Skip to main content

दुधपोहे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/04/2012 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे. तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही. झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे. (लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.) जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते. पाककृती: १) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या. २) मुठभर पातळ पोहे घ्या. ३) चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात. दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत. (फोटो आंतरजालावरून साभार) पुर्वप्रकाशीत

वाचने 8676
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे. कॉर्नफ्लेक्सचा कंटाळा आला तर त्यावर हा राइसफ्लेक्सचा पर्याय चांगला आहे! मात्र पातळ पोह्याऐवजी जाड पोह्याचे (आधी थोडा वेळ भिजवून घ्यावेत) दुघ-पोहे चांगले होतात असा स्वानुभव आहे.

In reply to by सुनील

पाककृतीत काही शब्द राहून गेले आहेत. दुधपोहे करण्याच्या अद्ययावत पायर्‍या याप्रमाणे: १) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या. २) मुठभर पातळ पोहे त्यात टाका. ३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात. दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.

In reply to by सुनील

झोपेचा अंमल दुसरं काय! लेख टाकल्यानंतर काही काळतरी स्वसंपादनाबाबत काहीतरी करता येईल काय? माझ्यामते vBulletin मध्ये तशी सुविधा आहे. त्याचप्रमाणे मिपाचा ईडीटर गंडला आहे काय? मी ज्या हायपरलिंक व फोटो लि़ंक टाकत होतो त्या Line 1 मध्ये जात होत्या.

In reply to by पाषाणभेद

अख्खी पाकृ च राहिली होती की हो! असो. यात पातळ पोह्यांऐवजी "धुतलेले जाड तांबडे पोहे" आणि साखरेऐवजी गूळ असा बदल केला तर फरच छान लागतात असा स्वानुभव आहे.

In reply to by सुनील

फटूतले पोहे तर जाड पोहेच दिसत आहेत. पातळ पोहे असे दिसतात. :-

In reply to by सुनील

हो जाड पोहेच वापरावेत..चव चांगली लागते, आणी साखरे पेक्षा गुळ घालून पण खावू शकता...एकदम चव झकास

दूधपोहे हे खरंतर सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं खाणं म्हणून मान्यता पावायला हवं. मी साखरेऐवजी गूळ वापरते एवढाच काय तो बदल. बाकी दही पोह्यांचीही आठवण करून दिलीच आहेत तर लगेच करते. तळणीची मिरची किंवा हि. मिरची, कोथिंबीर घालून.;) मिपाचे स्वयंपाकघर बर्‍याच पाकृंनी समृद्ध आहे. बॅचलरांनी (किंवा थोडेफार बॅचलर असणार्‍यांनी, उदा. कुंदनभाऊजी ;) ) आता दही, मिरची, कोथिंबीरीसारख्या वस्तू फ्रिजात ठेवावयास हरकत नाही असे सुचवते. ;)

In reply to by रेवती

सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं आणि आळशांचे खाणं म्हणून मान्यता पावायला हवं. चांगले पदार्थ खायचे म्हणजे ते करण्यासाठी थोडी तरी मेहनत करणे भाग आहे असे आमचे मत आहे. दुध पोह्यांपेक्षा मला नेहमीचे कांदा-पोहे जास्त आवडतात.

In reply to by कुंदन

जाड पोहेच वापरावेत. आणि गूळ छान लागतो यात. असेच साध्या ज्वारीच्या लाह्या सुद्धा.. दूध-गूळ आणि लाह्या... असा फर्मास बेत असतो आमच्याकडे. :)

ही अशी अनवट रेसिपी दिल्याबद्दल अभिनंदन !! झकासच !! कौतुक करावं तितकं कमी.

जाडे पोहे मायक्रोवेव मध्ये तीन चार मिनिटे हाय वर भाजायचे आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक दळायचे . ते पोहे दुध गुळ घालून खायला जास्त खमंग लागतात ---अजित जी

अहो मायबापहो! ही रेसेपी कमीतकमी वस्तू/ जिन्नस वापरून करण्यासाठीची सोपी पाककृतीच ठेवा. उगाच मालमसाला वापरून का उगा या रेसेपीला पंचतारांकीत करताय? जास्त पदार्थ वापरलेतर "पोह्यांची ओली गोड भेळ" होईल ती. त्यासाठी वेगळा धागा काढा. छायाचित्रे आंतरजालावरून उचललेली असल्याने त्यात निवड करणे अवघड होते. आणि तसेही पोहे जाड असो पातळ असो पोटात भुक लागल्यानंतर कसली आलीय निवड! झटपट नाष्टा उपलब्ध असणे ही काही वेळा शरीराची गरज असते. आपली जीभही त्यास परवानगी देते व आहे त्यात साजरे करणे महत्वाचे ठरते. त्यावेळी केवळ कमीतकमी जिन्नस घेवून पोटपुजा करणे योग्य असते. तसे पात्र सजवायचे झाल्यास काहीही पदार्थ टाकून, भर घालून सजवू शकतो यात वाद नाही.

दूधात भिजवलेले जाड पोहे घ्यायचे. त्यावर गरम गरम दूध ओतायचं आणि आईचं लक्ष नाहीसं पाहून चांगली जाड साय ओढून घ्यायची पोह्यांवर. आईने बघितलंच तर 'च् च् च्.....चुकुन पडली' असं चेहरा पाडून म्हणायचं. अहाहा..! रम्य ते बालपण.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर सर, एकदम सहमत. खुप सारी जाड साय+गरम दुध + साखर /गुळ +जाड पोहे. अप्रतिम चव. मी तर कधी कधी साखरे ऐवजी मध पण घालतो एकदम अप्रतिम चव लागते.

मला तर हा प्रकार नविनच आहे , मी कधीही असे पोहे खाल्लेल्ले नाहीत आजपर्यंत ! एकदा ट्राय मारायला हवे आता :)

In reply to by प्रभाकर पेठकर

कोण मी का ? पेठ़कर काका ? पण आता पाक्रु पाहीलिये ना , मग मी देखील जाड जाड पोह्यावर गरम दुध घालुन वर जाड साय अन गुळ घालुन असा आडवा हात मारते अन तुमच्या सुदैवी क्याटेगरीत येते :) कसे ;)

In reply to by पियुशा

हा:..हा:...हा:... राग मानू नकोस पियुशा. पण जाड पोहे, दूध, साखर आणि वर जाड जाड साय....काय वर्णावे ते सुख. पोह्यावर दूध आणि आवडीनुसार साखर असेल तर साय जेवढी जाड तेवढे सुख अधिक. असो.

In reply to by यकु

हो यक्कू. इथेही जवळ मिळत नाही. इथेही प्रॉब्लेमच आहे. पण जी-बी फ्रीवेवरुन सेव्हन्थ एक्झिट घेतल्यावर एक इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे, तिथे पोहे, गूळ साखर वगैरे मिळेल असं वाटतं. या वीकेंडला ग्रोसरीच्या वेळी नक्की आणेन.

In reply to by गवि

पण जी-बी फ्रीवेवरुन सेव्हन्थ एक्झिट घेतल्यावर एक इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे, तिथे पोहे, गूळ साखर वगैरे मिळेल असं वाटतं.
गवि, नक्की पहा आणि मिळाली तर माझ्यासाठीही आठवणीने आणा ;-) इकडे एकही इंडीयन दुकान नाही.

वा वा. बादवे, हे पाहून ब्याचलरीतले, विशेषतः बिनमेसच्या हॉस्टेललाईफातले बनकेळे, बिस्कीटखीर, पापड सँडविच वगैरे पदार्थ आठवून अं. ह. झा.

"धुतलेले जाड तांबडे पोहेच" छान वाटतात. पण आजकाल बाजारात सगळीकडे पांढरे पोहेच असतात. पूर्वी तांबडे पोहे कोकणात गावी लावलेल्या तांबड्या भातापासून घरीच बनवले जायचे. पण आजकाल गावी सुद्धा "तांबडे तांदुळ" हद्दपार झालेत आणि त्याबरोबर तांबडे पोहे (अन तांबड्या तांदळाची पेज).

धन्यवाद रे सच्या !! अरे बाबा , ते मुक्तीधाम च्या शेजारच्या मिसळीच्या ठिकाणाविषयी लिहीणार होतास , त्याचे काय लोणचे घातलेस का ? ;)