रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे
ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे
परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे
संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही
कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही
ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे
नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात
संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत
'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे
या स्वप्नांपुढती प्राणांना येई कवड्यांचे मोल
कारण असती स्वप्नपूर्तीचे दोनच क्षणही अनमोल
स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी स्वप्नांसाठीच जगत राहाणे
होई तृप्तीच्या दो श्वासांनी सुरेल माझे जीवनगाणे...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5517
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !!!!!!!
सुरेल माझे जीवनगाण
यतिभंग
In reply to सुरेल माझे जीवनगाण by धनंजय
अरे वा ! मस्तच.
तिहाई
In reply to अरे वा ! मस्तच. by लिखाळ
तिहाई
In reply to तिहाई by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
संदर्भ
In reply to तिहाई by घाटावरचे भट
बर..
In reply to तिहाई by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्त
निव्वळ अप्रतिम..
स्फूर्तिदायक काव्य!
वा!
कधी जगाशी
वा वा! लै
संघर्ष नसे
छान ....