले का पैसे
वाईट अनुभव
In reply to वाईट अनुभव by सुधीर
+१११
देर आए दुरुस्त आए.
काही मार्ग - ज्याला पाहिजे
In reply to काही मार्ग - ज्याला पाहिजे by जयंत कुलकर्णी
चेक
धन्या.. अरे असंख्य वेळा असले
In reply to धन्या.. अरे असंख्य वेळा असले by गवि
अगदी असाच माझाही एक मित्र
हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस
In reply to हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस by यकु
भन्नाट किस्सा !!!
In reply to हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस by यकु
आणि एके दिवशी फोनवर रडायला
In reply to आणि एके दिवशी फोनवर रडायला by स्वानन्द
ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय
In reply to ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय by यकु
यशा, डुकरा मला इथं पप्पा
In reply to यशा, डुकरा मला इथं पप्पा by स्पा
रोम्यांटिक नाही तर काय !!!!
In reply to रोम्यांटिक नाही तर काय !!!! by विश्वनाथ मेहेंदळे
गपा रे लेको आता.. किती बाजार
In reply to ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय by यकु
प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश
In reply to प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश by गवि
हीहीही खरंय गवि, आजकाल
In reply to प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश by गवि
तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय
In reply to तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय by वपाडाव
हॅहॅहॅ वप्या लेका गप ना राव
In reply to तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय by वपाडाव
क्रमही महत्वाचा आहे..
सबसे बडा रुपैय्या..
अनंत फंदीचा फटका
In reply to अनंत फंदीचा फटका by रणजित चितळे
+१
(पठाण ) यक्कू __/\__ आणि एके
In reply to (पठाण ) यक्कू __/\__ आणि एके by स्पा
अरे मन्या
धन्या!
लेख वाचून Hamlet मधला हा डायलॉग आठवला !
मित्रा, लै मित्र गमावलेत मी
चांगलाच महाग
बहुतेक जणं फसतातच....
आता तर मी कोणाचा
मी दोन-तीन जणांना पैसे दिले
चालायचेच ...
In reply to चालायचेच ... by छोटा डॉन
काहीवेळा केवळ 'परत द्यायची
बर्याचदा असे होते की नाही
In reply to बर्याचदा असे होते की नाही by गणामास्तर
हेच आणि असेच म्हणतो. तरी
In reply to हेच आणि असेच म्हणतो. तरी by बॅटमॅन
+१
In reply to +१ by मोदक
म्हणून किसनला अशी पुस्तकं
In reply to +१ by मोदक
साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं
In reply to साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं by धन्या
बहुतेक तुझ्यामुळे आलेल्या
In reply to बहुतेक तुझ्यामुळे आलेल्या by गणपा
मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं
In reply to मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं by धन्या
पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन
In reply to पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन by प्रचेतस
ए काय चाललंय रे..??
In reply to ए काय चाललंय रे..?? by मोदक
राग वैग्रे कसला हो
In reply to राग वैग्रे कसला हो by प्रचेतस
अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते..
In reply to अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते.. by मोदक
अबे.. तुला एकट्याला उत्तर
In reply to अबे.. तुला एकट्याला उत्तर by प्रचेतस
सोडा प्यायला भेटशील ना..? तिथेच साखरेची साल काढूया..
In reply to सोडा प्यायला भेटशील ना..? तिथेच साखरेची साल काढूया.. by मोदक
भेटूयात की आज १० वाजता तिथं.
In reply to भेटूयात की आज १० वाजता तिथं. by प्रचेतस
लक्ष आहे बरं का माझे.
In reply to राग वैग्रे कसला हो by प्रचेतस
वल्लीसाहेब, द्या टाळी! मला
In reply to वल्लीसाहेब, द्या टाळी! मला by रेवती
हॅहॅहॅ. मलाही आधी पुलंच लिखाण
In reply to हॅहॅहॅ. मलाही आधी पुलंच लिखाण by प्रचेतस
हे पण तुला भावणार नाही का रे..?
In reply to हे पण तुला भावणार नाही का रे..? by मोदक
पुलंच्या एकूण सर्वसाधारण
In reply to हे पण तुला भावणार नाही का रे..? by मोदक
मोदकाला पण हार्दिक
हम्म्.......फार काही
संवेदनशीलतेची दारे कृपया बंद करु नका...
In reply to संवेदनशीलतेची दारे कृपया बंद करु नका... by योगप्रभू
+१
In reply to +१ by टुकुल
इतरांसारखी माझी पण फसवणुक
In reply to इतरांसारखी माझी पण फसवणुक by धन्या
नक्किच वाईट वाटत, छोटी जरी
In reply to नक्किच वाईट वाटत, छोटी जरी by टुकुल
+१
मी दिले
In reply to मी दिले by निनाद
धोतराचा किस्सा आवडला. असे धडा
In reply to धोतराचा किस्सा आवडला. असे धडा by गणपा
+१
In reply to धोतराचा किस्सा आवडला. असे धडा by गणपा
आम्हीसुद्धा +१
आनंद आहे, यावर अतिशय चांगला
सेम टू सेम !!!!!