.
विद्यमान राष्ट्रपतीमहोदयांचा कालावधी तीन महिनेच राहिला आहे. नंतरचे तीन महिने नव्या राष्ट्रपतींच्या " निरनिराळ्या सत्कार समारंभात आणि परदेश दौरा करण्यात " जाणार !
आमचा जीव इथे टांगणीला लागून राहिला आहे, याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही ? खरोखरच "भारतीय जनते"चा कळवळा येत असेल, तर एखाद्या राजकीय पक्षातल्या एखाद्या आमदार- नामदार- खासदाराने त्या क्रूरकर्मा कसाबची फाईल, सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन, लगेच राष्ट्रपतीमहोदयांपुढे "अत्यंत तातडीचे" असे संबंधितांचा शेरा मारून योग्य मार्गाला लावावी, ही "हात जोडून" विनंती !
"आमच्या" जिवंतपणी "याची देही याची डोळा" त्या कसाबला फाशी दिलेली आनंदाने पहायला मिळावी, ही सर्व भारतीय जनतेची "शेवटची इच्छा "!!!
.
वाचने
1778
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
खडकीच्या......
ह्या ह्या
मागणी