Skip to main content

कोकोनट मार्बल केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 20/04/2012 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १-३/४ वाटी मैदा १ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस (डेसीकेटेड कोकोनट) १ वाटी साखर १/२ वाटी बटर (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे) २ अंडी (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे) १-१/२ वाटी दूध २ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स २-३ थेंब खायचा गुलाबी रंग २-३ टेस्पून कोको पावडर . पाकृ: प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खायचा / बेकिंग सोडा एकत्र ३ वेळा चाळून घ्या. . दूसर्‍या भांड्यात दूध व खोबर्‍याचा कीस एकत्र करुन भिजवून ठेवावे. . एका मिक्सिंग बाऊल मध्ये (भांड्यात) बटर व साखर फेटून घेणे. . आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे. . आता त्यात एकदा दूध , एकदा मैद्याचे मिश्रण थोडे -थोडे घालून फेटणे. व्हॅनिला एसेन्स घालून फेटणे. . तयार मिश्रणाचे ३ भाग करावे. एक भाग तसाच राहु द्यावा. दुसर्‍या भागात खायचा गुलाबी रंग घालून एकत्र करणे. तीसर्‍या भागात कोको पावडर चाळून घालणे. (मार्बल केक करायचा नसल्यास तयार मिश्रण थेट ओव्हनला बेक करण्यासाठी ठेवावे.) . तूपाचा हात फिरवलेल्या केकटीन मध्ये आधी पांढरे मिश्रण ओता, त्यावर चमच्याने गुलाबी रंगाचे मिश्रण घाला. मग कोको पावडरमिश्रीत मिश्रण घाला. . त्यानंतर सुरी मिश्रणावर फिरवा. (मी फोटो काढायला विसरले :( ) तयार केकटीन प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर ३०-३५ मिनिटे भाजायला (बेक) करायला ठेवा. केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून ठेवावा. . . केक पूर्ण थंड झाला की वरचा खडबडीत भाग सुरीच्या मदतीने कापून काढा व केकेचे स्लाईस करा व त्यावर थोडे डेसीकेटेड कोकोनट भुरभुरा. कोकोनट मार्बल केक तयार आहे :) .

वाचने 9093
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

वॉव!!!!! मस्त ४ दिवसांपासुन नविन पाक्रु. ची वाट पाहत होते मी :) चला पाक्रु विभागाचा उपवास संपला तुझ्या केकच्या निमित्ताने ;) ही घे चॉकलेट्स तुला माझ्यातर्फे ;)

आणि वास देखील छान सुटला आहे. सकाळी सकाळी हे असले काही बघितले की फार त्रास होतो जीवाला. बाकी ते चिझ चिली टोस्ट चे काय झाले ग तै ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला! आणि वास देखील छान सुटला आहे>> कुठल्या कोषातून घेतला हो वास तुम्ही, परावर्तक गुरुजी?

त्रास त्रास त्रास....! अवांतरः ही पाकृ अंडं..... इ.इ. ?

In reply to by प्यारे१

@अवांतरः ही पाकृ अंडं..... इ.इ. ? >>> खा कि मेल्या कधितरी... ते विंजेक्शनचं अंड पिल्लु जन्माला न घालणारं,म्हणजे मानवता वादी क्याट्यागरीत फुटतं कि नै... ;-) ते बघ कसं... व्हेजही नाही आणी नॉनव्हेजही नाही... शादि का लड्डु सारखं...हाण कि कधितरी ;-)

सनिका ताई तु 'अमेझींग' आहे... झकास पाकृ!!! तुझ्या पा़कृ मधे नेहमीच किती निट-नेटकेपणा आणि स्वच्छता असते... बाकि सादरीकरण आणि फोटोग्राफि बद्दल वेगळं सांगायला नकोच :)

आहाहा... आहाहा... आहाहा ! (देवकी पंडीत मोड ऑन) पण... जरा... ताई माई अक्का विचार करा पक्का अड्यांला मारा धक्का अन् फक्तस्त बिनअड्यांच्या केकवर मारा शिक्का ! ;) आता आज्जेचा सल्ल्या प्रमाणे विचारतो... मिपा नियमाप्रमाणे 'ही पाकृ अंडे न घालता करता येईल काय?' असे विचारातो. ;) (काय आज्जे वाचतेयस ना ! ;) ) तो इंटुकला पिंटुकला चमचा लयं आवडला बघा ! :) (केक प्रेमी) ;)

In reply to by मदनबाण

वाचले हो, तरीही तुझ्या धाग्यांना मी प्रतिसाद देणार नाही. बघच आता तू!.;) तुझ्या प्रतिसादांना आत्ता दिलाय तसा उपप्रतिसादही देणार नाही.;)

केक छान, सुंदर, इ.इ. नेहमीच्या प्रतिक्रिया आहेतच, पण सोबत एक प्रश्न आहे.
आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.
याला काही खास कारण आहे का? की फक्त दोन अंडी एकत्र घातल्याने एकदम सरबरीत होवून फेटायला जरा त्रास होईल म्हणून ही टिप?

In reply to by स्मिता.

एकावेळी एक अंडे घालून फेटले तर केक अधिक हलका होतो व चांगला फुलतो :) बटर-साखर एकत्र फेटल्यामुळे त्यात हवा निर्माण झालेली असते ती रीटेन (मराठे?) करण्यासाठी एकावेळी एक अंडे घालून फेटावे इतकचं :)

In reply to by सानिकास्वप्निल

पीजे: अरे माझं नाव कोणी घेतलं म्हणून बघायला आलो... पण तुम्हाला 'मराठी' असं म्हणायचं होतं म्हणून रिटेन आय मीन रिटर्न जातो! बाय द वे - रिटेन = साठवून/धरून ठेवणे ?

केकृ आवडली. मी केला तर बिनरंगी करीन असे वाटते. यावेळी हिरवा मिक्सिंग बोल आवडला.

सानिका...... अगदी केकच्या तयारीपासून सगळं जाम आवडलं. किती निगुतीने करतेस गं सगळं !! गुणाचीये हो आमची सानिका :)

ही बाइ अशक्य आहे...आणि हीचे मिस्टर आणि मुले भाग्यवान... दन्डवत स्वीकारा....

In reply to by साबु

साबुभौ मिस्टारंपर्यंत ठिक आहे तुम्ही तर पार पुढचा विचार केलात :P धन्यवाद :)