Skip to main content

विच्छा आमची ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/04/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. विद्यमान राष्ट्रपतीमहोदयांचा कालावधी तीन महिनेच राहिला आहे. नंतरचे तीन महिने नव्या राष्ट्रपतींच्या " निरनिराळ्या सत्कार समारंभात आणि परदेश दौरा करण्यात " जाणार ! आमचा जीव इथे टांगणीला लागून राहिला आहे, याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही ? खरोखरच "भारतीय जनते"चा कळवळा येत असेल, तर एखाद्या राजकीय पक्षातल्या एखाद्या आमदार- नामदार- खासदाराने त्या क्रूरकर्मा कसाबची फाईल, सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन, लगेच राष्ट्रपतीमहोदयांपुढे "अत्यंत तातडीचे" असे संबंधितांचा शेरा मारून योग्य मार्गाला लावावी, ही "हात जोडून" विनंती ! "आमच्या" जिवंतपणी "याची देही याची डोळा" त्या कसाबला फाशी दिलेली आनंदाने पहायला मिळावी, ही सर्व भारतीय जनतेची "शेवटची इच्छा "!!! .

वाचने 1780
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हिला संरक्षण तरी का देतात,एवढं बापुडवाणा चेहरा करून असते हिला कोण मारणार ?मारणाऱ्याला देखील कंटाळा येईल,आळस येईल.

तमाम भारतियांच्या खदखदणार्‍या असंतोषाला वाट मोकळी करून देणारा धागा. ह्या धाग्याची लिंक राष्ट्रपती भवनाकडे पाठवली आहे.