Skip to main content

रोज म रे त्याला कोण रडे

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 20/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मध्य रेल्वेवर झालेल्या फायर ब्लॉकची घटना ताजी असतांनाच काल एक गंभीर घटना घडून आली. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी प्रवाशांनी खच्चून भरली होती. आणि नाहूर, भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नलच्या खांबाला जी शिडी होती त्यावर मेंटेनन्ससाटी उभे राहण्याचा जो भाग होता तो थोडा झुकलेला होता त्यामुळे दाराबाहेर किंवा दारावर जे प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांची ह्या भागाला धडक लागून अपघात घडला आणि त्यातल्या तीन जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. सिग्नल यंत्रणेत होणार्र्या वारंवार बिघाडामुळे प्रवासी संतप्त तर आहेतच शिवाय अपघातही घडून येत आहेत. एवढे सगळे होउनही आपले सरकारी अधिकारी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. नंतर आहेच वर म्रुत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून अमुक अमुक मदत जाहीर केली जाईल अशी आश्वासने. सिग्नलचा प्लॅटफॉर्म कसा झुकला, याची चौकशी रेल्वे प्रशासनानं सुरू केली आहे. आता ह्या चौकशीसाठी मंडळांची स्थापना केली जाईल यातनं काय साध्य होणार आहे ते देवच जाणे.

वाचने 3634
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ... अरे चतुर आपल्या देशात माणसाच्या आयुष्याची किंमत आहे का ? वाघिणीं मधुन म्हैस आणतात तिला देखील उभे रहायला,बसायला जागा असते ! पण मुंबईकर जनता मात्र किड्या-मुंग्यां सारखे प्रवास करते ! रेल्वेला सर्वात जास्त महसुल मुंबईकडुनच मिळतो,तरी सुद्ध्या त्यांच्या पदरात काय येते, येतो तो फक्त जीवघेणा प्रवास ! काही लाख मॄत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिले की काम संपले ! ज्या ठिकाणी इतकी आग लागली तिथे आग विझवणारी यंत्रणा कशी काय नव्हती हे मला कळले नाही,तसेही रेल्वे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेच म्हणा,त्यांच्या कडुन काय अपेक्षा ठेवणार ? कधी रेल्वेच्या डब्यावर पुल कोसळणार तर कधी कुठेतरी आग लागणार ! हे असेच कधी-मधी घडत राहणार आणि आपण हताशपणे पाहत राहणार ! :(

In reply to by मदनबाण

वाघिणीं मधुन म्हैस आणतात तिला देखील उभे रहायला,बसायला जागा असते !
म्हशींवर तुमचा राग का आहे ? त्यांनी व्यवस्थित बसु नये का ?

In reply to by अँग्री बर्ड

म्हशींवर तुमचा राग का आहे ? त्यांनी व्यवस्थित बसु नये का ? म्हशींच्या भाग्यात जे आहे ते सुद्धा मुंबईकरांच्या नशिबात नाही याचे दु:ख वाटते.

अरे हो पण ह्यात हकनाक सामान्य, मध्यम वर्गीय माणसांचा जीव जातोय आणि राजकारण्यांना काय त्यांची पोळी भाजायला आणखी एक तवा त्यांना आपसुक मिळतोय :(

In reply to by लीलाधर

ह्यात हकनाक सामान्य, मध्यम वर्गीय माणसांचा जीव जातोय आणि राजकारण्यांना काय त्यांची पोळी भाजायला आणखी एक तवा त्यांना आपसुक मिळतोय हा तर हिंदुस्थानी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भागच आहे. इतके वर्ष स्वातंत्र्य मिळुन झाली तरी वीज,पाण्याची टंचाई पाचवीला पुजलेली आहे.नेते भ्रष्टाचार करतात आणि परत परत निवडुन येतात. या भ्रष्टार्‍यांची कातडी इतकी निबर आहे की गेंडा सुद्धा लाजेल रे ! आता पेट्रोलच्या किंमती ९ ते १० रुं वाढणार आहे म्हणे ! सामन्य माणसाने काय करायचे ? मंत्री संत्री तर मोठ्या आलीशान गाड्यातु लाल दिवा लावुन फिरणार आणि सामन्य नागरिक महागाईच्या कोलुत पिसला जाणार ! लोक मरत राहणार, समित्या स्थापन होत राहणार, त्याचे अहवाल मिळत जाणार परत सर्व तसेच घडत जाणार ! सामान्य नागरिकाच्या आयुष्यातला हा जिवघेणा प्रवास असाच चालु राहणार ! माझ्यातला माधव आपटे मग परत जागा होतो आणि त्रागा करुन घेउन परत उद्याचा प्रवासाला सामोरा जातो,पोटाची खळगी भरण्यासाठी !

पुणे, बन्गलोरे , किंवा दुबई, उसात जॉब शोधायला हवा आता

सामान्य मुंबईकर गेले २ दिवस ज्या दु:खातून जात आहे, जा यातना सहन करित आहे त्याला तोड नाही मुंबईची लाइफ लाईन जी काही दिवस कुर्ला हॉस्पीटल मधे अतीदक्षता विभागात होती, तीला लवकरात लवकर आराम मिळून तिची सुटका होवो अमोल केळकर

चतुर चाणक्याने असा धागा काढावा ह्याचे जाम आश्चर्य वाटले. मात्र मुंबईकरांच्या सहनशक्तीचे आणि जिद्दीचे कौतुक कायमच वाटत आले आहे. खरे तर आता, बॉम्बस्फोट, दंगली, हे असे अपघात ह्या नंतर मुंबईकर कसे सावरतात, उभारी धरतात, कामाला लागतात इ. इ. कौतुकाने बोलणे म्हणजे आतून आपण कुठेतरी ह्या मुंबईकरांची टिंगल उडवतोय किंवा त्यांच्या जखमेवर मिठ चोळतोय असे वाटते. बाकी बर्‍याच दिवसांनी बाण्याने विथ व्हिडो प्रतिसाद दिल्याने त्याच्यावरुन भाकर तुकडा ओवाळून टाकल्या गेला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरे तर आता, बॉम्बस्फोट, दंगली, हे असे अपघात ह्या नंतर मुंबईकर कसे सावरतात, उभारी धरतात, कामाला लागतात इ. इ. कौतुकाने बोलणे म्हणजे आतून आपण कुठेतरी ह्या मुंबईकरांची टिंगल उडवतोय किंवा त्यांच्या जखमेवर मिठ चोळतोय असे वाटते. हुम्म्म मुंबैकराला आता हा खोटा मोठेपणा नकोय.. त्याला आता सुरक्षितता हवीये .. ती मिळणे , या भिकार राजकारण्यांच्या जगात कठीणच आहे

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्र्या ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे रे? संदर्भासहीत स्पष्टीकरण दे..........

दाराबाहेर किंवा दारावर जे प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांची ह्या भागाला धडक लागून अपघात घडला..... घटनेबद्दल दु:ख होतंय पण प्रवाशांनीही प्रवास करतांना काळजी घेतलीच पाहिजे असे अपघाताचे कारण पाहता, वाटले. सिग्नलचा प्लॅटफॉर्म कसा झुकला, याची चौकशी रेल्वे प्रशासनानं सुरू केली आहे. आता ह्या चौकशीसाठी मंडळांची स्थापना केली जाईल यातनं काय साध्य होणार आहे ते देवच जाणे. प्राथमिक चौकशीत, असा कोणताही सिग्नलचा खांब लोकलवर झुकलेला आढळला नाही, असे वाचनात आले होते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ शी सहमत. पण काय आहे प्रा डॉ , रोजी रोटी बुडेल अथवा एखाद्-दोन रजा जातील या भीतीने लोक नाइलाजाने असा धोका पत्करतात.

In reply to by कुंदन

>>पण काय आहे प्रा डॉ , रोजी रोटी बुडेल अथवा एखाद्-दोन रजा जातील या भीतीने लोक नाइलाजाने असा धोका पत्करतात. अगदी सहमत !! लोकांना धोका पत्करावा लागतो, कारण तसं नाही केलं तर दुसरा ऑप्शनच नसतो. अशा वेळी एक लोकल गर्दी आहे म्हणून सोडली तर दुसरी कधी येईल याची शाश्वती नसते. आज सकाळीच बदलापूरला सकाळी ९.०४ ची दादर रद्द केली, १ नंबर प्लॅटफॉर्मवरुन तीन नंबरला यायला लोकांची ही पळापळ. त्या पळापळीत एकाने तीन नंबरवरची गाडी सुटता सुटता पकडली कारण नंतर अर्धा तास गाडी नाही आणि त्याचा पाय निसटला. गुडघे प्लाटफॉर्मला घासले जाऊ नये म्हणून कसंबसं हेलकावे घेत होता. लोकांनी आत ओढून घेतलं म्हणून नाहीतर मिडीयाला चघळायला आणखी एक बातमी मिळाली असती. नंतर परिस्थितीत काहीच फरक पडला नसता ही गोष्ट वेगळी.

In reply to by सूड

अगदी सहमत !! लोकांना धोका पत्करावा लागतो, कारण तसं नाही केलं तर दुसरा ऑप्शनच नसतो
सूड, हे अगदी १००% सत्य नाही. दुसरा ऑप्शन नसतोच असे नाही. बरेचदा आपण त्याचा विचार करत नाही. तुला साधे उदाहरण देतो. दिनांक २६-जुलै-२००५. अनेक मुंबईकरांसाठी अविस्मरणीय दिवस आणि रात्र होती. ढगफुटी आणि त्यामुळे पूर. मी तेव्हा मालाड ला काम करत असे. जेव्हा पाऊस वाढला तेव्हा घरून फोन आला. की घरी येऊ नकोस. त्यापेक्षा बोरिवलीला मित्राकडे जा. पाऊस इतका वाढला की मालाड ते बोरीवली जाण्यात पण अर्थ नव्हता. मग ऑफिस मधील कॅन्टीनवाल्याला विचारले, जेवण आणि पाणी आहे का?? भरपूर आहे म्हणाला. मग निर्णय घेतला ते सेफ पणे तिथेच राहण्याचा. पण इतरांनी बाहेर पडून आपल्या किंवा मित्राच्या घरी जाण्यासाठी जंग जंग पछाडले होते. जिथे अन्न, पाणी, बसायला कोरडी जावा आणि बाथरूम ची सोय आहे, ते सोडून बाहेर जाण्याचे काय खूळ लोकांच्या डोक्यात होते देव जाणे. गिरगाव, वाशी अशा ठिकाणी जाण्याचे प्लान लोकांनी केलेले पहिले आहेत त्या रात्री. अनेक जण सुके बसले होते ते बाहेर जाऊन प्रयत्न करून ओलेगिच्च होऊन परत आले. मग रात्री काही जणांचा प्लान, इथून चालत अंधेरीला जाऊ, मग तिथून अमुक रस्ता पकडून वांद्रे मग दादर. म्हटले तुम्हाला जायचे तिथे जा, मी सगळे सुरळीत होईपर्यंत हलणार नाही. त्यावर प्रतिवाद हा, की अमुक रस्त्याला फार तर कंबरभर पाणी असेल. म्हटले तुम्ही हवी ती आ.... मी हे सर्कस चे प्रकार करणार नाही. तर सांगायचा मुद्दा हा की बेटर सेफ दॅन सॉरी हे आपण अनेकदा लक्षात घेत नाही. आता परवाचे उदाहरण देतो. मी स्वतः नशिबाने अडकलो नाही, पण चचाने खफ वर टाकलेला फोटो आहे तशा गर्दीत अडकलो असतो तर माझ्या ओळखीत दादर ते ठाणे यामधील जवळपास प्रत्येक स्टेशनवरून चालत किंवा बसने जाता येईल इतक्या अंतरावर किमान एक जण राहतो. (हे विधान प्रत्येक मुंबई-ठाणेकराला लागू पडत असणार) मी सरळ त्याच्याकडे मुक्काम ठोकला असता. आणि अशा प्रसंगी मुंबईकर मदत करतात (ते स्पिरीट म्हणतात ते हे आहे) प्रत्येकाकडे हा ऑप्शन असतोच असे नाही. पण जेव्हा असतो तेव्हा वापर करण्यास मागे पुढे पाहू नये. आणि मुख्य म्हणजे एक रजा जाणे बरे की जीव जाणे ? जीव सलामत तो रजा पचास..

घटनेबद्दल दु:ख होतंय पण प्रवाशांनीही प्रवास करतांना काळजी घेतलीच पाहिजे असे अपघाताचे कारण पाहता, वाटले. अहो कसली काळजी घ्यायची माणसांनी? लोकल मध्ये गर्दी होती म्हणून ती सोडणे परवडत नाही बाबा आम्हाला. लेट मार्क लागला तर पगार कापला जातोच वर ४ शब्द ऐकून घ्यावे लागतात. रोज लाखो लोक असेच प्रवास करतात. अपघाताच्या लिस्ट मध्ये आपल नाव न येण्याची काळजी घेतच लोक प्रवास करतात. काळ्जी रेल्वेने घेतली तर फार उपकार होतील आमच्यावर. एकतर सगळ्याच गाड्या बंद ठेवा किंवा अशी पाळीच येउ नये अशी उपाययोजना करा.