Skip to main content

राजेश खन्ना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजेश खन्ना यांना प्रकृती खराब झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्‍यासोबत पत्‍नी डिंपल कपाडीया रुग्‍णालयता असून तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्यपणा आणि थकवा जाणवत होता. अखेर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि बातमी आमच्या पिढीला अस्वस्थ करणारी आहे. सुपर स्टार असा किताब मिळवणार हा एकमेव नट. .. आखरी खत नाव्याच्या साधारण सिनेमात त्याला पाहिले अन प्रेमात पडावा असाच नट होता. नंतर बहारोके सपाने..मग आराधना..राजेश खन्ना तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता. स्वतःच्या रक्ताने त्याचे चित्र मुलींनी काढले असा एका मेव अभिनेता.. डिंपल कपाडीया बरोबर लग्ना नंतर मात्र गृह कलहाच्या बातम्या येऊ लागल्या .. सुदंर अभिनय ..देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेला हा अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर होता. आनंद .बावार्जी..नमक हराम..एक से बढकर एक सिनेमे काका चे. पुढे अमिताभ युग सुरु झाले अन काका मागे पडला... राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो व त्यांना दीर्घायुष्य लाभो हि त्या दया घना कडे प्रार्थना

वाचने 6278
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मधला राजेश सर्वाना आवडेल असाच होता. वयाबरोबर भूमिका बदलायला त्याला जरा वेळ लागला, पण नंतर अवतार मधे तो आवडलाच. त्याला लवकर बरं वाटू दे ही शुभेच्छा!

राजेश खन्ना ह्यांना प्रकृती स्वास्थ लाभले असून ते त्यांच्या घरी पोहोचले आहेत. असे वृत्त, त्यांच्या मॅनेजरने प्रसिद्धीस दिले आहे. काळजी नसावी.

राजेश उर्फ जतीन खन्ना यांचे एकोणीसशे पन्नास साला दरम्यान जन्मलेल्या पिढीवर उपकारच आहेत. आबालवृद्धाना आवडणार्‍या या अभिनेत्याने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या मग रेड रोज असो किंवा आनंद ! जन्तीन राव बरे होउन घरी गेले ही एक खास समाधानाची बातमी आहेच . जुग जुग जियो काका !

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>कोण राजेश खन्ना ? ६५-७५ दरम्यानच्या तरुणींचा "परिकथेतील राजकुमार". >>धन्यवाद. वेलकम.

In reply to by नितिन थत्ते

चला म्हणजे उद्या आम्ही गचकायच्या आधी आमच्या नावाने पण एक लेख पडण्याचे चान्सेस आहेत म्हणायचे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्वयंघोषीत "परा"वर लेख येईल का ते सांगता येत नाही. तुम्ही आधी आडमिट तर व्हा...

राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्यपणा आणि थकवा जाणवत होता.
काकाच्या हिरोगिरी संपण्यानंतरच्या बर्‍याच भूमिकांमध्ये उपरोल्लेखित अधोरेखितपणा फारच जाणवला होता. ;-) काकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली ही चांगली बातमी आहे. काके, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

पण आप्ल्या आनन्द ला भेटायला त्याचे बाबूमोशाय आल्याचे काही ऐकले नाही.. :(

.

-

मानवी कार्पेट वेलकम मिळालेला हा पहिला अभिनेता आहे. कोणत्यातरी कॉलेजच्या कार्यक्रमात गेला असताना तिथल्या विद्यार्थी/विद्यार्थीनीं नी त्याच्या गाडीपासून ते स्टेजपर्यन्त झोपून त्याला आपल्या अंगावरून चालत जायला लावले होते.(प्रेमापोटी).

राजेश खन्ना यांना बरे वाटू देत. तसा बघायला गेल तर काका म्हणजे एक अति उदो-उदो झालेला कलाकार वाटतो. त्या काळी लोकांना फ़ारसा काही ओप्शन नसल्यामुळे वर आलेल्या काहि कलाकारांपेकि एक.

In reply to by बोलघेवडा

राजेश खन्ना यांना बरे वाटू देत. तसा बघायला गेल तर काका म्हणजे एक अति उदो-उदो झालेला कलाकार वाटतो. खरे आहे. काकांच्या मध्यम अभिनय क्षमतेच्या करीअर मधून आर.डी./किशोर काढलात तर काय उरेल ? बॉलिवूडची दुनिया ही उदो उदो करणार्‍या/करुन घेणार्‍यांचीच आहे.

In reply to by चिरोटा

ऑ? >>काकांच्या मध्यम अभिनय क्षमतेच्या करीअर मधून आर.डी./किशोर काढलात तर काय उरेल ? म्हणजे अमिताभ बच्चन वजा सलीम जावेद असं का? असो. अधिक अभ्यास करावा लागेल.

In reply to by चिरोटा

काकाचे काहि चित्रपट खरच खुप छान होते.. माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे बावर्ची... आनंद देखील खुप छान. पण बाकी आपण काहि काकाजींचे फॅन नाहि बुआ. अर्थात, जर सलमान-शहारुख एव्हढी प्रचंड लोकप्रियता मिळवु शकतात तर काकाजींनी काय घोडं मारलय. अर्धवटराव