तू माझ्या शेजारी आणि घननिळ फुलोरा आहे
स्वप्नवेड केसात माळताना स्पर्शाची रेशमधग
बाहूतल्या ह्या घुसमटण्याचे हे शब्दनृत्य आहे
जिथे भेटलो शरीर द्विपाला कुठल्याशा तुफानासम
कोसळलो मीच माझ्यात माझी नाव तिथेच उलटली आहे
भरून येता आभाळ चांदण्याने
डोळ्यांचे तुझ्या अद्भुतसे नक्षत्र
खोल गात्र वेडांचे निळे आकाश कसे फेसाळते आहे!
जुळताना ओठांचे दुवे विरघळते अंतरात काही
स्पर्शाच्या आरशात बघ सखे एक जीव दुसऱ्यास न्याहाळत आहे
दंग गुंफण्यात क्षेत्रे आत्म्याची ही "देहबोली"
हुंकार गर्द श्वासांचे हे वेद पारदर्शक भोगवेळी
ही 'झदम अदम' वृत्ते मिलनाच्या लयीतली
द्वैताच्या ह्या शरीरकिनारी गीत अद्वैती हे कोण गात आहे?
अनावृत सखे हाक हळुवार प्राजक्ताच्या सफेद कळ्यांची
विजेस वेड लागे अंतरात धामीण सळसळणारी
अमर्याद काही दिले घेतले दोन देहांच्या एक ओंजळी
तुझे सर्व माझ्या कडे आणि मीच तुझ्या दारी भिकारी
--------
पुर्वप्रकाशित मायबोली दिवाळी अंक २००५
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1451
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा !
"देहबोली" संयमित शब्दांत