✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खरच मी लढणार...

न — निश, गुरुवार, 04/26/2012 - 16:09
खरच मी लढणार माणसातल्या राक्षसाला माणुसकी शिकवणार . खरच मी लढणार.. सत्तेतल्या गुंडाबरोबर. आया बहीणींवर अत्याचार करणार्‍या जनावरांबरोबर. जनतेचे सेवक असताना त्यांचेच भक्षक होऊन रक्तपिपासु गिधाड झालेल्या नोकरशहांबरोबर. रुग्ण बरा होण्या ऐवजी त्याच्या कडुन पैसे लुटणार्‍या डॉक्टररुपी दरवडेखोरांबरोबर. भर रस्त्यात एका निरपराध मुलीवर वासनांध प्रेमापोटी चाकुचे वार करणार्‍या नराधमाबरोबर आणि त्या मुलीच्या वाचवा वाचवा अश्या किंकाळ्या ऐकुनही मदतीस न जाणार्‍या षंढ समाजाबरोबर . संपाच्या नावावर जनतेस वेठीस धरणार्‍या कामगार संघटनेंच्या नेत्यांबरोबर. प्रवाश्यांच्या आगतिकतेचा फायदा उचलुन भरमसाठ भाडे आकारणार्‍या रिक्षा वाल्यांबरोबर स्वताच्या भारत मातेच रक्षण करण्या ऐवजी लाचरुपी हत्याराने तिला पोखरणार्‍या हुकुमशहांबरोबर खरच मी लढ लढ लढणार लढताना मरण तर राहुद्याच पण जिंकुनच येणार. माणसातल्या राक्षसाला नक्कीच माणुसकी शिकवणार त्याला माणसातला देव बनवणार त्याला माणसातला देव बनवणार .

प्रतिक्रिया द्या
1815 वाचन

💬 प्रतिसाद (8)

सुंदर कविता निश.. तुमच्या

स्पा
गुरुवार, 04/26/2012 - 16:15 नवीन
सुंदर कविता निश.. तुमच्या कविता खरच वाचनीय असतात
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
गुरुवार, 04/26/2012 - 16:21 नवीन
असेच म्हणतो. ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणार्‍या तुमच्या कविता खरेच स्पृहणीय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान विचार-मंथन..

मुक्त विहारि
गुरुवार, 04/26/2012 - 16:22 नवीन
सगळी कविताच उत्तम, पण सगळ्यात जास्त मनाला भिडले ते... "रुग्ण बरा होण्या ऐवजी त्याच्या कडुन पैसे लुटणार्‍या डॉक्टररुपी दरवडेखोरांबरोबर" कारण आजच बातमी वाचली की, पैसे नाहित म्हणून, एका गर्भवती अपघातग्रस्त बाईवर उपचार केले नाहित... (मूळ लिंक ....http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12878778.cms)
  • Log in or register to post comments

खरच मनापासुन आभार

निश
गुरुवार, 04/26/2012 - 17:54 नवीन
मन्या फेणे साहेब, वल्ली साहेब, मुक्त विहारि साहेब तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.
  • Log in or register to post comments

निशा, सुटलाहेस

चौकटराजा
गुरुवार, 04/26/2012 - 18:27 नवीन
निशा ,कवितेत खिन्न करीत भन्नाट सुटलाहेस वादळासारखा. भौ, दुदैव असे माणूस दिवसेंदिवस सुधारत चालला आहे का बिघडत ? रक्तरंजित लढाया संपल्या अन प्रॉक्सी वॉर चालू झाली. दु: शासन पुन्हा पुन्हा जन्म घेताहेत वेगवेगळी रूपे घेऊन !
  • Log in or register to post comments

चौकटराजा साहेब, तुमचा प्रतिसाद अप्रतिम आहे.

निश
गुरुवार, 04/26/2012 - 18:39 नवीन
चौकटराजा साहेब, तुमचा प्रतिसाद अप्रतिम आहे. दु: शासन पुन्हा पुन्हा जन्म घेताहेत वेगवेगळी रूपे घेऊन हे तुमच वाक्य जबरदस्त. मेंदुतिल विचार प्रक्रियेवर दणदणित आघात करणार आहे. मला जे कवितेत सांगायच होत ते तुम्ही ह्या एका वाक्यात सांगितले आहात. माका तुमका नमस्कार करुचो आसा. माझो नमस्कार तुम्ही वाइ़ज गोड मानुन घ्यावा, चौकटराजा साहेबानु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

छान.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/26/2012 - 19:08 नवीन
छान कविता, आणि तुमच्या लढाईसाठी शुभकामना.
  • Log in or register to post comments

निशब्द .....

अमितसांगली
Sat, 04/28/2012 - 09:12 नवीन
माणसातल्या राक्षसाला नक्कीच माणुसकी शिकवणार त्याला माणसातला देव बनवणार........निशब्द
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा