Skip to main content

कणकेचे लाडू

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 01/05/2012 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१) एक वाटी कणीक. २)एक वाटी गुळ. ३)अर्धी वाटी तूप. ४)पाव वाटी किसलेले सुके खोबरे. ५)एक चमचा खसखस. ५)पाव चमचा वेलचीपूड. कृती :-प्रथम कणीक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे व हातानेच त्याचा चुरा करावा.खसखस थोड्या तुपात भाजून घ्यावी.एका भांड्यात जूळ घेऊन त्यावर पाणी शिंपडून त्याचा दोन तारी पाक करावा.त्यात खोबरे,खसखस,वेलचीपूड व कणीक घालावी.सर्व मिश्रण नीट एकत्र करावे व लाडू वळावे. हवे असल्यास लाडवात सुका मेवा घालावा.(मिश्रण कोरडे पडत आहे असे वाटल्यास त्यावर थोडे दुध शिंपडून लाडू वळावे.) सौजन्यः-दैनिक तरूण भारत.

वाचने 5625
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एक पारंपारिक पाक्-क्रुती दिल्याबद्दल धन्यवाद...

सुंदर. माझा अत्यंत आवडता लाडू :) अमोल

आधी फोटो नव्हता बहुतेक! आता छान दिसतायत. पण कृती तरूण भारतमधून घेतलीय का?

आम्ही ह्यात तुपात तळून घेतलेले जाड पोहे पण घालतो :)

आमची आई करायची नेहमी, पण तुपात कणीक भाजून घेतली की थोडे कोमट असतानाच त्यात गुळ घालायची व एकत्र मळून लाडू वळायची...छानच लागतात.

एका भांड्यात जूळ घेऊन साहित्य न वाचल्याने "जूळ" चा अर्थच लागेना. :) म्हटलं हे काय नवीन. मग साहित्य वाचल्यावर कळालं जूळ म्हणजे गूळ :) :)