टोमॅटोचं सार... माझं एकदम फेवरेट आहे. हे गरम गरम भाताबरोबर एकदम सह्ही लागतं. १ नंबर Smile आणि नुसतं खायलाही मस्तच लागतं. करायला पण एकदम सोपं.
साहित्यः ४-५ लाल टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या (मोठा लसूण असेल तर २ बास होतील) किसून किंवा पेस्ट करून, १ टीस्पून किसलेल आलं किंवा आलं पेस्ट (लसूण पेस्ट च्या निम्मी आलं पेस्ट घ्या), ३-४ टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, २-३ टेबलस्पून तेल, चवीनुसार तिखट, मीठ, साखर
कृती:
१. प्रथम टोमॅटो कुकरला लावून शिजवून घ्या. मग टोमॅटोची सालं काढून शिजलेले टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.
२. एका कढईत/पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या. मग त्यात आलं-लसूण किस/पेस्ट टाकून परतून घ्या. मग त्यात टोमॅटो प्युरी घाला. परतून घ्या
३. मग त्यात सारं जितकं दाट-पातळ हवं आहे तितकं पाणी घाला. मी ४-५ कप पाणी घातले आहे. चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घाला. आता त्यात खोबरं-कोथिंबीर घालून उकळी आणा.
४. आणि असं मस्त गरम गरम सार वाफाळत्या भाताबरोबर फस्त करा.
वाचने
8705
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! मस्तच.....
वा!! सगळ्यांचे आवडते.
मस्तच्,माझे आवडते.
वाह! मस्त पाकृ
मस्त.
In reply to वाह! मस्त पाकृ by सानिकास्वप्निल
हो.. साजूक तुपाची फोडणी जास्त
In reply to मस्त. by गणपा
अगदी
In reply to हो.. साजूक तुपाची फोडणी जास्त by गवि
+ ४
In reply to अगदी by परिकथेतील राजकुमार
दातालाच लागेल!
In reply to + ४ by मेघवेडा
छान
झकास.
टोमॅटो सार मी टोमॅटो उकडवून
नावात बदल....
In reply to टोमॅटो सार मी टोमॅटो उकडवून by पिंगू
गवि, तुलापण मी बनवलेलं टोमॅटो
In reply to नावात बदल.... by गवि
प्रकटाआ
In reply to नावात बदल.... by गवि
सुंदर......टेस्टी
काल रातीने बनाडी देखी हतु
मस्त
आंब्याचा सीझन चालू आहे.
अरे वा बरी आठवण केलीत,
[पु ना ओक मोड ऑन] "जीवन असार
(No subject)
सर्वांचे आभार :-)
मस्तच......