Skip to main content

ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.

ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.

Published on 29/04/2012 - 18:40 प्रकाशित
पॉप टेटस ठाणे.. कट्टा सुरु झालेला आहे.. प्रास, विमें,चतुरचाणक्य,जयपाल, वरुण मोहिते,कस्तुरी,गवि,मन्या फेणे,सुहास झेले हे नग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. ठाण्याची स्कायलाईन सुंदर दिसते आहे. पॉप टेट्सचे हॅपी अवर्स चालू आहेत.. कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से.. देखते रहिये आप तक..

याद्या 23430
प्रतिक्रिया 120

ही आयडिया मस्तच आहे! पुढचे अपडेट्स देत रहा! आम्ही जळत राहूच!

In reply to by पैसा

इथे अमेरीकेत आम्ही महत्प्रयासाने नंदनला पुस्तकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर पाणी फिरवले म्हणून ठाणेकरांचा निषेध! भारतात आधीच वीज, अन्न आणि बँडविड्थची टंचाई असताना असले लाईव्ह प्रक्षेपण करणार्‍या गविंचासुद्धा निषेध! विधायक गोष्टीं करता एकत्र यायचे सोडून असल्या चैनीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवणार्‍या समस्त कट्टेकर्‍यांचा निषेध! असल्या चुकीच्या प्रथांना आळा घालायचा सोडून प्रोत्साहन दिल्याबद्दल पैसाकाकू संपादक यांचाही निषेध!

कृपया कोणीतरी जयप्याला चार कचकचीत शिव्या माझ्यातर्फे घाला. कारण सांगायची गरज नाही, तो समजून जाईल.

क्रिस्पी चीज बॉल्स.. आफ्रिकानो फिश आणि अन्य चमचमीत स्नॅक्सनी आनंदसोहळ्याची सुरुवात.. पंधरा मिपाकर आत्तापर्यंत जमा. क्लिंटन आला..

In reply to by गवि

किती तरी दिवसांनी राजा कोळी चे दर्शन जाहले. लाइव प्रक्षेपण भन्नाट कल्पना ( गवीचे डोके भारी सुपीक ) माझी भूक ( पोटाची ) आणी वासना ( जिव्हेची ) चाळवल्या गेली आहे. इनो सुद्धा घरी नाही आहे असह्य जळजळ देही वणवा पिसाटला. चमचमीत जेवण व त्याहून चमचमीत गप्पा ह्याला नशीब लागते. " जो नही दिल को मिल सकता दिल को उसीकी चाहत हे मुझ को दिल से येही शिकायत हे

In reply to by गवि

क्रिस्पी चीज बॉल्स अन् आफ्रिकानो फिश का काय अते बघून प्रचंड जळाजळ झालीये. पणा लाईव्ह टेलिकास्ट न बघता डायरेक्ट रेकॉर्डिंग पाहिल्याने दर १० मिनिटानी जळजळ होण्यापेक्षा जी व्हायची ती एकदाच झाली हेच काय ते समाधान! @मुंबई आणि पुणे: आम्ही कधी येवू तेव्हाही असेच कट्टे करायचे लक्षात ठेवा बरं का ;)

मोहितो.. विमें.. रामदासकाकांनी प्रत्येकाला एकेक खास पुस्तक भेट दिलंय.. अगदी प्रत्येकाची आवडनिवड ओळखून... नंदनला सगळ्यांनी आपल्या स्वाक्षर्‍या करुन ग्रंथ सप्रेम भेट दिला..

विजुभाऊ, रामदासकाका आणि जयपाल यांचं काहीतरी जबरदस्त गुफ्तगू चालू आहे. बाकी सर्वांच्या चर्चेला आणि गप्पांना जबरदस्त रंग चढला आहे.. हॅपी अवर्स संपल्याची घंटा वाजली आहे. त्याच्या एकच मिनिट आधी सफाईने रिपीट ऑर्डर देऊन अधिकाधिक पिचर्स मिळवल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर आहे.. पॉप टेट्सचे थाई टॉस्ड फिश अफलातून आहेत..

वाचतोय आणि पाहतोय. :) अपडेट्सबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे

पुढच्या भारतभेटीत पॉप टेट्सला बैठक नक्की. विजुभाऊ, सर्वसाक्षी लक्षात ठेवा. खबरदार नाही म्हणाल तर. कोर्टात खेचेन. पुराव्यादाखल, माझ्याजवळ (रंगीत) छायाचित्रे आहेत. जज्जाच्या टेबलावरच फेकीन सगळी.

या पॉप टेट्सच्या वेटर्सचा दणादणा रिकाम्या ग्लासात बियर ओतण्याच्या सपाटा पाहून मला पुण्याच्या बादशाही बोर्डिंगमधल्या झपाट्याने आमटी आणि ताकाच्या वाट्या भरणार्‍या वाढप्यांची आठवण होते आहे.. जरा वाटीकडे दुर्लक्ष झालं की भरलीच परत. हे सर्वजण एक्स बादशाही बोर्डिंग एंप्लॉयी तर नाहीत?

लाईव्ह अपडेटची कल्पना भारी आवडली :) सगळ्यांची मस्त धमाल सुरु आहे तर छान छान :)

भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा हजर झालेला आहे आणि रामदासकाका आणि विजुभाऊ साईड बदलून अस्मादिकांजवळ येऊन बसले आहेत. सोबत आपापले कमंडलू तीर्थ वगैरे घेऊन गप्पांना तुफान रंग आला आहे.. जोडीला फॅब फाईव्ह, पॉप टेट्स स्पेशल पिझ्झा.. अधिकृत टेस्टर म्हणून मी दोन्ही आयटेम चाखले आहेत आणि दोन्ही खरोखर अफलातून आहेत.. या फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे.. सर्वसाक्षी आणि क्लिंटन एका खास मोमेंटमधे..

In reply to by गवि

पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती ;)
फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे..
ही: ही: ही: गुरु प्रास यांना समव्यसनी अड्ड्यात सामील करुन घेण्यासाठी आग्रह जरा कमी पडतोय का गवि ;-) की त्यांनी 'प्रासप्रतिज्ञा' केलीय :p

In reply to by यकु

पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती .
अहो यकु.. ती गझल म्हणतानच्या तानेची पोझ नाहीये.. पिझ्झ्याचा तुकडा तोंडात घालण्याची पोझ आहे.. नीट पहा.. चर्मचक्षूंनी नव्हे.... उघडा तुमचा अंतश्चक्षू.. ;)

In reply to by गवि

अरेरेरे! क्लिंटन असा अंग चोरुन का बसला आहे? त्याला सांगा रे कुणीतरी की, तो घरी नाहीये ;) सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा ना रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.

In reply to by अन्या दातार

सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा ना
http://misalpav.com/node/21529#comment-392782 यातील शेवटच्या फोटोत उजवीकडचा नंदन !!!
रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.
दिवे मंद लावले तर बिल कमी लावणार असे म्हणाले ते, म्हणून आम्ही आमच्या टेबलावरचे दिवे बंद केले. ;-)

मिपा रिपोर्टर्स... असाच एक खास क्षण.. रामदासकाका आणि विजुभाऊंनी मैफिलीत खरोखर रंगत भरली आहे. प्रभूमास्तर येऊ घातले आहेत... लॅपटॉपची विजेरी संपल्याने आता बाकी वृत्तांन्त यथावकाश...

In reply to by गणपा

@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^ हे वरचे सगळे माझे मलाच. सगळ्या दिग्गजांना भेटण्याचा चान्स हुकल्याची हळहळ होते आहे जळजळ न होता :( असो, और भी है मंजिल-ए-जिन्दगी... गवि, धन्यवाद! - (हळहळ होत असलेला) सोकाजी

किसनदेव आणि प्रभूमास्तर यांची काहीशी उशिरा एंट्री झाली असली तरी मैफ़िल नव्याने चालू झाली आहे.. प्रभूंनी गप्पांना नवीन खाद्य दिलंय आणि जणू पुन्हा पहिल्यापासून गप्पाष्टक रंगायला लागलंय. हा माहोल बघून रात्रभरही चालत राहू शकेल ही सुंदर बैठक असं वाटतंय.. एक विलक्षण योग आहे हा. मिपाव्यसन सार्थकी लागण्याच्या क्षणांपैकी एक..

जळजळ , जळजळ. त्रास आहे च्यामारी नुस्ता. हा धागा आता अजिबात उघडायला नको ! - छोटा डॉन

आर्‍अ‍ॅअरेअरेअ‍ॅअरेअरर्‍अ‍ॅअरेअ अरे चालु ठेवा रात्रभर मी त्र आत्ताच बघतेय :( सगळ्याना माझ्यातर्फे हेल्लो:)) चालु ठेवा मी आहेच ंमध्ये मध्ये गप्पा मारिन :)

भारी कट्टा आणि त्याहून भारी थेट प्रक्षेपण.. मजा करा, राव. आमची जळतेय.

!!!!!!! गविनि चुकून सिरीअसली घेतले तर? अजिबात न वाळलेला हिरवा शर्ट मंजे गवि!!!! कळले का?

स्पा , मेल्या गवि कडुन शिक काहितरी. साला ठाकुर्लीचे नाव बदनाम केलेस तु. विजुभौ चा विग परत पडला वाट्ट , लोकलच्या गर्दीत.

लाईव्ह वृत्तांत!!! कट्टाकथनाची नवी सुरवात!!

कट्याला सुरु होऊन बारा तास झाले आहेत. समारोप झाला की अजून कार्यक्रम चालू आहे. ? मंडळी तिथेच कलंडली की काय ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे. अन्य उपस्थित कट्टेक-यांकडून उर्वरित वृत्त आणि छायाचित्रांच्या प्रतीक्षेत..

In reply to by गवि

पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे. स्सही.........!!! -दिलीप बिरुटे

आयडीया.....सर्व कट्टाकर्‍यांनी भर्पूर एंजॉय केलेलं दिसतय... स्वगत : मिपावर Live Streaming ची सोय असती तर...................... अमृत

अ आ नी आमचा कट्टा काव्यातून मिपावर आणला .आपण तो लाईव्ह फोटो ट्रान्स्मिशन मधून आणला. वेगळेपण शोधणे हे कलावंताचे ब्रिद आपण उत्तम रित्या पार पाडले आहे. मी खवय्या नसल्याने पिझा पाहून जळलो वैगैरे काही नाही. वेळ, पैसा शक्ती व कल्पकता खर्च करण्याला सलाम ! सलाम! सलाम! बादवे, हिरव्या शर्टातील बाळ्सेदार गवि आहेत काय ? असले तर ते एम आर आय च्या मशीनमधे कसे जावू शकले ? ही आपली एक पुणेरी शंका ! पेठकर काकांचा दुबई कट्टा लाईव्ह चलचित्र असेल अशी आशा आहे ! आपला चौ रा

अरे बाप रे !!!!!!! हे लाइव्ह कट्टा दाखवुन जळ्वन्याची आइडीया कुणाच्या सुपिक डो़क्यातुन आली म्हणायची ? ;) असो... कट्टा एकदम "तब्बेतीत " झालेला दिसतोय :)

सगळ्यात अफलातुन होती ती लाइव्ह शो चि कल्पना .त्याहुनहि दिसुन आलि ती एकमेकाना भेटन्याची ओढ आणि सर्वात अप्रतिम वाटले ते एकमेकान्च्या सोबतित असताना सगळ्यान्चे खुललेले चेहेरे . आपलि नसतानाहि फक्त आपलिच वाटनारि माणसं ,केवळ लिखानातुन आपूलकि जानव्ते आणि त्यातुन भेटन्याची ओढ निर्मान होते ,मग भेटुन चार क्षण आनंद आणि भेटन्यासाठी आतुरलेलि नजर ह्यांच दर्शनहि आपोआप व्हायला लागतं. मी ओळखत नाहि चेहेर्‍याने बर्‍याच जनाना .पण आज एकेकाचे फोटो बघुन वाटत होतं .यानी हे लिहिलय ..त्याण्ची ते वालि पोस्ट मी वाचलिय .मग ओळखिचेच कि ..अनोळखि कसे? विजुभाऊंशी मी एकदाच फोन वर बोललिय ..खुपस सहज साध सिम्पल व्यक्तिमत्व वाटल आवाजावरुन .आज त्याना पाहिल . विजुभाऊ छान वाटल होत तुमच्याशि बोलुन आणि आज तितकच छान वाटल तुमचि हसरि मुद्रा पाहुन . असेच नेहेमि हसत रहा .:) चतुर चानक्य ह्याच्याशि सुद्धा हल्लीचिच मैत्रि .मस्त सदाबहार आहे .:) विमे ( विशु ) मस्त बोलघेवडा . ;) प्रास ,ऑर्कुटवरची ओळख ,अतिशय शांत आणि सिरिअस माणुस .:D गवि ...इनके तो क्या केहेने ....मला ह्यांच लेखन आवडतं .पोटतिडकिने विषय मांडन्याची जी कला आहे ,तिच भावते . बाकि सगळयाना नमस्कार __/\__, पण भारतात आल्यानंतर मिपाचा एकतरि कट्टा अट्टेंड करण्याची इच्छा आहे . अनोखं स्नेहसम्मेलन अगदि आपणहि तिथे असायला हवे होतो अस वाटुन जान्याइतक अफ्लातुन . :)

In reply to by जेनी...

इच्चा चांगली आहे. पण तुमच्या आगमनाची वर्दी मिळाली आणि प्रत्यक्ष दर्शन झाले तरच शक्य आहे.

In reply to by चिंतामणी

शक्यता चांगली आहे काका ...पण अश्या कमेंट पडल्या कि मग इच्छा मरुन गेलि तर त्याला जवाबदार कोन??\(

लॅपटॉपची बॅटरी संपणे या विघ्नामुळे अधिकाधिक काळ अपडेट्स देत राहता आले नाहीत.. वास्तविक "लाईव्ह"चा मुख्य उद्देश की कट्ट्याला हजर न राहू शकलेल्या पण जगभरातून लॉगिन झालेल्या मित्रांना थेट कट्टेकर्‍यांशी दुतर्फी संवाद करता यावा. पण हा उद्देश नीटसा साध्य झाला नाही. धाग्यावर आलेल्या सर्व प्रतिक्रियांचं कट्ट्यावर उच्चारवाने जाहीर वाचन होत होतं आणि निम्म्या ठाण्याला ते कळले असतील अशी खात्री आहे.. पण कट्टेकर्‍यांची प्रत्युत्तरं मात्र उलटटपाली टंकायला झालं नाही.. असो.. आता इतर हजर कट्टेकर्‍यांवर हा वृत्तांत अधिक चांगला आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.. अरे लोक्स.. ते बाकीचे फोटो कुठायत?? अजून एक फोटो.. पराषेटनी रात्री कामातून सवड मिळताच आवर्जून दूरध्वनीद्वारे कट्ट्याला शुभेच्छा दिल्या आणि खास वृत्तांत घेतला.. त्यामुळे कट्ट्याला अजून एक वेगळेपण प्राप्त झाले..

In reply to by संजय क्षीरसागर

अहो संक्षी.. त्याचवेळी काढलेला फोटो आहे तो.. आणि तोच अपलोडवायचा होता, पण टेबलवर बसून वेगवेगळी कार्डे कॅमेर्‍यातून काँप्युटरात आणि मिळतील ते फोटो काँप्युटरातून पिकासावर टाकण्यात आणि नंतर लिंक करण्यात वगैरे त्यातील अनंत अडचणींमधे जे फोटो आधी अपलोड होऊ शकले ते पब्लिश केले. नंतर अधिक चांगला मिळाला म्हणून इथे दिला. तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील. १. तीन सुहृदांचे गळ्यात मैत्रीपूर्ण हात २. सर्वसाक्षींचे हास्य .. .. इ.इ. इच्छुकांनी शोधावेत.. ;)

In reply to by गवि

तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील. माताय असल्या प्रत्येक चित्रात नेहमी सहाच फरक कसे असतात हो?

अतिशय मस्त आयडिया कट्टा वृतांत द्यायची. आमच्या ठाण्याची तर नेहमी आठवण येत असते पण आज जरा जास्तच आली. ठाण्यात असतो तर नक्की हजेरी लावली असती. बाकी क्लिंटनला पहिल्यांदाच पाहीले : ) --टुकुल

In reply to by मी कस्तुरी

फोटो दिसत नाही.. बहुधा अपलोड झाला नसावा.. फोटोचा पाथ लोकल काँप्युटरसारखा वाटतोय.. पिकासा-गूगल किंवा फ्लिकरमधे अपलोडवून इथे लिंकवता येईल.

In reply to by मी कस्तुरी

वा वा.. धन्यवाद... बर्‍याच मोठ्या संख्येने मिपाकर आल्याने काहीजणांना वरती माळ्यावर चढून फोटोसाठी उभं राहावं लागलं.. ;) अर्थात हा फोटो शेवटी काढलेला असल्याने बरेच गळती ऑलरेडी झालेली होती.. पण मोठा फोटू आला असता तर अधिक नीट पाहता आला असता..