चांदव्याचे प्रीत गाणे
ऐकता नभ रंगते |
कुणी येथे विरहिणी अन
वाट त्याची पाहते || ....
क्षितीज पार सांज धून
सूर अनवट छेडते |
अंतरात कुणी माझ्या
जीव गोंदून ठेवते ||
आर्त माझ्या मन्मनीचे
सख्या तुला समजेल का |
विरह व्याकूळ वेदनेचा
अर्थ तुज उमगेल का ||
सांडते घरदार मागे
सोडते जनरीत ही |
अंतरीची संगिनी मज
सांग तू करशील का ||
--सागर लहरी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1796
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान.
मस्त!!
खुप आवडली.
मस्तच....! विरहीणी आवडली.
मस्तच....!
विरहीणी आवडली. :)
धन्यवाद
मनःपूर्वक आभार..
सुरेख!
सुरेख!
वा वा वा.... मस्त
वा वा वा.... मस्त :-)
खूप छान
खूप छान, आवडली. :)
येऊदेत अजून.
छान!
छान कविता.