मागून पुढे क्रमश:
अप्पा दांडेकर काही वेळेस तत्त्वज्ञासारखे काही बोलत.एकदा त्यानी एक आकाशगंगेचा फोटो दाखविला.म्हणाले हा फोटो पहा यात काय दिसतेय. यात तुला अप्पा दांडेकर दिसतोय का ? माझे उतर अर्थाच नाही होते , मग म्हणाले" अफाट विश्वात ही एक यः कश्चित आकाशगंगा त्यात ही यः कश्चित सूर्यमाला. त्यात ही यः कश्चित पृथ्वी ,त्यात हा यः कश्चित भारत देश, त्यात हा यः कश्चित महाराष्ट्र् त्यात हे यः कश्चित तळेगाव आणि त्यात हा ( स्वता: कडे हात करून) यः कश्चित अप्पा. एका बाजूला अप्पांना स्तुति प्रिय असे तर एका बाजूला आपले मानवाचे अल्पत्व ते असे विशद करून सांगत.
गोनिदानी ज्ञानेश्वरीचाही आपला स्वतंत्र असा अभ्यास केला. एकदा त्यांच्या गॅलरीत ते मी बोलत असताना कर्मकांडाचा विषय निघाला असावा. तर ज्ञानेशवरीतील एका ओवीचा संदर्भ देत ते म्हणाले "अरे तुझ्या त्या एवड्याशा प्रसादाने ज्याला जगाचा रथ चालवायचा आहे तो तुला एकट्याला प्रसन्न् होईल काय?" मला एकदम त्यांचा लंगोटी लावलेला हातात काठी असलेला जुना फोटो डोळ्यासमोर आला.
गाडगेबाबा गोनिदानी किती समजून घेतले होते याचा प्रत्यय येत होता.
आप्पा हिरव्या शाईने लिहित .कधी म्हणत हे पत्र एवढे पोस्टात टाकून येतोस का ? त्यावर रेखीव हस्ताक्शरात पत्ता टाकलेला असे. काही वेळेस ते लेखनिकाला येरझार्या घालीत लेखनाचा भाग सांगत. माझी जर आठवण दगा देत नसेल तर त्यांचेकडे लिहिण्याचे एक उतरते मेज होते. त्यावर कागद ठेवून हिरव्या शाईत ते काही वेळा स्वत: लिहित.त्याना जो विषय भूल घालील असाच विषय त्यानी लेखनास निवडलेला आहे. हे चालते खपते म्हणून आपणही लिहून बघू असे त्यानी केले नाही. मी दुर्बीण हा प्रकार आयुष्यात वापरला तो त्यांच्या कडे.
एकदा त्यांच्या पत्नी नीराबाई यानी चिवडा पुढे केला. 'बाहेर नको खाउ तिकडे आत स्वय़ंपाक घरात जाउन पटकन संपव .इथे यांच्याकडे कुणीतरी टपकायचं एकदम. माझ्याकडे एवढा चिवडा नाही रे बाबा ! " असे त्यांचे उदगार आजही आठवतात. एकदा त्या उण्यापुर्या स्वय़ंपाक घरात गोनिदा मी व त्यांची पत्नी असा जेवण्याचा प्रसंग आला. बेत काय तर मेथीची भाजी व भाकरी. त्यावेळी असेच स्वयंपाक असत. त्यात
गोनिदा साधे रहाणारे. पण तुम्ही म्हणाल काय भाग्य गोनिदाकडे जेवला. पण तळेगावतील दहा पोरे तरी निघलीत हा आनंद घेणारी.
अप्पांनी "अरण्येर कथा" असा एक वृत्तपत्रात लेख लिहिला.आमचे मूळ गाव आंदरमावळात. आमच्या घराच्या परसदारी आंबे , आळू ,बकुळ , बोरे, बांबू ई झाडे होती. त्या परसदाराचे वर्णन करणारा लेख माझ्या भावाने लिहिला व त्याना नेउन दाखविला. शीर्षक तेच ठेवले " अरण्येर कथा" त्यावर त्यानी वाचून अत्यंत आनंद व्यक्त केला. तळेगावात एका संस्थेने सर्वांसाठी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. त्यात मी भाग घेतला. त्यावेळी मी २७ वर्षाचा होतो. एका जागी मी लिहिली होते महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती... माउलीनी म्हटलेच आहे. गोनिदा परिक्षक होते. त्यांच्या व्यासंगी नजरेला ही चूक लगेच लक्षात आली नाही तरच नवल. माउली .....? कधी म्हणाले असे असा शेरा मारून त्यानी बाकी मजकूर पारितोषिकास योग्य असल्याने मला विजेता करून टाकले.
छायाचित्रण हा त्यांचा आणखी एक छंद ! हंपी येथील धोंड्यांचे त्यानी घेतलेले अविस्मरणीय मोठे केलेले फोटू मला त्यांनी दाखविले. केरळची कालव्यांची दुनिया ,दुर्गांचे फोटो.( राजगड त्यांचा आवडता) सिल्होटी प्रकारचे , निरनिराळे प्रयोग केलेले असे फोटो आवडीने ते दाखवत. सगळी एनलार्जंमेंट्स ! मला पहायची व त्याना दाखवायची आवड असल्याने व माझी पूर्वीची भीड चेपल्याने मला त्यांचा थोडाफार सहवास मिळाला. त्यांच्या घरी जाताना एक चिंचोळा जिना त्यातील दोराला पकडत चढून जावा लागे. त्याच दोराला लताबाई, आशाबाई, पुलं , दमा, बाबासाहेब पुरंदरे ( कोकणस्थ अप्पांचे देशस्थ मित्र) यांचे हात लागलेले होते. त्याच दोराने आपण गोनीदा नावाचा एक गड चढून जात आहोत याचा रास्त अभिमान त्यावेळी वाटे आजही वाटतो.
क्रमश: (पुढील लेख ओपी नय्यर यांच्या सहवासाचा आस्वाद देणारे ! )
वाचने
7175
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आठवणी. ओपींच्या आठवणी
छान आठवणी ! हंपीवरून आठवण
प्रतिसाद आणि तुमची सही अगदी
In reply to छान आठवणी ! हंपीवरून आठवण by जयंत कुलकर्णी
मस्त आठवणी.
दमा पुलं ?????
In reply to मस्त आठवणी. by बहुगुणी
> पुढील लेख ओपी नय्यर यांच्या सहवासाचा आस्वाद देणारे !
आजवर एक महान साहित्यिक म्हणून
आपला मान राखायचा म्हणून
In reply to आजवर एक महान साहित्यिक म्हणून by सस्नेह
मस्त ! हा किस्सा म्हणजे
In reply to आपला मान राखायचा म्हणून by चौकटराजा
सुंदर...
उत्कंठा लागली
>>>> 'बाहेर नको खाउ तिकडे आत
मस्त कलंदर फकीर !
In reply to >>>> 'बाहेर नको खाउ तिकडे आत by यकु
मला वाटतं त्याच नाव 'आशक,
In reply to मस्त कलंदर फकीर ! by चौकटराजा
बरीच वर्ष झाली त्यामुळे
In reply to मला वाटतं त्याच नाव 'आशक, by प्रचेतस
असं नसतं हो यक्कूशेठ. 'बाहेर
In reply to >>>> 'बाहेर नको खाउ तिकडे आत by यकु
सात॑ आंबोळ्याची गोष्ट
In reply to असं नसतं हो यक्कूशेठ. 'बाहेर by सस्नेह
चांगलं लिहीता की चौरा
कारण
In reply to चांगलं लिहीता की चौरा by प्यारे१
शिर्षक वाचल्यावर नक्की काय वाचायला मिळणार आहे-
पुन्हा एकदा मस्त आठवणी,
तेवढं ओपीच्या पोस्टच लवकर जमवा चौरा
मस्त.
अजुन येऊ दे..
यशोदा...
अप्पांचा सहवास
पुन्हा एकदा