Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी पाहिलंय...

प — प्राजु, Sun, 11/04/2007 - 15:37

प्रतिक्रिया द्या
10988 वाचन

💬 प्रतिसाद (13)
इ
इस्कुट Sun, 11/04/2007 - 16:10 नवीन
मी पहिलय त्याना, माझ्याच गाडीवरुन मिरवताना माझ्याच समोरुन, देखण्या पोरी फिरवताना . . .
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 11/04/2007 - 17:17 नवीन
प्राजु, नेहमी प्रमाणे सुंदर ओळी....... मी पाहिलंय त्यांना रंग बदलताना.. केशरी, पिवळा, अबोली, डाळिंबी असंख्य रंगांची झालर लेऊन तेज:पुंज झळाळी दिमाखात मिरवताना.. ज्या इकडे आम्ही खरेच पाहतो आहे, अनुभवतो आहे. तुझी मैत्रिण, स्वाती.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/06/2007 - 20:24 नवीन
प्राजु, कविता छानच आहे.. आवडली.. तात्या. अवांतर - इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी. ही पूर्वी मनोगतावर प्रकाशित झालेली आहे.. मिसळपाववर प्रकाशित झालेल्या पानगळ या कवितेच्या प्रतिसादातच 'मी पाहिलंय' या मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेल्या कवितेचा दुवा दिला असता तरी चालले असते असे वाटते. कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 04:35 नवीन
कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे! चालेल रे तात्या ! "तिथे" पण नाही का लोक "माझा हा लेख अमक्या ढमक्या इवल्याशा पेप्रात प्रकाशित झाला होता, तो इथे देत आहे" म्हणतात, आणि मग इतर वाचक "वा ! क्या बात है ! पुढल्या ओकारीबद्दल शुभेच्छा!" असं म्हणतात ? तसंच कुठल्याही संस्थवर चालायला हवं ? नाही का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 04:41 नवीन
एकेक कळी, पानं, फुलं जपत त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना... शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात. ह्या ओळी सोडल्या तर बाकी कविता आवडली. - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 05:42 नवीन
शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात. छ्या! काहीतरीच काय रे मिलिंदा! तू सुद्धा कुठल्या गोष्टी कुठे नेऊन ठेवतोस! 'बलात्काराचं समर्थन' असं तुझं म्हणणं जरा अतीच होतंय असं मला वाटतं! असो, मला काव्यातलं फारसं समजत नाही हे चित्तोबांचं म्हणणं मला मान्य आहे, पण तरीही..:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 06:09 नवीन
अरे तात्या, अरे ही कळी, पानं, फुल,असल्या नाजुक गोष्टी आल्यावर धसमुसळेपणा (चुरगाळणं?), हे आलं कुठून ? नाही, म्हणजे कविता वगैरे मलाही कळत नाही, पण कळ्या आणि धसमुसळेपणा ह्यांचा परस्परसंबंध कसल्या कसल्या इतर कविता /लेख/ बातम्या वाचून कळतो की ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 05:14 नवीन
मी पाहिलंय.. मी पाहिलंय त्यांना धुंद होताना.. बोचऱ्या थंडीच्या चाहुलीने नव रंगांच्या निर्मितीने पानगळीसाठी सज्ज होताना... या ओळी विशेष आवडल्या ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 11/07/2007 - 06:45 नवीन
आवडली. ध्रुव
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडा Wed, 11/07/2007 - 12:45 नवीन
कविता मनापसून आवडली.असेच लेखन चालू ठेवावे...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/07/2007 - 16:51 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. सर्किटराव, मी पाहिलंय त्यांना ऋतू पेलताना.. बेभान वाऱ्यासवे शहारणारी तनू एकेक कळी, पानं, फुलं जपत त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना... ही कविताच मुळी झाडांबद्दल आहे. आई जशी आपल्या तान्हूल्याला आपल्याच मोठ्या मुलांपासून सांभाळत असते.. त्याचप्रमाणे ही झाडे आपल्या छोट्यांना या वा-याच्या दंग्यापासून सांभाळतात.. असा अर्थ अपेक्षित आहे. ही कविता कोणत्याही सामाजिक घटनेशी संबंधित नाही आणि तसा अर्थही अपेक्षित नाही. ही निव्वळ एक निसर्ग कविता आहे. तुम्ही "बलात्काराचा "अर्थ लावून त्या वा-याला एखादा वासनेने पिसाटलेला नराधमच केलात. असो... धन्यवाद तुमच्याही प्रतिसादाबद्दल. :))) प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 19:09 नवीन
प्राजूताई, माफ करा. अनेकदा कविता एकदा वाचल्यावर फक्त वरवरचा अर्थ कळतो, म्हणून कविता आवडली की पुन्हा अधिक खोलात शिरून वाचून आणखी काही कळते का, हा विचार करावासा वाटतो. मला आपली कविता आवडली, हे सांगणे न लगे. परंतु नंतर वाचताना पुन्हा तो "ऋतू.. पेलणे", "धसमुसळेपणा", "शहारणारी तनू", "कळ्या... जपणे" वगैरे वाचून उगाच काही तरी आभास जाणवले. क्षमस्व. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Fri, 11/09/2007 - 05:10 नवीन
अहो....माफी कसली मागता??? ती ही माझ्याकडून?? मला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हाला नाही कवितेतून जाणवला याचा अर्थ माझी कविता अजूनही स्पष्टपणे नाही येत.. मला एक चांगली कविता लिहीण्यासाठी अजून खूप खूप गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न ही चालू राहील. प्राजु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा