Skip to main content

(एक कवी संपून गेला ..)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईंची 'एक क्षण निसटू गेला..' ही कविता वाचून आमच्या मनातला विचारांचा कल्लोळ थांबेना! ;) लांबलचक विचारांच्या तोंडाशी.. थांबून राहिलेली कविता, पांढर्‍या शुभ्र कागदावर.. थेंबभर शाईसारखी, टप्पकन पडली... एक लाट उंच उसळली.. कागदावर आणि मनात! एकाच वेळी!! क्या बात है!!! भावनेचा आविष्कार अजून एक काव्य लगोलग आत गेलो.. वाट बघत बसलेले ताव गोंजारले.. हळूच खिडकीची झापे उघडी केली.. आणि गेलो.. पांढर्‍यावर काळे करण्यापुरतं पेन आणायला.. ते 'पेन' तो क्षण!!! येव्हढ्यात येऊन गेला.. छ्या!!! जाऊदे! जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला.. चतुरंग
Taxonomy upgrade extras

वाचने 4547
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

राजन खान यानची एक लेखक सन्पुन गेला ही कथा वाच ! फार छान आहे काहि चुकल्यास माफि असावि !

विचारांचा कल्लोळ आवडला. (विचारमग्न)बेसनलाडू

जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला.. वा! क्या बात है रंगा...!

छ्या!!! जाऊदे! जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला.. अरेरे! :)

एकाच वेळी!! क्या बात है!!! भावनेचा आविष्कार अजून एक काव्य इतिहासाची पाने चाळल्यास भावनेच्या आविष्कारामुळे रंगाशेठ का जिभल्या चाटतात, हे सहज लक्षात येते. - (स्मरणशील) सर्किट

विडंबन मस्त आहे. छ्या!!! जाऊदे! जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला..

विडंबन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकस कवितेचे सुरस विडंबन