✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबई कट्टा - एप्रिल २०१२

व
विश्वनाथ मेहेंदळे यांनी
Sat, 04/28/2012 - 12:47  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, मुंबईतील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल ९ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कट्टा करण्याचे योजले आहे. अमेरिकेतील कोकणवासी (तिथे त्याला क्यालीफोर्निया का कायसे म्हणतात म्हणे) आणि जुने-जाणते मिपाकर नंदन यांचे मुंबईत आगमन झाले आहे. त्याप्रीत्यर्थ सदर कट्टा आयोजित केला आहे. मुंबई कट्ट्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरेप्रमाणे (परंपरा ही नेहमी प्रदीर्घ आणि दैदिप्यामानच असते, असे कणेकर गुर्जी म्हणतात), कट्टा श्रीस्थानक अर्थात ठाणे येथे संपन्न होईल. दिवस :- रविवार दिनांक २९-एप्रिल-२०१२ स्थळ :- ठाणे येथील पॉप टेट्स वेळ :- संध्याकाळी ५:३० च्या सुमारास (आनंदी वेळेचा फायदा उठवण्यास थोडे लवकरच आयोजित केले आहे) तूर्तास माहित असलेले कट्टेकरी :- नंदन, रामदास काका, विमे, प्रास, गवि, निखील-मकी, चतुर चाणक्य, अर्थातच किसन, आणि अर्धा स्पा (लवकर जाणार म्हणून अर्धा) इच्छुकांनी मला आणि गविंना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया दोघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास दुसऱ्याला माहित राहील. शोर्ट नोटीस बद्दल मंडळ दिलगीर आहे. पुढील वेळेस मोठी नोटीस दिली जाईल. विमे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10825 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

कट्ट्याला शुभेच्छा. पुरेशा

प्रचेतस
Sat, 04/28/2012 - 12:57 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. पुरेशा वेळेअभावी ह्या वेळी तरी उपस्थित राहणे शक्य नाही. पुढच्या कट्ट्यास हजेरी लावण्याचा प्रयत्न आवर्जून केल्या जाईल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..

प्रभाकर पेठकर
Sat, 04/28/2012 - 13:05 नवीन
अपुर्‍या वेळेतील सुचनेमुळे हजर राहू शकत नाही. हळहळ आणि जळजळ झाली असली तरी कट्ट्यास शुभेच्छा! 'कट्ट्याची छायाचित्रे पाहून हळहळ कमी होईल पण, जळजळ वाढण्याची शक्यता आहे' असा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
  • Log in or register to post comments

नंदन आणि ठाणे

कुंदन
Sat, 04/28/2012 - 13:27 नवीन
नंदन आणि ठाणे कट्टा. नंदन शेठ कट्ट्यापुर्वी काही तरी खास प्लॅन दिसतोय.
  • Log in or register to post comments

जन्मजात वेंधळेपणामुळे पत्ता

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/28/2012 - 13:39 नवीन
जन्मजात वेंधळेपणामुळे पत्ता टाकायचे राहून गेले. सदर पॉप टेट्स हे कोरम मॉल ठाणे येथे आहे. कोरम मॉल प्रसिद्ध असल्याने अजून landmark ची गरज पडू नये. तरीही सदर मॉल ठाण्याला कॅडबरी जंक्शन जवळ इस्टर्न एक्सप्रेस हायवे ला आहे. खर्च साधारण ३००-४०० रु दरडोई येणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी. मेन्यू कार्ड खालील दुव्यावर पाहता येईल http://www.zomato.com/mumbai/restaurants/thane/thane-area/pop-tates-41298/menu#tabtop
  • Log in or register to post comments

पॉप

नितिन थत्ते
Sat, 04/28/2012 - 17:46 नवीन
तुमच्या दुव्यावर पॉप टेट्स हे आर मॉल घोडबंदर रोड येथे आहे असे दिसते. कोरम मॉल नव्हे. मी काही येऊ शकणार नाही. :) त्यातून जमलं तर आयत्यावेळी येईन. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आर मॉल घोडबंदर रोडलाही पॉप

गवि
Sat, 04/28/2012 - 18:06 नवीन
आर मॉल घोडबंदर रोडलाही पॉप टेट्सची शाखा आहे. पण मेन्यूकार्ड कोणत्याही शाखेचे का असेना आपल्याला कोरम मॉल मधल्या पॉप टेट्सला भेटायचं आहे. तेव्हा क न्फ्यु जन नको म्हणून हा खुलासा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ओके

नितिन थत्ते
Sat, 04/28/2012 - 18:27 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काही कारणास्तव माझे आणि मकीचे

निखिल देशपांडे
Sat, 04/28/2012 - 14:18 नवीन
काही कारणास्तव माझे आणि मकीचे येणे जमणार नाही...
  • Log in or register to post comments

व्यनि केलाय....

सुहास झेले
Sat, 04/28/2012 - 14:23 नवीन
व्यनि केलाय.... :) :)
  • Log in or register to post comments

???

किसन शिंदे
Sat, 04/28/2012 - 14:32 नवीन
आईंग...!! मी तर ऎकलं होतं कि विजूभाऊही येताहेत म्हणून आणि त्यांच नाव तर इथे दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

आय माय स्वारी. विजुभाऊ पण

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/28/2012 - 22:04 नवीन
आय माय स्वारी. विजुभाऊ पण आहेत. मी लिहायला विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय राव विमे....

मोदक
Sat, 04/28/2012 - 14:54 नवीन
काय राव विमे.... पुढच्या वेळी हजेरी लावली जाईल.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा !! बहुत

सूड
Sat, 04/28/2012 - 16:33 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा !! बहुत काय बोलणें आपण सुज्ञ आहा.
  • Log in or register to post comments

सुधांशुचा 'सूड'झाला तेव्हाच

प्रास
Sat, 04/28/2012 - 16:58 नवीन
सुधांशुचा 'सूड'झाला तेव्हाच ओळखलं आता 'सूज्ञ'चाही 'सुज्ञ'च होणार ;-) विकांत आहे, सूडराव, करा की काही प्रयत्न नि जमवा.... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कसं जमावायचं? अहो दाखवण्याचा

रेवती
Sat, 04/28/2012 - 21:56 नवीन
कसं जमावायचं? अहो दाखवण्याचा कार्यक्रम नेमका तेंव्हाच आहे. मुलगी आफ्रिकेहून ८ दिवसांसाठी आलिये. तेवढ्यात सगळं ठरवायचय. यावेळी त्याला भरीला घालू नका. जरा संसारला लागू द्या पोराला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

केन्या का झांबिया ??

वपाडाव
गुरुवार, 05/03/2012 - 13:56 नवीन
मुलगी आफ्रिकेहून ८ दिवसांसाठी आलिये.
आज्जे, तुझी शाखा लैच खंडांमध्ये फोफावलेली दिसत्ये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आफ्रिका

स्पा
गुरुवार, 05/03/2012 - 13:59 नवीन
सूड साठी आफ्रिका का.. बर बर ;) मग वप्यासाठी , कुठला देश निवडला आहेस ?परभणी का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

अवांतर

गवि
गुरुवार, 05/03/2012 - 14:11 नवीन
अवांतर : वप्याला आतापासून फप्या म्हणावे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कट्ट्याला शुभेच्छा.

निवेदिता-ताई
Sat, 04/28/2012 - 17:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मुम्बई मध्ये ???? वॉव

जेनी...
Sat, 04/28/2012 - 18:52 नवीन
मुम्बई मध्ये ???? वॉव ....मस्तच :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!!

धन्या
Sat, 04/28/2012 - 19:30 नवीन
येणं जमणार नाही परंतू तुम्ही मजा करा.
  • Log in or register to post comments

कामाचे दिवस हाय्ती... नाय

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/28/2012 - 19:46 नवीन
कामाचे दिवस हाय्ती... नाय येवू शकत... :-)
  • Log in or register to post comments

मी आणि विजुभाऊ

सर्वसाक्षी
Sat, 04/28/2012 - 21:53 नवीन
येणार. व्यनि टाकला आहे.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!

पिवळा डांबिस
Sat, 04/28/2012 - 22:00 नवीन
आमच्या वतीने नंदनला दोन पेग जास्त पाजा!! ;)
  • Log in or register to post comments

चोक्कस... पिडांसेठ्ला अनुमोदन.

बबलु
Sun, 04/29/2012 - 17:12 नवीन
+१ असेच म्हणतो. आमच्याही वतीने नंदनला चांगले चार पेग जास्त पाजा. :) :) :) (अवांतरः- नंदन आणि पिडांसेठ, सॅन फ्रॅन्सिस्कोला कधी येतांव बोला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मी येणार

क्लिंटन
Sat, 04/28/2012 - 22:15 नवीन
मी येणार आहे. रात्रीच्या डिनरचा दुसरा बेत आधीच करून ठेवला असल्याने जेवायला थांबणार नाही. गेले बरेच कट्टे मिस केले होते. हा मिस करायचा नाही.
  • Log in or register to post comments

मी

jaypal
Sat, 04/28/2012 - 22:37 नवीन
९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९% हजर कट्टा प्रेमी जयपाल Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात... झकास..

गवि
Sun, 04/29/2012 - 09:35 नवीन
क्या बात... झकास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

बहुदा जमवतोय.. म्हणजे

शैलेन्द्र
Sun, 04/29/2012 - 00:33 नवीन
बहुदा जमवतोय.. म्हणजे जमवतोच्.. :)
  • Log in or register to post comments

जमवाच... वाट पाहतो..

गवि
Sun, 04/29/2012 - 09:29 नवीन
जमवाच... वाट पाहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

गुर्जी हजर

लीलाधर
Sun, 04/29/2012 - 08:22 नवीन
गुर्जी हजर
  • Log in or register to post comments

वा वा... वेलकम चचा.

गवि
Sun, 04/29/2012 - 08:46 नवीन
वा वा... वेलकम चचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

भेटूच संध्याकाळी

लीलाधर
Sun, 04/29/2012 - 09:06 नवीन
आमच्या हजेरीची दखल घेतलीत हे पाहून मनी हर्ष जाहला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सदर कट्ट्याचे ठिकाणी मा. चतुर

प्रचेतस
Sun, 04/29/2012 - 12:51 नवीन
सदर कट्ट्याचे ठिकाणी मा. चतुर चाणक्य उर्फ चचा हे त्यांची कट्ट्यावरी ही अतिशय गाजलेली कविता सादर करणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानुसार समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

तुमच्या ठाणे कट्ट्याला

पियुशा
Sun, 04/29/2012 - 12:59 नवीन
तुमच्या ठाणे कट्ट्याला हार्दीक हार्दीक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Sun, 04/29/2012 - 14:48 नवीन
कट्ट्याला धमाल, मजा करा! कोरम मॉल मधील पॉपटेट्स, हा व्हेन्यु मस्त आहे. फक्त रविवार संध्याकाळ म्हणजे जागा मात्र आधीपासूनच पकडायला हव्यात,गर्दी बरीच असते. स्वाती
  • Log in or register to post comments

जागा पकडणारी त्रिसदस्यीय

गवि
Sun, 04/29/2012 - 15:14 नवीन
जागा पकडणारी त्रिसदस्यीय समिती आगाऊ पोचत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

मी आधी "आगाऊ समिती पोचत

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 04/29/2012 - 15:44 नवीन
मी आधी "आगाऊ समिती पोचत आहे." असे वाचले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

=)) =)) =)) =))

यकु
Sun, 04/29/2012 - 15:50 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) वृत्तांत लवकर येऊ द्या समिती सदस्यांनो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

:)

स्वाती दिनेश
Sun, 04/29/2012 - 16:31 नवीन
लवकर जागा पकडणार असाल तर मस्तच.. @ विमे, समिती आगाऊ पोहोचणे काय किवा आगाऊ समिती पोहोचणे काय, एकच की ;) (तसेही आगाऊ पोहोचणारी आगाऊ समिती जास्त महत्त्वाची ना,;) ) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अंड न घालता

बबलु
Sun, 04/29/2012 - 17:16 नवीन
मेहेंदळे साहेब, अंड न घालता हा कट्टा कसा करता येइल ? ;) ;) असो.... मजा करा. (अवांतरः-- मागे फोनवर म्हटल्याप्रमाणे गविंना माझा निरोप कळवा).
  • Log in or register to post comments

आयला, काय निरोप होता रे ? साफ

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 04/30/2012 - 00:25 नवीन
आयला, काय निरोप होता रे ? साफ विसरलो. :-( व्यनी कर. किंवा, विरोप, गबोल्या आहेच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

????

प्रभाकर पेठकर
Wed, 05/02/2012 - 12:39 नवीन
अंड (अंडं)न घालता हा कट्टा कसा करता येइल ? आयला, कट्याला आलं तर अंडी घालावी लागतात? बापरे! ही काहीतरी भलतीच अट दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

कट्याला हार्दिक शुभेच्छा.

निनाद मुक्काम …
Sun, 04/29/2012 - 18:03 नवीन
कट्याला हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मुंबई कट्टा

कुंदन
Tue, 05/01/2012 - 13:10 नवीन
कट्टा ठाण्याला अन म्हणे "मुंबई कट्टा" मुंबई मुलुंडलाच संपते मालक ;-) (मुंबईकर) -कुंदन
  • Log in or register to post comments

हद्दीवरून वाद घालणारी इतर

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/01/2012 - 13:38 नवीन
हद्दीवरून वाद घालणारी इतर अनेक शहरे आहेत. मुंबईकर त्या भानगडीत पडत नाहीत. उगाच झाली काय मुंबईची इतकी प्रगती ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

>>>उगाच झाली काय मुंबईची इतकी

प्यारे१
Wed, 05/02/2012 - 12:42 नवीन
>>>उगाच झाली काय मुंबईची इतकी प्रगती ?? खिक! :) ;) विमे फारच ब्वा विनोदी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नाही झाली म्हणता ?? ठीक आहे,

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/03/2012 - 11:48 नवीन
नाही झाली म्हणता ?? ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे.... या मुद्द्यावर वाद घालायला वेळ कुठे आहे ? प्रगती नाही का करायची आम्हाला ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

यावरुन एक ज्योक आठवला: मुंबईत

प्यारे१
गुरुवार, 05/03/2012 - 12:00 नवीन
:) यावरुन एक ज्योक आठवला: मुंबईत सायकलचं हॅन्डल पकडून एक माणूस जात असतो. खूप घाईत असल्यासारखा जवळजवळ पळत असतो. दुसरा म्हणतो अरे ए जरा ऐक तरी. पहिला म्हणतो नको घाई आहे. लवकर जायचंय. दुसरा : अरे मग सायकलवर ब सून जा. पहिला : अरे जास्तच घाई आहे. सायकलवर बसायलाही वेळ नाही..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मलाही एक जोक आठवला. एक मनुष्य

गवि
गुरुवार, 05/03/2012 - 12:09 नवीन
मलाही एक जोक आठवला. एक मनुष्य १२० वर्षांचा होतो. जगातला सध्या जिवंत असलेला सर्वात दीर्घायुषी मनुष्य म्हणून त्याची मुलाखत घ्यायला एक पत्रकार येतो. पत्रकार : तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? दीर्घायुषी मनुष्य : मी मन शांत ठेवतो. पत्रकार : कसं ? दीर्घायुषी मनुष्य : मी कोणाशीही कशावरुनही वाद घालत नाही. पत्रकार : (काहीसा वैतागून) तुम्ही काहीच्याकाही बोलताय. इतक्या मोठ्या आयुष्यात तुम्ही कोणाशी वाद न करता राहिलात हे शक्य आहे का? वाद घालणं हा मनुष्याचा मूळ गुणधर्म आहे. सर्वांशी एकमत होणं शक्यच नाही. तुम्ही दीर्घायुषी झाला आहात म्हणून काहीही कारण सांगण्याचा हक्क तुम्हाला मिळाला आहे, म्हणून तुम्ही वाट्टेल ते, तोंडाला येईल ते खोटं कारण ठोकून देता आहात. दीर्घायुषी मनुष्य : बरं. तुम्ही म्हणता तसंच असेल. .......................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा