साहित्यः
१-३/४ वाटी मैदा
१ वाटी सुक्या खोबर्याचा कीस
(डेसीकेटेड कोकोनट)
१ वाटी साखर
१/२ वाटी बटर
(फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
२ अंडी
(फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
१-१/२ वाटी दूध
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
२-३ थेंब खायचा गुलाबी रंग
२-३ टेस्पून कोको पावडर
पाकृ:
प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खायचा / बेकिंग सोडा एकत्र ३ वेळा चाळून घ्या.

दूसर्या भांड्यात दूध व खोबर्याचा कीस एकत्र करुन भिजवून ठेवावे.

एका मिक्सिंग बाऊल मध्ये (भांड्यात) बटर व साखर फेटून घेणे.

आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.

आता त्यात एकदा दूध , एकदा मैद्याचे मिश्रण थोडे -थोडे घालून फेटणे. व्हॅनिला एसेन्स घालून फेटणे.

तयार मिश्रणाचे ३ भाग करावे. एक भाग तसाच राहु द्यावा. दुसर्या भागात खायचा गुलाबी रंग घालून एकत्र करणे. तीसर्या भागात कोको पावडर चाळून घालणे.
(मार्बल केक करायचा नसल्यास तयार मिश्रण थेट ओव्हनला बेक करण्यासाठी ठेवावे.)

तूपाचा हात फिरवलेल्या केकटीन मध्ये आधी पांढरे मिश्रण ओता, त्यावर चमच्याने गुलाबी रंगाचे मिश्रण घाला. मग कोको पावडरमिश्रीत मिश्रण घाला.

त्यानंतर सुरी मिश्रणावर फिरवा.
(मी फोटो काढायला विसरले :( ) तयार केकटीन प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर ३०-३५ मिनिटे भाजायला (बेक) करायला ठेवा.
केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून ठेवावा.

केक पूर्ण थंड झाला की वरचा खडबडीत भाग सुरीच्या मदतीने कापून काढा व केकेचे स्लाईस करा व त्यावर थोडे डेसीकेटेड कोकोनट भुरभुरा.
कोकोनट मार्बल केक तयार आहे :)
प्रतिक्रिया
सकाळी सकाळी पाककृती वाचून
माझं घर ४ डि थिएटर असल्याचा
झक्कास.
फक्कड !
वॉव!!!!! मस्त ४ दिवसांपासुन
शेवटच्या फोटुमधे उडी मारायची
अप्रतिम !
च्यायला! आणि वास देखील छान
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
लैच भारी.... !!
त्रास त्रास
@अवांतरः ही पाकृ अंडं.....
In reply to त्रास त्रास by प्यारे१
वाह!!! सही आहे
सनिका ताई तु 'अमेझींग' आहे...
मस्तच. खुपच सुंदर. आता आणखी
केककृती आवड्ल्या गेली आहे.
सुंदर दिसतोय
आहाहा... आहाहा... आहाहा
वाचले हो, तरीही तुझ्या
In reply to आहाहा... आहाहा... आहाहा by मदनबाण
काय गो रागावलीस की काय !
In reply to वाचले हो, तरीही तुझ्या by रेवती
एक प्रश्न
धन्यवाद स्मिता
In reply to एक प्रश्न by स्मिता.
पीजे: अरे माझं नाव कोणी घेतलं
In reply to धन्यवाद स्मिता by सानिकास्वप्निल
हो हो मला
In reply to धन्यवाद स्मिता by सानिकास्वप्निल
वाचनखुणेत साठवला आहे. नक्की
फोटो व पाककृती अप्रतिम.लवकरच
केकृ आवडली. मी केला तर
सानिका...... अगदी केकच्या
यम्मी...
हा हा हा
In reply to यम्मी... by साबु
फोटू दिसत नाहीत ...