कॅट'स इन द क्रेडल...
हॅरी चॅप्लिनच्या "कॅट'स इन द क्रेडल" या मूळ इंग्लिश गाण्यावर मनसोक्त स्वातंत्र्य घेऊन मी केलेला गद्यरुप अन्याय :
.................................................................................................................
एके दिवशी अचानकच माझं पोर जगात आलं..नेहमीसारखंच अन न चुकता याच जगात आलं..
इकडे माझ्या चार्टवर आखलेल्या बिझनेस फ्लाईट्स अन एअरमाईल्स..
तिकडे ते एकटं एकटं चालायलाही लागलं..
माझ्याच नकळत बोलायलाही लागलं..
वाढता बोलता पोरगं म्हणायचं .."मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."
..
उबदार घरात बाळाची गादी..
त्याला आणला होता चांदीचा चमचा अन चांदीचीच वाटी..
बाळाच्या डोळ्यात पेटलेले हिरे.. अन वाट पाहणारे अश्रू...
अश्रू टिपणारे अभ्र्याचे धागे..
बाबा कुठे गेला? पळणार्या चंद्रामागे..??
"...बाबा तू परत कधी येणार?"
जाताजाता प्रत्येक वेळी याची एकच भुणभुण सुरु...
आणि माझं उत्तर..
"माहीत नाही रे बेटा..पण भेटलो की नक्की मज्जा करु.."
...पण भेटलो की नक्की मज्जा करु..
पोरगं पाचचं झालं..ऑर्डर केलेल्या सायकलची होम डिलिव्हरी झाली..
"बाबा तू कित्ती छान..बेस्ट बाबा इन द वर्ल्ड.."चं प्रमोशन..
अन मग..
"कधी शिकवशील मला सायकल? माझ्यामागे पळशील ना? सोडणार नाहीस ना?"
..अशी पुढची केआरए लिस्ट आली..
"खूप खूप काम आहे बेटा.. आज नाही.. उद्या..ओक्के?"
"ओक्के.." हसत हसत पळताना त्याच्या डोळ्यात तेच हिरे चमकत होते..
म्हणत होते.." मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."
बाबाने कष्टाने इतकं जमवलं की पोरगं मेडिसिन म्हणता मेडिसिनला गेलं..
बाबाने दिलेला अजून एक चांदीचा चमचा, तोंडात न दिसणारा..
पोरगं देखणं उंचनिंच झालं अन एकदा चक्क घरात दिसलं..
तेव्हा जरा जवळ बस म्हटलं..
"यू आर अ हँडसम बॉय माय चाईल्ड...कोणी पोरगी आहे काय मागे तुझ्या..?"
कसनुसं मला तोडत तो म्हणाला.."बाबा जरा लवकर गाडीची चावी द्या.."
दिली तेव्हा म्हणाला.."थँक्स बाबा. भेटू उद्या.."
बोटाभोवती चावी फिरवत बेफिकिर झुलपं उडवत तो जाताजाता एकदाच वळला..
तितक्यातही झटकन ते डोळ्यातले हिरे म्हणाले.." मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."
कापरासारखा काळ उडाला अन कापसासारखा मी शुभ्र म्हातारा झालो.
आता पोरगं फोनवरच..म्हणून म्हटलं फोनच करु....
"ये रे बेटा एकदा.. भेटून.. बसून..एकेक पेग भरु.."
"यायचंय हो बाबा.. पण काय करु..
ओपीडीचा क्यू अन त्यात बाळाला फ्लू..
..फोनवर बोलूच.. अन भेटलो की नक्की मज्जा करु.."
..."अन भेटलो की नक्की मज्जा करु..."
फोन खाली ठेवला अन माझाच मला आवाज आला..
पोरगा अगदी बाबासारखा झाला..
पोरगा अगदी बाबासारखा झाला..
.....
याद्या
8420
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
:(
... !!!!
तुफान गवि, केवळ तुफान....हे
या दुव्यासाठी तुला दुवा रे
In reply to तुफान गवि, केवळ तुफान....हे by प्रास
बस काय गवि,
In reply to या दुव्यासाठी तुला दुवा रे by गवि
नाही.. तुझा दिलेला व्हिडीओ
In reply to बस काय गवि, by प्रास
गवि,
In reply to नाही.. तुझा दिलेला व्हिडीओ by गवि
!
मस्तच...! हर्ट टचिंग वैगेरे!
प्रकाटाआ
मस्त...
अहो गवि
छान जमली आहे.
!!!!!
आजच दोन वर्षाचा भाचा पाहिला.
"तुझ्या कमाईत घर चालतय ना? मग
In reply to आजच दोन वर्षाचा भाचा पाहिला. by स्पंदना
दंडवत...
In reply to आजच दोन वर्षाचा भाचा पाहिला. by स्पंदना
"तुझ्या कमाईत घर चालतय ना? मग
In reply to आजच दोन वर्षाचा भाचा पाहिला. by स्पंदना
गवे, मराठी गाणंही छान जमलय.
टचिंग!
आवडला....
अगदी असेच
In reply to आवडला.... by प्रभाकर पेठकर
छान भावानुवाद!
+१
In reply to छान भावानुवाद! by पैसा
+१
In reply to +१ by शिल्पा ब
अपरिहार्यता - आवश्यकता.
In reply to छान भावानुवाद! by पैसा
काका, अगदी पटते हे सगळे. यावर
In reply to अपरिहार्यता - आवश्यकता. by प्रभाकर पेठकर
अनुवाद आवडला...
भावुक
छान भावानुवाद..
छान . अगदी छान . हेच सायकल
खूप छान जमलयं
सुंदर
अशाच उत्तमोत्तम अभिव्यक्तींकरता हार्दिक शुभेच्छा!
हा धागा कसा काय नजरेतून सुटला