राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठी घटनेतील नियमात लिहीलेल्या Literature, science, art and social service या चार पैकी, सचिन नक्की कशात बसतो ह्या चर्चेत खालील वाक्य होते:
सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का? का सेवा करायची म्हणजे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रच असले पाहिजे?या वाक्यावरून वेगळा चर्चा प्रस्ताव टाकायचा मोह झाला. चर्चा सचिनबद्दल नसून तसेच त्या वाक्यासंदर्भात व्यक्तीगतही नसून, केवळ "समाजसेवा" नक्की कशाला म्हणावे या संदर्भात आहे. सचिन माझा देखील लाडकाच आहे, पण critical thinking करायचे झाल्यासः क्रिकेटमधे कोट्यावधी रुपये मिळवणार्या, ते कमी पडतात म्हणून का काय अंबानीकडे आयपीएल लिलावातून त्यांच्या मुंबई इंडीयन्स मधे (अजून पैशासाठी) काम करणार्या, ते ही कमी पडते म्हणून "ये दिल मांगे मोर" म्हणत पेप्सीची (पैशाच्या मोबदल्यात) जाहीरात करणार्या आणि पब्लिकला प्रॉडक्टीव्ह टाईममधे काम-धंदा सोडायला लावून, खिळवून ठेवणार्यास नक्की समाजसेवक कसे म्हणावे? का समाजसेवेची व्याख्या पण इतर अनेक मुल्यांप्रमाणेच पातळ (dilute) झाली आहे? या विशिष्ठ उदाहरणात म्हणजे सचिनच्या संदर्भात तसेच इतर अशा कोणाच्याही संदर्भात, पैसे कमवणे याबद्दल मला आक्षेप नाही. रग्गड पैसा केल्यावर, समाजसेवा केली तर किती चांगले होईल असे नक्कीच वाटेल पण तशी एखाद्याची इच्छा नसेल तर त्याला देखील आक्षेप नाही. कारण अक्षरशः हे घाम गाळून कमावलेले पैसे आहेत. ते कसे वापरावेत हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. उगाच मोरॅलीटीचा दबाव आणणे मला योग्य वाटत नाही, कारण त्यातून पैसे कमावणे म्हणजे काहीतरी अपराध केला अशी भावना बळावू शकते, जी आपल्याकडे अनेक दशके/शतक+ वर्षांसाठी मारक ठरली आहे... असो. पण मग समाजसेवा म्हणजे काय? गोदूताई परूळेकर, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, अभय बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे आदी अनेकांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिले आणि एकेका प्रश्नाच्या मागे, त्यांच्या तत्वनिष्ठांशी प्रामाणिक रहात कुठल्यातरी प्रश्नाला वाचा फोडली, रंजल्या-गांजल्याला आपले म्हणले, व्यवस्था तयार केली, उत्तरे शोधली. वगैरे वगैरे... पण ही झाली मोठी माणसे. आपण त्यांचेच एका अर्थाने देव करत आरत्या ओवाळू लागतो कारण ते सोपे असते. असेच आत्ताच्या काळातले उदाहरण म्हणजे: डॉ. हरीश हांडे. ह्या माणसाने ९३-९४ साली अमेरीकेत अपारंपारीक उर्जा या त्यावेळच्या अपारंपारीक विषयात एम एस केले. नंतर त्याला सौर उर्जेने भारतीय उपखंडातील उर्जेचा प्रश्न सोडवायचा होता. आधी विषुववृत्ताच्या अगदी जवळ (अधिक सुर्यप्रकाश) म्हणून श्रीलंकेत गेला. नेमके त्याच सुमारास तेथे नागरी युद्ध अधिक जोरात चालू झाले आणि तो भारतात त्याच्या कर्नाटकातील गावामधे गेला. का तर तेथे नातेवाईकांच्या ओसरीवर झोपायला जागा मिळेल, तेव्हढेच पैसे वाचतील म्हणून आणि दुर्गम भागातील खेड्यांमधे त्याने उर्जा देण्याचे काम चालू केले. महत्वाचे म्हणजे फुकटात नाही पण केवळ पैसे करण्याच्या हेतूने देखील नाही. त्यातून त्याने एक व्यवस्था तयार केली आणि हजारो घरांमधे दिवेलागण करून दाखवली. गेल्या वर्षी त्याला मॅगॅसेसे पारीतोषिक मिळाले... कधी भेटता आले, ऐकता आले तर अवश्य अनुभव घ्या... ही काही त्याची जाहीरात नाही. त्याला गरजही नाही. पण एक समाजसेवेचे उदाहरण म्हणून सांगिताना जे वाटते ते लिहीले इतकेच. अर्थात समाजसेवा ही केवळ रंजल्या-गांजल्यांसाठीच असते अशातला भाग नाही, पण तो एक मोठा भाग आहे. कुणाला पटोत अथवा न पटोत पण आत्ताच्या काळातल्या अण्णा हजारेंपासून ते आधीच्या काळातील अनेक समाजधुरीणांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाजसुधारणेच्या क्षेत्रात योगदान केले आहे. पण तुर्तास हा विषय येथे मर्यादीत ठेवूयात. पण अशी समाजसेवा नोकरदार / प्रापंचिक माणसाला स्वतःचे आयुष्य नुसतेच जगताना नाही तर मनापासून उपभोगताना करता येऊ नये काय? मला तसे वाटत नाही. किंबहूना वर म्हणल्याप्रमाणे नैतिक दबाव (मॉरल प्रेशर) म्हणून नाही तर जबाबदारीच्या जाणिवेतून सर्वांनीच काहीतरी समाजसेवा करावी असे वाटते - जिथे आवडते तिथे, ज्या विषयात आवडते त्या विषयात आणि सुरवातीस अगदी जेव्हढा वेळ देता येईल तितकाच... सध्याच्या काळात बिल गेट्स, वॉरन बफे आदींनी आधी संपत्ती केली आणि नंतर आता त्याचा समाजासाठी उपयोग करायला वापर करत आहेत. तेच क्लिंटन फाउंडेशन काढून तर त्याच्या बरेच आधी जिमि कार्टर ने हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या ख्रिश्चन धर्मातील शिकवणीप्रमाणे संस्था काढून समाजसेवेचे काम केले अनेकांना प्रेरणा देखील दिली. चर्चमधे दर रविवारी प्रार्थना झाल्यावर पैसे गोळा करायची प्रथा आहे ज्यातून विशेष करून कॅथलिक पंथ जगभर नुसतेच धर्मांतर करत हिंडत नाही तर त्यांच्यातील स्वयंसेवकांच्या मार्फत सेवापण करत असतो. वास्तवीक (गेट्स-बफे सारखे) असे काम आपल्याकडे देखील पुर्वी चालायचे. त्यात आत्ता लगेच आठवते त्याप्रमाणे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती असोत, अनेक पार्सी ट्रस्ट्सच्या शिष्यवृत्ती असोत का टाटा - बिर्ला सारखे उद्योगपती असोत... न बोलता पैशाने आणि पुस्तकाच्या रुपाने शेवटपर्यंत अखंड मदत केलेल्या पुल-सुनिताबाईंचे उदाहरण वास्तवीक पुलंच्या चाहत्यांनी कायम लक्षात ठेवण्यासारखे आणि आत्मसात करण्यासारखे आहे... पण नंतर "राजा कालस्य कारणम" झाले का "पैसा कालस्य कारणम" झाला माहीत नाही, स्वार्थ, अनास्था, व्यवस्थेवरील अविश्वास, तसा अविश्वास तयार होणारे अनुभव.. कारणे काही असोत पण असे वाटते की एक अब्जांच्या देशात तुलनेने तेव्हढी समाजसेवेची वृत्ती वाढली नाही. तरी देखील जे काही तुलनेने कमी आहेत त्यात देखील प्रेरणा देणारे खूप काही आहे... मधे एकदा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ५२ भागात असेच जगावेगळे करणार्यांच्यावर तपस्या नावाची मालिका झाली होती. ती बघण्यासारखी आहे. त्याव्यतिरीक्त देखील अनेक उदाहरणे असतील... तुमच्या पहाण्यात, अनुभवात तसे काही आले आहे का? समाजसेवेची गरज नक्की कशासाठी आहे असे वाटते?
वाचने
37317
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोसल वर्क म्हणजे आपल्याला
+१.. अगदि साधी अन छोटीशी
In reply to सोसल वर्क म्हणजे आपल्याला by JAGOMOHANPYARE
गोदूताई परूळेकर, मेधा पाटकर,
समाजसेवेचे अनेक मार्ग
समाजसेवा .... अनेकप्रकारे.
"त्यांच्यातील स्वयंसेवकांच्या
'स' माज सेवा
+१
In reply to 'स' माज सेवा by सातबारा
:)
जमतील तशी उत्तरे (पटलीच पाहिजे असा आग्रह नाही )
In reply to :) by ऋषिकेश
डॉनरावांशी सहमत आहे.
In reply to जमतील तशी उत्तरे (पटलीच पाहिजे असा आग्रह नाही ) by छोटा डॉन
सहमत
In reply to जमतील तशी उत्तरे (पटलीच पाहिजे असा आग्रह नाही ) by छोटा डॉन
सुनिधी
In reply to सहमत by रणजित चितळे
अंशतः असहमत.
In reply to जमतील तशी उत्तरे (पटलीच पाहिजे असा आग्रह नाही ) by छोटा डॉन
+१
In reply to अंशतः असहमत. by प्रभाकर पेठकर
ऑ ?
In reply to +१ by चिरोटा
शब्बास
In reply to जमतील तशी उत्तरे (पटलीच पाहिजे असा आग्रह नाही ) by छोटा डॉन
आभार
In reply to :) by ऋषिकेश
माझी उत्तरे
In reply to :) by ऋषिकेश
छान चर्चा चालु आहे
In reply to माझी उत्तरे by विकास
भारतातर्फे एशियाडला जायला नकार देणाऱ्या भारतीय टीमचा सदस्य सचीन
आपल्या
समाजसेवा
सॉफ्ट
होय
In reply to सॉफ्ट by चिरोटा
हायला !
अंशतः
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
समाजसेवकाची व्याख्या ही
>>>समाजसेवा म्हणजे काय? गहन
थेट आणि फक्त स्वत:साठी नसलेलं
लेखकानं ज्या अँगलनं विचारलंय त्याचाशी नाही पण
समाजसेवा म्हणजे काय?
सर्व
समजसेवा....
मस्तच
In reply to समजसेवा.... by पिलीयन रायडर
छान चर्चा
आई आई गं !
In reply to छान चर्चा by पैसा
संपादक हे समाजसेवक आहेत का
In reply to आई आई गं ! by परिकथेतील राजकुमार