Skip to main content

देवदूत

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 24/04/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू थिजलेल्या पानावर थेंबाचे उजाड उघडेपण प्रवाशा हा रुतू असाच गहिरा आहे. पक्षांची थवेराने गेली त्या दिशेची आठवण जपलेली फांदी इथेही उरात निष्पर्ण... रिकाम्या क्षणापाशी हात जोडणाऱ्या प्रवाशा तुझ्या मागणीतील सखोलता व्यर्थ आहे. गंधपर्णी ओसरलेली वहिवाट, एकांताचा कडाका दिवसेंदिवस वाढतो ह्या मिठीला लागलेली उबेची गळती प्रवाशा पापण्यांवरील मिटण्याचा हक्क तू गमावला तर नाहीस? श्लोकोत्सवासाठी अजून किती उरलेत मंत्र? गात्रातील ही सहस्र बंड गर्जत आहेत देवदूत भेटणारे रस्ते वेगळे आहेत... (भयाने) प्रवाशा तुझ्या पाठीवर हे कोवळे पंख कसले आहेत?
लेखनविषय:

वाचने 1048
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

प्रवासी उडणार असेल तर गवि अजून पुढचा प्रवास करणार असेल तर परा, आणि लाँग ड्राइवला जाणार असेल तर गणपा... योग्य ते मार्गदर्शन करतील

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यामुळे हे मार्गदर्शन उपयोगी होणार नाही असं वाटतं >रिकाम्या क्षणापाशी हात जोडणार्‍या प्रवाशा तुझ्या मागणीतील सखोलता व्यर्थ आहे असं कवी उगीच का म्हणतोय?