तिन्ही त्रिकाळ
संध्याकाळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
मेंदूतले घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओले घसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओळींना धार
ओळींचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
जगायचा वीट
जगतोय धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
मरणाशी भेट
कविताच थेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6660
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! एक
वा वा बेसनलाडवा, मस्तच!
छान !!!
वा
मस्त
छान
१ नंबर..........
एकदम सह्ह्ही..
छान आहे
नवीन शैली आवडली
स्पष्टीकरण
In reply to नवीन शैली आवडली by धनंजय
अनेकवचन/विडंबन
In reply to स्पष्टीकरण by बेसनलाडू
हसे थेट नसणे
In reply to अनेकवचन/विडंबन by धनंजय
हेच म्हणतो
In reply to नवीन शैली आवडली by धनंजय
उत्तम कविता...
मस्त !
आयला सही...