Skip to main content

लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!

Published on मंगळवार, 17/04/2012
लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १ (आदरणीय यक्कू यांची माफी मागुन....) .. एक लग्न होउन सुरळीत संसार चालु असताना दुसर्‍या लग्नाची दुर्बुध्दी झाली,आणी दुसरे लग्न केले.(झक मारली अनं दुसरं लग्न केल.. कारण दुसरी तर पहीली पेक्षाही कजाग निघाली ) असो दुसर लग्न म्हणलं की दुसरं घर घर,तवा पहील्याच घराला जोडुन असणार दुसर घर गुपचुप घेतलं,बरेच महीने सगळ व्यवस्थित चालु होतं,पण एके दिवशी दुसर्‍या बायकोचा आलेला फोन पहीलीने उचलला,आणी इथेच भानगड झाली,पहीलीला कळलं माझ दुसरं लग्न झालयं तीने ताबड्तोब माहेरचा रस्ता धरला,तर काही दिवसातच दुसरीही मला शिव्या घालत निघुन गेली.भरीत भर म्हणुन दोघींनीही माझ्यावर कोर्टात फिर्याग ठोकली. मग आम्ही काय करावं ,एक चांगला बड्बड करणारा अ‍ॅड्व्होकेट (पक्षी वकील ,भरपुर द्क्षीणा देउन अनुष्टानाला कोर्टासमोर बसवला,गेले महीनाभर त्याच्या तारखा चालुच आहेत,पण त्याला ना पहिल्या बायकोला परत बोलवण्यात यश येतय ना दुसर्‍या . बायको घरी नसल्याने चुल बंद आहे ,त्यामुळे सध्या पोटात कोणतेच चांगलेचुंगले पदार्थ (पक्षी. सामिष निरामिष..)या क्षणी जात नाहीत.वकीला न कोर्टाच्या तारखांना बोलावुन मलाही या अनुष्टानात सामिल करुन घेतलयं ,म्हणुन हे यज्ञकुंड पेटवलं आहे.जेणेकरुन सध्याची बायकोविहीन अवस्था दूर व्हावी आणि लवकरात लवकर माझा संसार पुर्वीसारखाच सुरळीत चालावा. दोन बायका करणार्‍या कुणाच्या मागे पूर्वी असले शुक्लकाष्ट लागले होते काय?असेल तर काय उपाय करुन त्यानी आपला संसार सुरळीत केला हे कृपया सांगावे . १.आम्ही नेमलेला वकील आमच्या जातिधर्माशी संबधीत नसुन आम्ही विवाह जमवलेल्या विवाह संस्थेशीहि संबधीत नाहि. २.हाता पाया पडुन पहील्या बायकोला परत आणता येइल,आमच सासर ५०० कि.मि. लांब आहे ,शिवाय फटके खाण्याचा प्रसंग येउ शकतो. तर कृपया सांगा ह्या दुखण्यावर काय उपाय करता येईल? दुसरे: या दोघींनाही सोडुन तिसरी करता येइल काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4024
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

>>(आदरणीय यक्कू यांची माफी मागुन....) प्राध्यापको, माझी कशाला माफी उगाच? :D मिपा ‍तंत्रज्ञहो, मिपावरच्या आयडींमध्‍ये रिडण्‍डंट व्हायरस घुसला आहे असे एक निरिक्षण मांडतो. कृपया स्कॅन मारावा. ;-)

मागील वर्षी ह्यांना कुलर परवडत नव्हता , अन आता २-२ बायका... सातवा वेतन आयोग लागु झाला की काय?

In reply to by कुंदन

सध्या सहाव्या वेतन आयोगाच्याच फरकाची रक्कम मिळालेली नाही. कालच प्राध्यापकांचे जेलभरो आंदोलन झाले. असो, प्राध्यापक महोदयांचे लेखन पाहता पराच्या प्रतिसादाशी सहमत आहे, असेच म्हणावे लागते. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालच प्राध्यापकांचे जेलभरो आंदोलन झाले. च्यायला, हे जरा बघायला मिळालं असतं तर सार्थक झालं असतं!!! :) काय फोटो-गिटो काढले असतील तर इथे टाका की राव!!!!! -पिवळा डांबिस (आसुरी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्क्क्क्क्काय ? अजुनही सहाव्या वेतन आयोगाचा फरक नाही मिळाला म्हणता.(तुमची श्रीलंका ट्रीप बोंबलली म्हणायची) अहो एक १०/१५ पानी पत्र टाका पाहु सरकारला. काय लावलयं काय सरकारने ?

अहो ....हे फक्त विडंबन आहे हो........ प्रत्यक्षात अस झालं तर मला मिपा वरुन काय घरातुन ही हद्दपार होण्याची वेळ येइल... (आयला....प्राध्यापक हे नाव मिपावर टाकुन घोळ झाला का काय्?कुठल्याही प्रतिक्रियेत वेतन आयोगाचाच मुद्दा येतोय...नाही हो फरक मिळाला अजुन...)

तुम्ही हरहुन्नरी आहात हे नक्की. असा एक कयास आहे की हा तुमचा डू- आयडी असावा. हे विडंबन वाचल्यावर कुठे हसायचे तेच कळेना त्यामुळे परत एकदा वाचून पहिले पण पदरी निराशाच पडली, ह्यापेक्षा एखादा छान लेख घेऊन या ..

In reply to by अँग्री बर्ड

तुमच्या सुचने चा नक्की विचार करतो .रोहित बाय द वे ..हे डु-आयडी म्हण्जे काय ते लक्षात आले नाही कृपया स्पष्ट करुन सांगाल का ?

In reply to by प्राध्यापक

जग भले काही म्हणो पण आपल्या नवर्‍याच सदैव कौतुक करणारी, त्याला प्रोत्साहन देणारी, चार चौघात त्याला सावरून घेणारी, त्याच्यावर बाका प्रसंग आला तर त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी रहणारी बायको तुम्ही कधी पाहिलीये का? पण आंतरजालावर अशी बायको मिळू शकते आणि ती म्हणजे तुमचा ड्युपलिकेट आयडी.

In reply to by जेनी...

तुम्ही काय +११११ प्रतिसादांचं व्रत घेतलं आहे काय ? नसत्या अस्तंगत होणा-या आंतरजालीसंस्थळियअंधश्रद्धा हाकानाका.

In reply to by ५० फक्त

नाहि हर्षद ,,बिल्कुल नाहि .. व्रत वैकल्य पटत नाहित मला पण शुद्धलेखनाची भिति वाटते आणि +१ मध्ये शुद्धलेखनाचा प्रश्न येत नाहि म्हनुन हो .. हे ++++१११११११ ;) :P

बाय द वे ..हे डु-आयडी म्हण्जे काय ते लक्षात आले नाही कृपया स्पष्ट करुन सांगाल का ? विद्याविनयेन शोभते बाकी लेखाचं सोडा,पण तुमच्या या प्रतिसादानं मात्र अंमळ हसु आलं.