Skip to main content

ज्यु. अर्धवटराव

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 26/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा. मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते. तेव्हढ्यात चिरंजीव त्यांचे प्राणीसंग्रहलय घेऊन आले आणि माझ्या मांडीवर डेरा जमवला. आता त्यांच्याशी खेळताना त्या प्राण्यांवरच एखादं कथानक उभं करावं म्हणुन मी त्या "झू" मध्ये हात घातला आणि एक वाघोबा व हरीण उचलले. उजव्या हातात हरीण आणि डाव्या हाती शेरखान असा पाठशिवणीचा खेळ सुरु होता आणि माझे कथानक वाघोबाचे उदरभरण करायला हरणावर झेप घालणार एव्ह्यढ्यात ज्यु. अर्धवटरावांनी माझ्या हातावरच झडप घातली, वाघोबा आणि हरीण ताब्यात घेतले, पाठमोर्‍या हरणाला "टर्न अराऊंड" करुन वाघोबाशी "फेस टू फेस" केले आणि पप्पी-पप्पी-पप्पी म्हणुन त्यांचे झकास चुंबन दृष्य सुरु केले. त्या इवल्या इवल्या हातांनी भुकेल्या वाघाला आणि जीव वाचवत पळणार्‍या हरणाला एका क्षणात गाढ प्रेमालींगनात गुंफले . त्या एका क्षणात माझ्या मनातला व्यवहारी कोरडेपणा कुठच्याकुठे पळाला आणि प्रेम-आनंद-हळवेपणा-वात्सल्य-मैत्रीभाव... अशीच काहिशी मीश्र, आत्यंतीक तीव्र भावना मनात चमकून गेली. चिरंजीवांना थोपटत मनात विचार आला... लेका, शेवटी तुही पक्का अर्धवटरावच... एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला गळ्यात गळे घालायचे स्वप्न बघेल...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5484
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by यकु

कोरड्या, व्यवहार-कठोर जगातून चिरंजीवांनी तुम्हाला इतक्या सहजपणे प्रेमळ जगात आणून सोडलं, आणि तुम्ही आलात, हे फार छान!

In reply to by यकु

क्लास!!!तुमच्या आनंदाचा तुकडा एवढ्या अलगद आमच्याकडे दिल्याबद्दल धन्यवाद ! असेच म्हणतो....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by यकु

'बामनाचं पप्या' (यक्याला आक्षेप नाही हे ठाऊक आहे :) ) हायच हुश्शार... आमाला जे म्हनायचं हुतं त्ये आदीच बोलून म्वोकळं!

टचींग! जरा तुमच स्पेशल स्वागत कस असत ते पण सांगा ना? माझा लेक धावत धावत जाउन एकदम पाय जोर जोराने आपटत, फक्त लेगडान्स करायचा पप्पा आल्यावर. अर्थात हातातली नोटबुकची बॅग सांभाळत पप्पा पण तेव्हढ्याच जोरजोरात नाचायचे. मजा यायय्ची ते पहायला.

In reply to by स्पंदना

>>माझा लेक धावत धावत जाउन एकदम पाय जोर जोराने आपटत, फक्त लेगडान्स करायचा पप्पा आल्यावर. अर्थात हातातली नोटबुकची बॅग सांभाळत पप्पा पण तेव्हढ्याच जोरजोरात नाचायचे. मजा यायय्ची ते पहायला. -- हा बापलेकाचा डान्स काय धमाल उडवत असेल, आय कॅन इमॅजीन :). ज्यु. अर्धवटराव मला बघताच एक झकास स्माईल देतो, दोन्ही हात विमानाच्या पंख्यासारखे पसरवतो, आणि कंबरेत वाकुन घरभर धावत एक चक्कर मारतो. मग मला झप्पी :) अर्धवटराव

काSSSSश ये दुनिया इतनी सीधी होती । कधी कधी लहान मुले अगदी आगळे वेगळे तत्वज्ञान सुचवून जातात. आपल्याही वाटतं, खरंच अस असायला काय हरकत आहे? मस्तं प्रसंग चितारला आहे.

एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला गळ्यात गळे घालायचे स्वप्न बघेल... हे खासच. किती जणांना या वाक्याचा अर्थ कळाला आहे देव जाणे :)

In reply to by सहज

'अनाकलनीय वागणे' इतर प्राण्यांच्या माद्यांमध्येही दिसून येते हे पाहून हायसे वाटले.

किस्सा आवडला. पॅ. नितिन थत्ते

छान :)

"लेका, शेवटी तुही पक्का अर्धवटरावच." ardhavat वाचताना माझ्याही मनात संमीश्र भावनांच+आठवांच काहुर माजवलत आणि पार मागे नेलत. धन्यवाद :-)

मस्त किस्सा रे ज्युनियरचा. अर्धवट म्हणवत नाही, तुलाही आणि तुझ्या लेकालाही. :)

ज्यु. अर्धवटरावांचा किस्सा आवडला.
तुमच्या आनंदाचा तुकडा एवढ्या अलगद आमच्याकडे दिल्याबद्दल धन्यवाद
+१

वर पेठकर काकांनी म्हटल्याप्रमाणे "काSSSSश ये दुनिया इतनी सीधी होती ।". किस्सा आवडला. जियो बेटा.. (टेढ्यामेढ्या दुनियेतला) चिगो.