हळू हळू थिजलेल्या पानावर
थेंबाचे उजाड उघडेपण
प्रवाशा हा रुतू असाच गहिरा आहे.
पक्षांची थवेराने गेली
त्या दिशेची आठवण जपलेली फांदी
इथेही उरात निष्पर्ण...
रिकाम्या क्षणापाशी हात जोडणाऱ्या
प्रवाशा तुझ्या मागणीतील सखोलता व्यर्थ आहे.
गंधपर्णी ओसरलेली वहिवाट,
एकांताचा कडाका दिवसेंदिवस वाढतो
ह्या मिठीला लागलेली उबेची गळती
प्रवाशा पापण्यांवरील मिटण्याचा हक्क तू गमावला तर नाहीस?
श्लोकोत्सवासाठी अजून किती उरलेत मंत्र?
गात्रातील ही सहस्र बंड गर्जत आहेत
देवदूत भेटणारे रस्ते वेगळे आहेत...
(भयाने) प्रवाशा तुझ्या पाठीवर हे कोवळे पंख कसले आहेत?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1044
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रवाशा तुझ्या पाठीवर हे कोवळे पंख कसले आहेत?
जिपर्स क्रिपर्स !
कवीनं `रात्रीचा प्रवास' असं कुठेही म्हटलं नाहीये
In reply to जिपर्स क्रिपर्स ! by परिकथेतील राजकुमार