मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?
मिपाकर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.
शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!! खरे तर मला "मानवी जीवनात धर्माचे स्थान काय" हा मुद्दा त्याच चर्चेत मांडायचा होता.पण चर्चा अजून भरकटायला नको म्हणून नवा धागा काढत आहे.
मुळात धर्माची स्थापना का झाली असावी?माणूस गुहेतून बाहेर आला, समुदाय करून राहायला लागला, शेती करायला लागला त्यावेळी समाजात अर्थातच राजसत्ता नव्हती.जर कोणी दुसऱ्यावर अन्याय केला तर त्याबद्दल जाब विचारायला काही यंत्रणा नव्हती.बळी तो कान पिळी असाच न्याय त्यावेळी असायची शक्यता जास्त.अशा वेळी समाजातील जाणत्या लोकांना अशा प्रकारचा लगाम घालणारी एखादी यंत्रणा असावी असे वाटायला लागले तर ते नवल नाही. यातूनच नक्की कोणती वर्तणूक योग्य आणि कोणती अयोग्य याबद्दल नियमावली पुढे आली. समाजातील ज्या घटकांना अशी नियमावली मान्य नसेल त्या घटकांसाठी "तू नियम मोडलेस तर तुला पाप लागेल" या धर्तीवर पाप-पुण्याची आणि सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारी शक्ती म्हणून देवाची संकल्पना पुढे आली. नंतरच्या काळात या नियमांमध्ये कालपरत्वे बदल करून, त्यात भर टाकून एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली असावी आणि यालाच धर्म असे म्हटले गेले. तेव्हा धर्म म्हणजे समाजात वावरताना पाळायचे नियम. आणि हे नियम अनेक शतकांच्या अनुभवातून तयार झालेले असून अपरिवर्तनीय अजिबात नाहीत.
सध्याच्या काळात माणसाची मोबिलिटी आहे तेवढ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी नव्हती.तसेच सर्व कामे हातानेच करायला लागत. केस कापण्यापासून कपडे शिवण्यापर्यंत अनेक गरजा पूर्ण करायला यंत्रे नाहीत की बाहेर कुठे जाऊन काम होणाऱ्यातले नाही की बाहेरचे कोणी येऊन ते करायची शक्यता नाही. तेव्हा ही कामे गावातल्या गावातच करून द्यायला जीवनाची एक गरज म्हणून सुतार, लोहार, सोनार आणि इतर कामे करणारे बलुतेदार आले.लिहायला-वाचायला शिकविणे हा एक पेशा झाला. तसेच परकीय आक्रमणांपासून संरक्षण करायला सैनिकी पेशा आला आणि इतर कामे करायला विविध पेशे आले. आणि या सगळ्या पेशातील लोकांनी काय करावे यासाठी नियमावलीत बदल केले असायची शक्यता आहेच.
या सगळ्या व्यवस्थेत तक्रार करण्यासारखे फारसे काहीच नाही.पण नंतरच्या काळात हे सगळे व्यवसाय पिढीजात झाले. म्हणजे झाडूवाल्याच्या घरी जन्माला आलेल्याला आयुष्यभर झाडू मारायचेच काम करायचे!! मला वाटते की अवनतीला सुरवात त्यापासून झाली. म्हणजे एखाद्याला वेगळे काही करायचे असेल तरी ते कसे करणार? आपल्या नियमावलीत (धर्मात) ते म्हटलेले नाही ना? यातूनच अत्यंत रिजिड अशा जाती निर्माण झाल्या.मग त्या जातींचे अभिमान आले. नियम मोडले तर शिक्षा करायला देव बसला आहे त्या देवाची आराधना करून त्याला खूष ठेवायला हवे हा विचार पुढील काळात बळावला.मग त्यासाठी विविध पूजा-अर्चा, कर्मकांडे, व्रतवैकल्ये आणि इतर अनेक प्रकार आले आणि सगळेच कडबोळे झाले. बरं हे सगळे काही हजार वर्षांच्या काळात evolve झालेले.मुळातले काय आणि घुसडलेले काय हे तपासायला गेले तर त्याचे उत्तर सापडणे केवळ अशक्य.तेव्हा समाजात नितीमत्ता राहावी या उद्देशाने तयार केलेल्या नियमांबरोबरच देवाला खूष करायला केलेली कर्मकांडे, जातीपाती या सगळ्यांची भेसळ "धर्म" या प्रकारात झाली.
सध्याच्या काळाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की समाजात नितीमत्ता ठेवायला योग्य प्रकारे बनविलेले कायदे आणि ते कायदे योग्यपणे राबविणारी पोलीस आणि न्यायसंस्था ही घराबाहेरील जीवनासाठी आणि घरातील जीवनासाठी भारतातच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चांगल्या गोष्टी: कुटुंबियांची एकमेकांविषयीची कर्तव्ये वगैरे गोष्टी पुरेशा आहेत. मुळातला धर्म तरी काय वेगळा होता? संपूर्ण महाभारताचे सार व्यासांनी एका ओळीत सांगितले आणि ते म्हणजे "दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप". मुळातला धर्म यापेक्षा वेगळा असेल असे वाटत नाही.
तेव्हा मिसळपावसारख्या वेबसाईटवर लेखन करणाऱ्या (म्हणजे सुशिक्षित आणि चांगले-वाईट काय याचा विचार करायची क्षमता असलेल्या) वर्गाच्या दृष्टीनेतरी ज्याला सध्या धर्म म्हटले जाते त्या कडबोळ्याचा उपयोग काय?देव म्हणावा तर तो पण "पाप-पुण्याचा अकाऊंटंट" म्हणून माणसानेच जन्माला घातलेला.तेव्हा त्याला खूष ठेवायला केलेल्या पूजा-अर्चा पूर्णपणे निरर्थक.समाजात वावरायचे नियम म्हणाल तर सध्याच्या काळाला अनुसरून असलेले जास्त योग्य नियम सध्याच्या कायद्यात बघायला मिळतील. (कायदा चुकीचा आहे असे कोणाला वाटत असेल तर अधिक योग्य कायदे आपल्यालाच बनवता येऊ शकतात/शकतील). आणि एखाद्या घरी जन्माला आल्यामुळे ते कडबोळे खायला मिळत असेल तर त्याबद्दल वाटणारा अभिमान ही आणखी अनाकलनीय गोष्ट.कारण त्या कडबोळ्याचा गाभा (सद्वर्तनाचे नियम) इतर घरात जन्माला आलेल्यांकडे नसतो हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.
तेव्हा सध्याच्या काळात धर्म आणि देव हा प्रकारच रद्दबादल केला तर नक्की काय बिघडेल?व्यक्तिश: माझे तरी त्यामुळे अजिबात काहीही बिघडणार नाही.कारण कोणतेही प्रलोभन किंवा कोणतीही भिती नसेल तरी इतर कोणालाही त्रास देऊ नये आणि शक्य तेवढे इतरांच्या उपयोगीच पडावे असे मला मनापासून वाटते (ते अंमलात किती आणणे शक्य होते ही गोष्ट वेगळी). आणि ही गोष्ट फार स्पेशल अशी नक्कीच नाही तर माणसामध्ये असलेला हा किमान चांगुलपणा आहे. तो धर्म या संकल्पनेचे नावही न ऐकलेल्या लहान मुलांमध्येही बघायला मिळतो. तसेच देवाला खूष ठेवायचे म्हणाल तर गणेशोत्सवात आमच्या पुण्यात होणाऱ्या कर्णकर्कश धांगडधिंग्याचा किंवा कधी मुंबईला गेलो तर लोकल ट्रेनमध्ये म्हटल्या जाणाऱ्या भजनांचा मला स्वत:ला तर त्रासच होतो आणि हे प्रकार नसते तर किती बहार आली असती असेच मला वाटते.मी कधीही कोणतीही पूजा करायला जात नाही की कोणतेही स्तोत्र म्हणत नाही.
तेव्हा धर्म आणि देव या दोन्ही गोष्टी कॅन्सल करून टाकल्या तरी मला स्वत:ला त्याचा काहीही फरक पडणार नाही (किंबहुना वैयक्तिक पातळीवर मी या दोन गोष्टी कधीच कॅन्सल केल्या आहेत). इतर मिसळपावकरांना याविषयी काय वाटते? धर्माचे आपल्या जीवनातील नक्की स्थान काय?
वाचने
27700
वाचनखूण
प्रतिक्रिया
88
तुम्हाला "धर्म" व "देव" या
In reply to तुम्हाला "धर्म" व "देव" या by बॅटमॅन
चांगुलपणा
In reply to चांगुलपणा by पुण्याचे वटवाघूळ
सहमत आहे.
मला तरी अस वातट. की
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by धन्या
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पुण्याचे वटवाघूळ
साने गुरूजी
In reply to साने गुरूजी by विकास
धन्यवाद
In reply to लेख आवडला. by धन्या
धन्याभाऊ! समर्पक प्रतिसाद..
In reply to धन्याभाऊ! समर्पक प्रतिसाद.. by योगप्रभू
चिकित्सा
In reply to चिकित्सा by पुण्याचे वटवाघूळ
याचाच अर्थ तुम्ही संभ्रमित स्थितीत आहात..
In reply to याचाच अर्थ तुम्ही संभ्रमित स्थितीत आहात.. by योगप्रभू
योगप्रभू एकदम मस्त
In reply to लेख आवडला. by धन्या
+१
आज कॉफी जरा जास्तच घेतली !!
In reply to आज कॉफी जरा जास्तच घेतली !! by अर्धवटराव
धन्यवाद अर्धवटराव
In reply to धन्यवाद अर्धवटराव by पुण्याचे वटवाघूळ
ओके.. कंटिन्यु करतो !!
In reply to ओके.. कंटिन्यु करतो !! by अर्धवटराव
एक बीज- त्यातुन मुळं-खोड-
In reply to ओके.. कंटिन्यु करतो !! by अर्धवटराव
उदाहरण घेऊन सांगाल?
In reply to उदाहरण घेऊन सांगाल? by पुण्याचे वटवाघूळ
उदाहरण !!
In reply to उदाहरण !! by अर्धवटराव
??
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
आता कपळच्या थोडं वर सरकुया !!
In reply to आता कपळच्या थोडं वर सरकुया !! by अर्धवटराव
परत फ्रेम केलेला प्रश्न
In reply to परत फ्रेम केलेला प्रश्न by पुण्याचे वटवाघूळ
परत फ्रेम केलेले उत्तर !!
In reply to परत फ्रेम केलेले उत्तर !! by अर्धवटराव
झालं तर मग
In reply to झालं तर मग by पुण्याचे वटवाघूळ
सुखी रहा !!
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
आपणच धर्माचे उत्तर दिले आहेत
मानवी जीवनात धर्माचे स्थान
एsss..चाय कॉफी कोल्ड्रिंक पॉपकॉर्न चाकलेट आइस्क्रिम चिंगमवालाsss
In reply to एsss..चाय कॉफी कोल्ड्रिंक पॉपकॉर्न चाकलेट आइस्क्रिम चिंगमवालाsss by अत्रुप्त आत्मा
तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता.
In reply to तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. by धन्या
अहो, ती सत्यनारायणाची असत्य
In reply to तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. by धन्या
ओक्के धनाजी... अत्ता जरा
मानव जातीत माणूसकीचे स्थान
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
अमानुष घोषणा.
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
असेच
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
येस्स्स
In reply to येस्स्स by कवितानागेश
आजच्या या स्पर्धात्मक युगात
मिपाकरांनी उत्तर दिले तर
In reply to मिपाकरांनी उत्तर दिले तर by कपिलमुनी
बघू
"मिसळपावसारख्या वेबसाईटवर
>>>मानवी जीवनात धर्माचे स्थान
In reply to >>>मानवी जीवनात धर्माचे स्थान by नाना चेंगट
ओक्के !
In reply to >>>मानवी जीवनात धर्माचे स्थान by नाना चेंगट
आणि मग तुमच्या मनात असलेल्या
धर्म
In reply to धर्म by रणजित चितळे
आश्चर्यचकीत !!!
In reply to आश्चर्यचकीत !!! by धन्या
माझी हीच मते आहेत
In reply to धर्म by रणजित चितळे
+१
In reply to +१ by मूकवाचक
हिम्मत !!
In reply to हिम्मत !! by अर्धवटराव
चर्चेचे गुर्हाळ
In reply to चर्चेचे गुर्हाळ by पुण्याचे वटवाघूळ
पुढे चालु !!
In reply to धर्म by रणजित चितळे
रणजीत दा ! आपले हेच मत सर्व
In reply to रणजीत दा ! आपले हेच मत सर्व by सुहास..
सुहास.. हो बाकीच्या....
त्याच बरोबर धर्मात सांगितल्या
In reply to त्याच बरोबर धर्मात सांगितल्या by पुण्याचे वटवाघूळ
साहेब
In reply to त्याच बरोबर धर्मात सांगितल्या by पुण्याचे वटवाघूळ
सहमत...
In reply to सहमत... by प्रभाकर पेठकर
+१
धर्म मानणारे आणि न मानणारे या
उत्तम चर्चा. वाचते आहे.
उठसुठ
In reply to उठसुठ by अँग्री बर्ड
वर विजूभाऊंनी लिहिलेला
In reply to उठसुठ by अँग्री बर्ड
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पुण्याचे वटवाघूळ
माणुसकी
In reply to माणुसकी by अँग्री बर्ड
त्याची तुम्हाला काळजी नको
प्रश्नचिन्ह
In reply to प्रश्नचिन्ह by सहज
+
In reply to + by विकास
+१
In reply to +१ by Nile
अहो...
धर्म म्हणजे काय ?
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
अजून जास्त नंतर लिहितो.
In reply to अजून जास्त नंतर लिहितो. by पुण्याचे वटवाघूळ
>>>मला वाटत होते की
In reply to >>>मला वाटत होते की by नाना चेंगट
विचारशक्ती किंवा "जजशक्ती"
In reply to विचारशक्ती किंवा "जजशक्ती" by पुण्याचे वटवाघूळ
मग आपण खाली वाकून दगड उचलून
In reply to मग आपण खाली वाकून दगड उचलून by नाना चेंगट
प्राण्यांमधील बुद्धिमत्तेच्या पातळ्या भिन्न आहेत..
In reply to प्राण्यांमधील बुद्धिमत्तेच्या पातळ्या भिन्न आहेत.. by योगप्रभू
याचाच अर्थ असा की सरसकटपणे
In reply to मग आपण खाली वाकून दगड उचलून by नाना चेंगट
प्राणी
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून by पुण्याचे वटवाघूळ
साहेब
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
यतार्थ
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
१. धर्म हा शब्द फक्त हिंदू
In reply to १. धर्म हा शब्द फक्त हिंदू by बाळ सप्रे
होय .. असे म्हणता येईल.
In reply to होय .. असे म्हणता येईल. by विटेकर
विटेकर साहेब
In reply to होय .. असे म्हणता येईल. by विटेकर
सगळे एकाच धर्माचे, सगळेच
चर्चा वाचत आहे. योगप्रभु आणि
सजीवांच्या प्रतिक्रिया ...
परत एकदा अनाहूत सल्ला
In reply to परत एकदा अनाहूत सल्ला by क्लिंटन
क्लिंटन व्हेटरन झाला