गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा.
मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते. तेव्हढ्यात चिरंजीव त्यांचे प्राणीसंग्रहलय घेऊन आले आणि माझ्या मांडीवर डेरा जमवला.
आता त्यांच्याशी खेळताना त्या प्राण्यांवरच एखादं कथानक उभं करावं म्हणुन मी त्या "झू" मध्ये हात घातला आणि एक वाघोबा व हरीण उचलले. उजव्या हातात हरीण आणि डाव्या हाती शेरखान असा पाठशिवणीचा खेळ सुरु होता आणि माझे कथानक वाघोबाचे उदरभरण करायला हरणावर झेप घालणार एव्ह्यढ्यात ज्यु. अर्धवटरावांनी माझ्या हातावरच झडप घातली, वाघोबा आणि हरीण ताब्यात घेतले, पाठमोर्या हरणाला "टर्न अराऊंड" करुन वाघोबाशी "फेस टू फेस" केले आणि पप्पी-पप्पी-पप्पी म्हणुन त्यांचे झकास चुंबन दृष्य सुरु केले.
त्या इवल्या इवल्या हातांनी भुकेल्या वाघाला आणि जीव वाचवत पळणार्या हरणाला एका क्षणात गाढ प्रेमालींगनात गुंफले . त्या एका क्षणात माझ्या मनातला व्यवहारी कोरडेपणा कुठच्याकुठे पळाला आणि प्रेम-आनंद-हळवेपणा-वात्सल्य-मैत्रीभाव... अशीच काहिशी मीश्र, आत्यंतीक तीव्र भावना मनात चमकून गेली. चिरंजीवांना थोपटत मनात विचार आला... लेका, शेवटी तुही पक्का अर्धवटरावच... एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला गळ्यात गळे घालायचे स्वप्न बघेल...
वाचने
5484
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही तसा विचार केला यातच
क्लास!!! तुमच्या आनंदाचा
+१
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
+२
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
+३
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
+४
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
-
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
जिवंत करा
In reply to क्लास!!! तुमच्या आनंदाचा by यकु
टचींग! जरा तुमच स्पेशल
आय कॅन इमॅजीन !!
In reply to टचींग! जरा तुमच स्पेशल by स्पंदना
पलभरमें थकव्यावरचे औषध
मस्त
पप्पी आणि झप्पी, एका क्षणात सगळे प्रश्न संपले!
मस्तं प्रसंग.
एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला
किस्सा आवडला
हायसे वाटले.
In reply to किस्सा आवडला by सहज
फार दुर्मीळ असतात असे
In reply to हायसे वाटले. by प्रभाकर पेठकर
आवडला.
छान
आगदी खर आहे
मस्त किस्सा रे
मस्त किस्सा
सुपर्ब..
आवडले
मस्त किस्सा हो!
(No subject)