Skip to main content

ईडल्या-चटणी / ईडल्या-सांबार

ईडल्या-चटणी / ईडल्या-सांबार

Published on बुधवार, 09/05/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
राम्राम मंडळी , इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो. पण एक लफडे असे आहे , एक पाकिट आणले की त्यात जवळपास ३६ ईडल्या होतात; त्यामुळे मग २-३ सांजेला ईडली-चटणी / ईडली-सांबार असा बेत असतो. फारच हुक्की आली तर डोसे करतो. तर परवा असेच एक पाकिट आणले. मग आज सकाळी इडली-चटणी चा बेत केला. चटणी पा़कृ यापुर्वी वालाच्या शेंगांच्या बरोबर दिली गेल्या आहे.ईडली करणे सोपे आहे , ईडली पात्र मात्र हवे त्यासाठी. एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही ( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा). तेल लावुन झाले की एक एक चमचा ईडली आटा एकेका ईडलीच्या साच्यात टाका. अन मग ईडली पात्र कढईत ठेवा न वरुन झाकण ठेवुन द्या. २-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा. १० मिनिटे झाकण तसेच असु द्या. मग ईडली पात्र कढई बाहेर काढुन गार होउ द्या. सुरीचा वापर करुन काळजीपुर्वक ईडल्या काढुन घ्या अन चटणीबरोबर ओरपा. क्रमश: ( सांबार पा कृ पुढच्या भागात , त्याची कृती सौजन्य पैसा तै. )

याद्या 12365
प्रतिक्रिया 23

एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा) .तेल लावुन झाले की एक एक चमचा ईडली आटा एकेका र्ईडलीच्या साच्यात टाका. अन मग ईडली पात्र कढईत ठेवा न वरुन झाकण ठेवुन द्या. २-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा. आटा भिजवत नाय का ? की डायरेक गिल्ला आटा मिलतो ?

In reply to by इरसाल

>>इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो. डायरेक गिल्ला आटा मिलतो ना भौ.

फोटो चांगला आहे. चटणी मस्तच दिसतेय! पण कढईत पाणी ठेवून इडल्या वाफवून निघतात? नाय म्हणजे आम्ही इडलीसाठी स्पेशल कूकर बिकर घेऊन बसलोत, त्याची खरं तर मोठी आवश्यकता नाही वाट्टं!

In reply to by पैसा

>>> नाय म्हणजे आम्ही इडलीसाठी स्पेशल कूकर बिकर घेऊन बसलोत.. तसं पैसाताईकडे इडली-सांबाराचा आस्वाद घेतला असल्याने हे माहितीच आहे... :) - पिंगू

व्वा....! सकाळी सकाळी इडली. लै भारी हं कुंदनशेठ. बाकी, शुद्धलेखनाचं तुम्ही कै टेन्शन घेऊ नका. ’चिकटत’ शब्द बरोबर आहे. -दिलीप बिरुटे

ह्यात पाककृती कुठे आहे ? बाकी ही डिश अंडे घालून कधी करता येईल ? तिकडे फटू देखील बुरख्या आडून काढावे लागतात का ? कढईत उकळलेल्या पाण्याचे काय ? ते इनोसाठी ठेवले आहे का ? बाकी कुंद्या सारख्या आमच्या फायनॅन्सरला देखील 'डायरीया' झाल्याचे पाहून शरम वाटली. ह.भी.*नानासाहेब चेंगट ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. *हरामखोर भिकारचोट

In reply to by परिकथेतील राजकुमार

२-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा. "कढइखालील" हा शब्द गाळून अर्धवट सल्ला दिल्यामूळे तुमचा हा लेख पाककृती ह्या सदरातून बाद करावा अशी आम्हि विणंती करित आहोत. लवकर लेख संपादीत करा आणी "अप्रतीम" या चांदणीला पात्र व्हा .. त्वरा करा ..

अरे व्वा कुंद्य सुधारला वाटते............ कधी नव्हेत तो अख्खा लेख लिहिलाय.तेही पुढच्या लेखाच्या आश्वसना सहीत !!!

ह्या पाकृ च्या पोस्ट बद्दल कुंदन शेट ना "हवालदार भिकु मोलकरीन सखु" ची ह्या अजरामर कलाकृतीची शिडी पोस्ट पेड कुरीयर ने पाठवल्या गेली आहे.

छान ! पण क्रमशः लवकर येऊ दे हो ;)

In reply to by गणपा

हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग' जोरात चाललेले दिसतायत. तुम्हाला सट्ट्याचे प्रयोग असे म्हणायचे आहे का? की सुट्ट्याचे प्रयोग असे म्हणायचे आहे?

बरा स्वयंपाक करतोस तु मग बायको तुला टोले का देत असते? जरा नंबर दे बघु बायकोचा.. तुझी वकीली करतो जरा

चान चान! अवांतर (ह्ये टीप्प असते) : आमच्या अप्पार्टमेंट्ट मध्ये येक तमिळ बाई असते. ती आमच्या गरी आल्यावर सांगत असते, तुमची इड्डली पुगत नसते कारण तुमी इडलीपात्र मदी परत परत पीट सोडत असते. येकदाच पीट सोडून चम्मचा बाजूला क्येला की इड्डली टम्म पुगते.... आनि इडली झालं का बगायला चाकू गेऊन टोचून बगायचा. चाकू किलीन आलं की झालं. आमचं आई तसं केलं की झालं की वो टम्म.... त्ये इडली म्हणतो मी! :)

In reply to by शिल्पा ब

मी सांगितलेली चटणी करायला मात्र १० मिनिटे पुरेशी आहेत. तेंव्हा उगाच आळशीपणा न करता सहज जमाव्यात कोणालाही. आणि जेवणा/खाण्यासारख्या चांगल्या कृतीला "गिळणे" म्हणणे म्हणजे ..... असो.